Israel Hamas War Dainik Gomantak
ग्लोबल

Israel Hamas War: दक्षिण गाझामधील रफाह शहरात इस्रायलचा हवाई हल्ला; 6 मुलांसह 9 पॅलेस्टिनी ठार

Israel Hamas War: इस्त्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध थांबण्याचं नाव घेत नाहीये. इस्त्रायल सातत्याने गाझावर हवाई हल्ले करत आहे.

Manish Jadhav

Israel Hamas War: इस्त्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध थांबण्याचं नाव घेत नाहीये. इस्त्रायल सातत्याने गाझावर हवाई हल्ले करत आहे. यातच आता, दक्षिण गाझातील रफाह शहरावर केलेल्या हवाई हल्ल्यात नऊ जण ठार झाले. मृतांमध्ये सहा मुलांचा समावेश आहे. इस्रायल जवळपास सात महिन्यांपासून पॅलेस्टिनी भूभागावर सतत हल्ले करत आहे. या युद्धामुळे मध्यपूर्वेत सातत्याने तणाव वाढत आहे. आता इराण आणि इस्रायल यांच्यातील संघर्षामुळे मध्यपूर्वेतील परिस्थिती आणखीनच वेगाने बिघडत आहे. याबाबत पाश्चात्य देशांबरोबरच संपूर्ण जगात चिंतेत आहे.

दरम्यान, शुक्रवारी रात्री उशिरा झालेल्या हल्ल्यात रफाह शहराच्या पश्चिमेकडील तेल सुलतान भागातील एका निवासी इमारतीला लक्ष्य करण्यात आले. सहा मुले, दोन महिला आणि एका व्यक्तीचा मृतदेह रफाहच्या अबू युसेफ अल-नज्जर रुग्णालयात नेण्यात आला. मृतांमध्ये अब्देल-फत्ताह सोभी रदवान, त्यांची पत्नी नजला अहमद अवेदा आणि त्यांच्या तीन मुलांचा समावेश आहे. बारहौम यांनी त्यांची पत्नी, रावन रडवान आणि त्यांची 5 वर्षांची मुलगी, अलाने जीव गमावला.

रफाहवर इस्रायलचा हवाई हल्ला

रफाह शहर इजिप्तच्या सीमेवर आहे. सध्या, गाझाच्या एकूण लोकसंख्येपैकी अंदाजे 2.3 दशलक्ष लोकांनी या शहरात आश्रय घेतला आहे. युनायटेड स्टेट्ससह आंतरराष्ट्रीय समुदायाने संयम राखण्याचे आवाहन करुनही पॅलेस्टाईनवर इस्रायली हल्ले सुरुच आहेत. या भागात हमासचे उर्वरित दहशतवादी लपून बसल्याचे इस्रायलचे म्हणणे आहे.

दरम्यान, इस्त्रायली लष्कराला जमिनीवर हल्ले करण्यात अपयश आले असले तरी लष्कराकडून सातत्याने हवाई हल्ले केले जात आहेत. 7 ऑक्टोबर रोजी हमासने पहिल्यांदा दक्षिण इस्रायलवर हल्ला केला, ज्यामध्ये सुमारे 1,200 लोकांचा मृत्यू झाला. तर सुमारे 250 लोकांचे अपहरण करुन गाझा येथे नेण्यात आले. इस्रायलचे म्हणणे आहे की, गाझामध्ये सुमारे 130 ओलिस आहेत. मात्र 30 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे.

गाझाच्या आरोग्य मंत्रालयाने शनिवारी सांगितले की, गेल्या 24 तासांत इस्रायलच्या हल्ल्यात ठार झालेल्या 37 लोकांचे मृतदेह गाझा रुग्णालयात आणण्यात आले आहेत. मंत्रालयाने सांगितले की, ताज्या आकडेवारीनुसार, इस्रायल-हमास युद्धात एकूण पॅलेस्टिनी मृतांची संख्या 34,049 आणि जखमींची संख्या 76,901 वर पोहोचली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Illegal Spa Goa: मसाज पार्लरच्‍या नावाखाली कोलव्यात वेश्‍‍याव्‍यवसाय, दोन पार्लरवर छापे; 9 युवतींची सुटका

Mapusa Theft: म्हापशातील सशस्त्र दरोडा; दोन दिवस उलटले, अद्याप धागेदोरे नाहीत; पोलिसांची आठ पथके मागावर

PM Narendra Modi: काँग्रेसनेच लष्कराला हल्ल्यापासून रोखले, '26-11'बाबत पंतप्रधान मोदींची टीका

GDS Recruitment: डाकसेवक पदांसाठी 'कोकणी' अनिवार्य! मराठीतून शिकलेल्‍यांनाही बंधनकारक, मुख्‍यमंत्र्यांकडून निर्णयाचे स्‍वागत

Goa Coconut: नारळ पीक का घटले? शुक्रवारी होणार चिंतन; 'गोमन्‍तक', 'ॲग्रोवन'तर्फे दोनापावला येथे राष्‍ट्रीय परिषदचं आयोजन

SCROLL FOR NEXT