Israeli Ambassador to India Nor Gillon wrote that we are happy that India defeated Pakistan. Dainik Gomantak
ग्लोबल

'पाक आपला विजय हमासच्या दहशतवाद्यांना समर्पित करू शकला नाही', भारताच्या विजयावर इस्रायलचे राजदूत खूष

Israel-Hamas war: सामन्यादरम्यान आमच्या समर्थनाचे पोस्टर दाखवून भारतीय मित्रांनी इस्रायलशी एकजूटा दाखवल्याने आम्ही खरोखर प्रभावित झालो, असेही इस्रायलच्या राजदूतांनी म्हटले आहे.

Ashutosh Masgaunde

Israeli Ambassador to India Nor Gillon wrote on Twitter that we are happy that India defeated Pakistan in the Cricket World Cup 2023:

एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक २०२३ च्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा पराभव केला. भारताने हा सामना 7 विकेटने जिंकला.

भारताच्या विजयावर इस्रायलच्या राजदूताने आनंद व्यक्त केला आहे. भारतातील इस्रायलचे राजदूत नॉर गिलन यांनी ट्विटरवर लिहिले की, क्रिकेट विश्वचषक 2023 च्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा पराभव केल्याचा आम्हाला आनंद आहे.

ते म्हणाले की, पाकिस्तान आपला विजय हमासच्या दहशतवाद्यांना समर्पित करू शकत नाही. आमच्या भारतीय मित्रांनी सामन्यादरम्यान पोस्टर प्रदर्शित करून इस्रायलशी एकजूट दाखवल्याने आम्हाला खूप आनंद झाला आहे. सामन्यादरम्यान पोस्टर दाखवून भारतीय मित्रांनी इस्रायलशी एकजूट दाखवल्याने आम्ही खरोखर प्रभावित झालो.

यापूर्वी पाकिस्तानी क्रिकेटपटू मोहम्मद रिझवानने श्रीलंकेविरुद्धचा पाकिस्तानचा विजय पॅलेस्टिनी नागरिकांना समर्पित केला होता. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर पोस्ट करत तो म्हणाला की, हे गाझामधील आमच्या बंधू-भगिनींसाठी आहे. विजयात योगदान दिल्याबद्दल आनंद झाला. हा विजय सोपा बनवण्याचे श्रेय संपूर्ण टीमला आणि विशेषत: अब्दुल्ला शफीक आणि हसन अलीला जाते.

अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या विश्वचषकाच्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा पराभव केला.

एकतर्फी झालेल्या सामन्यात भारताने त्यांचा 7 गडी राखून विजय नोंदवला. यासह टीम इंडियाने विश्वचषकात 8व्यांदा पाकिस्तानचा पराभव केला आहे.

भारतीय गोलंदाजांनी पाकिस्तानला 191 धावांवर रोखल्यानंतर कर्णधार रोहित शर्माने 86 धावांची आक्रमक खेळी केल्याने भारतीय संघाचा विजय सोपा झाला.

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू नुकतेच म्हणाले की, त्यांचा देश हमासने

केलेले भयानक कृत्य कधीही विसरणार नाही आणि त्यांना क्षमा करणार नाही. त्यांनी ठामपणे सांगितले की इस्रायल त्याच्या शत्रूंनी त्यांनी केलेल्या कृत्याची किंमत मोजण्यास सुरुवात केली आहे.

गेल्या शनिवारी हमासच्या दहशतवाद्यांनी इस्रायलमध्ये हल्ला करत हजारो नागरिकांचे प्राण घेतले. त्यानंतर इस्रायने गाझावर हल्ला करत हमासच्या दहशतवाद्यांना लक्ष्य केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT