Israel-Hamas War: इस्रायल-हमास युद्धाबाबत इस्लामिक जगत ॲक्शनमोडमध्ये, उचलले 'हे' मोठे पाऊल!

Israel-Hamas War: इस्रायल आणि हमास यांच्यात सुरु असलेल्या भीषण युद्धाबाबत इस्लामिक जगतही ॲक्शनमोडमध्ये आले आहे.
Organisation of Islamic Cooperation
Organisation of Islamic CooperationDainik Gomantak
Published on
Updated on

Israel-Hamas War: इस्रायल आणि हमास यांच्यात सुरु असलेल्या भीषण युद्धाबाबत इस्लामिक जगतही ॲक्शनमोडमध्ये आले आहे.

आठवड्याभरापासून सुरु असलेल्या या रक्तरंजित युद्धाबाबत 57 मुस्लिम देशांची संघटना असलेल्या ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशनने (ओआयसी) तातडीची बैठक बोलावली आहे.

ओआयसीने आज म्हणजेच शनिवारी एक निवेदन जारी करुन सांगितले की, सौदी अरेबियाच्या मागणीनुसार बुधवारी ओआयसी कार्यकारी समितीची आपत्कालीन मंत्रीस्तरीय बैठक होणार आहे.

दरम्यान, ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशनचा प्रमुख देश असलेल्या सौदी अरेबियाने मंगळवारी ओआयसीची तातडीची बैठक घेण्याची मागणी केली होती.

सौदी अरेबिया (Saudi Arabia) आणि त्याच्या सहयोगी देशांचे ओआयसीमध्ये वर्चस्व असल्याचे मानले जाते. आंतरराष्ट्रीय स्तरावर शांतता आणि सौहार्द निर्माण करताना मुस्लिमांचे संरक्षण करणे हा त्याचा उद्देश आहे.

Organisation of Islamic Cooperation
Israel-Hamas War: 'हीच गत दहशतवाद्यांची होणार...,' हमासचा हवाई दल प्रमुख अली कादी ठार!

ओआयसीने काय म्हटले आहे?

ओआयसीने एक निवेदन जारी करुन म्हटले की, "सौदी अरेबियाच्या मागणीनुसार, गाझामधील इस्रायलची (Israel) लष्करी कारवाई आणि नि:शस्त्र नागरिकांच्या संरक्षणावर चर्चा करण्यासाठी बुधवारी ओआयसी कार्यकारी समितीची आपत्कालीन मंत्रिस्तरीय बैठक बोलावण्यात आली आहे.

इस्लामिक समिट आणि ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशनच्या कार्यकारी समितीचे विद्यमान अध्यक्ष देखील त्यांच्या मागणीवर आपत्कालीन ओपन एंडेड असाधारण बैठक बोलावत आहेत.

दरम्यान, गाझा आणि त्याच्या आजूबाजूच्या भागात वाढती लष्करी कारवाई आणि तेथील नागरिकांच्या जीवन सुरक्षा आणि स्थिरतेबाबत बिघडत चाललेली परिस्थिती यावर चर्चा करणे हा त्याचा उद्देश आहे. 18 ऑक्टोबर 2023 रोजी जेद्दाह येथे ओआयसीची ही बैठक होणार आहे.

इराण आणि सौदी अरेबियाने मागणी केली होती

सौदी अरेबियाचे क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी मंगळवारी ओआयसीची तातडीची बैठक घेण्याची मागणी केली होती.

याशिवाय, सौदीचे राजे सलमान यांच्या नेतृत्वाखाली सौदीच्या मंत्रिमंडळाची बैठकही झाली होती. या बैठकीत सौदीचे राजे सलमान आणि क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी आंतरराष्ट्रीय नेत्यांशी चर्चा केली.

दुसरीकडे, क्राउन प्रिन्स सलमान यांनी पॅलेस्टाईन, जॉर्डन आणि इजिप्तच्या अध्यक्षांसह इतर प्रमुख लोकांशी फोनवर चर्चा केली.

चर्चेदरम्यान, क्राउन प्रिन्सने गाझामधील तणाव कमी करण्यासाठी सौदीच्या वचनबद्धतेबद्दल, पॅलेस्टिनी नागरिकांचे कायदेशीर हक्क आणि शाश्वत शांतता याबद्दल बोलले.

तत्पूर्वी, इराणनेही सोमवारी इस्लामिक सहकार्य संघटनेची (ओआयसी) तातडीची बैठक घेण्याची मागणी केली होती. इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते नासेर कनानी म्हणाले होते की, "तेहरानने प्रादेशिक घडामोडींवर चर्चा करण्यासाठी इस्लामिक सहकार्य संघटनेची (ओआयसी) तातडीची बैठक घेण्याची मागणी केली आहे."

Organisation of Islamic Cooperation
Israel-Hamas War: चीनमध्ये इस्रायली डिप्लोमॅटवर प्राणघातक हल्ला, दहशतवादी हल्ल्याची भीती

OIC म्हणजे काय?

OIC चे पूर्ण नाव Organisation of Islamic Cooperation आहे. याचे मुख्यालय सौदी अरेबियातील जेद्दाह शहरात आहे. ही 57 मुस्लिम बहुल देशांची संघटना आहे.

ओआयसीवर आखाती देश सौदी अरेबिया आणि त्याच्या मित्र राष्ट्रांचे वर्चस्व मानले जाते. आंतरराष्ट्रीय शांतता आणि सौहार्द निर्माण करताना मुस्लिमांचे संरक्षण करणे हा त्याचा उद्देश आहे.

चार खंडातील 57 देशांची ही संघटना सुमारे 1.5 अब्ज लोकसंख्येचे प्रतिनिधित्व करते आणि सदस्य देशांचा एकूण GDP सुमारे 7 ट्रिलियन डॉलर आहे. OIC हा संयुक्त राष्ट्रांनंतर जगातील दुसरा सर्वात मोठा आंतरशासकीय गट आहे.

ही संघटना मुस्लिम जगताचा सामूहिक आवाज म्हणून स्वतःची ओळख करुन देते. भारत हा जगातील तिसरा सर्वात मोठा मुस्लिम लोकसंख्या असलेला देश आहे, परंतु असे असूनही, भारत OIC चा सदस्य नाही किंवा त्याला निरीक्षक दर्जाही मिळालेला नाही.

अनेक बिगर मुस्लिम देशांनाही OIC मध्ये निरीक्षकांचा दर्जा मिळाला आहे. 2005 मध्ये केवळ 25 दशलक्ष मुस्लिम लोकसंख्या असतानाही रशियाला निरीक्षक म्हणून संघटनेत समाविष्ट करण्यात आले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com