Israeli IDF Intelligence Chief Resigns Dainik Gomantak
ग्लोबल

Israel Hamas War: इस्रायली लष्करातील उच्चपदस्थ अधिकाऱ्याचा राजीनामा; हमासचा हल्ला रोखण्यात अपयशी ठरल्याची स्वीकारली जबाबदारी

Israeli IDF Intelligence Chief Resigns: इस्रायली मीडिया Ynet न्यूजनुसार, हमासचा हल्ला रोखण्यात अयशस्वी झाल्याची जबाबदारी घेतल्यानंतर अहारोन हलिवा यांनी सोमवारी हा निर्णय घेतला.

Manish Jadhav

Israeli IDF Intelligence Chief Resigns: इस्त्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध थांबण्याचं नाव घेत नसताना इस्त्रायल आणि इराण यांच्यातील संघर्ष शिगेला पोहोचला आहे. इस्त्रायल आणि इराण यांच्यातील संघर्षामुळे अवघे जग चिंतेत आहे. इस्रायल आणि हमास यांच्यात सुरु असलेल्या युद्धाला आता सहा महिने पूर्ण होत आहेत. यादरम्यान इस्रायली सैन्याने गाझामध्ये कहर केला आहे. बॉम्बस्फोट आणि हवाई हल्ले यामुळे गाझामध्ये अराजकता माजली आहे. दरम्यान, एक मोठी बातमी समोर आली आहे. आयडीएफच्या मिलिटरी इंटेलिजन्स डायरेक्टरेटचे प्रमुख मेजर जनरल अहारोन हलिवा यांनी 7 ऑक्टोबर रोजी हमास हल्ल्यातील गुप्तचर यंत्रणेच्या अपयशाची जबाबदारी स्वीकारुन राजीनामा दिला आहे. इस्रायली मीडिया Ynet न्यूजनुसार, हमासचा हल्ला रोखण्यात अपयशी ठरल्याची जबाबदारी स्वीकारल्यानंतर अहारोन हलिवा यांनी सोमवारी हा निर्णय घेतला.

इस्रायली लष्कराने एका निवेदनात म्हटले आहे की, लष्कर प्रमुखांनी हलिवा यांच्या राजीनाम्याची विनंती मान्य केली आहे आणि त्यांच्या सेवेबद्दल त्यांचे आभार मानले आहेत. आता IDF ला त्यांच्या जागी नव्या जनरलची निवड करावी लागेल कारण देश आधीच भयंकर युद्धातून जात आहे.

आणखी अधिकारी राजीनामा देऊ शकतात!

दरम्यान, त्यांच्या राजीनाम्यानंतर इस्रायली लष्करातील आणखी उच्चपदस्थ अधिकरी हमासच्या दहशतवाद्यांचा हल्ला रोखण्यात अपयशी ठरल्याबद्दल राजीनामा देऊ शकतात. 7 ऑक्टोबर रोजी झालेला हल्ला रोखण्यात अपयशी ठरल्याची जबाबदारी स्वीकारत राजीनामा देणारे हेलीवा हे पहिले अधिकारी आहेत.

हमासचा हल्ला

7 ऑक्टोबर रोजी हमासच्या दहशतवाद्यांनी गाझाला लागून असलेल्या इस्रायल-व्याप्त पॅलेस्टिनी भूभागात हल्ला केला. या हल्ल्यानंतर हमासचे दहशतवादी आणि इस्रायली सैन्य यांच्यातील संघर्षात सुमारे 1200 लोक मारले गेले. याशिवाय, सुमारे 250 लोकांना हमासच्या दहशतवाद्यांनी ओलिस बनवून गाझामध्ये नेले. दरम्यान, काही दिवसांपूर्वी झालेल्या युद्धविरामात काही ओलिसांची सुटका करण्यात आली आहे, मात्र डझनभर ओलीस अजूनही हमासच्या कैदेत आहेत. त्यांची सुटका करण्याचे इस्त्रायलचे प्रयत्न सुरु आहेत.

आतापर्यंत 34,000 हून अधिक पॅलेस्टिनींचा मृत्यू झाला

गाझाच्या आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, युद्ध सुरु झाल्यापासून गाझामध्ये 34,000 हून अधिक पॅलेस्टिनी मारले गेले आहेत, त्यापैकी किमान दोन तृतीयांश मुले आणि महिलांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, 7 ऑक्टोबर रोजी हमासच्या दहशतवाद्यांनी इस्रायलवर हल्ला केला होता, ज्यात अनेक लोक मारले गेले होते. यासोबतच, दहशतवाद्यांनी इस्त्रायलच्या हजारो नागरिकांना बंधकही बनवले आहे. तेव्हापासून इस्रायल हमासच्या ठिकाणांवर सातत्याने हल्ले करत आहे. या हल्ल्यांमध्ये अनेक निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Highway: जमिनी गेल्या, रस्ताही अडला; उगवेकरांचा संताप, एनएच 66 मुळे दैनंदिन जीवन विस्कळीत; मोबदल्याची अद्याप प्रतीक्षा

Bicholim Hit And Run Case: सुरक्षेचा 'तिसरा डोळा' ठरला कर्दनकाळ; अपघातानंतर पळणाऱ्या चालकाच्या मुसक्या आवळल्या, डिचोली पोलिसांची कारवाई

"वाघांचे मृत्यू अन् वन विभागाचे अपयश"; पर्यावरणप्रेमी राजेंद्र केरकर यांचा थेट प्रहार!

Goa Crime: काकाची हत्या करून मावशीकडे घेतला आश्रय! बोरी येथील दीपक नाईक हत्या प्रकरणातील संशयित नराधम पोलिसांच्या तावडीत

Goa Accident: अटल सेतूवर विचित्र अपघात! 1 नाही, 2 नाही... 7 गाड्या एकमेकांना धडकल्या, वाहतूक विस्कळीत; Watch Video

SCROLL FOR NEXT