Israel-Hamas War
Israel-Hamas WarDainik Gomantak

Israel-Hamas War: ''थँक्यू पीएम मोदी...'', हमासच्या हल्ल्यातून बचावलेल्या महिलेचा जगाला भावूक संदेश

Israel-Hamas War: इस्त्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध थांबण्याचं नाव घेत नाहीये. इस्त्रायल सातत्याने गाझावर हवाई हल्ले करत आहे.
Published on

Israel-Hamas War: इस्त्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध थांबण्याचं नाव घेत नाहीये. इस्त्रायल सातत्याने गाझावर हवाई हल्ले करत आहे. गेल्या वर्षी 7 ऑक्टोबर रोजी हमासने इस्रायलवर हल्ला केला होता. तेव्हापासून दोघांमध्ये युद्ध सुरुच आहे. दरम्यान, हमासच्या हल्ल्यातून बचावलेल्या इस्रायली महिलेने पंतप्रधान मोदी आणि भारतीय जनतेचे आभार मानले आहेत. महिलेच्या बोलण्याने अवघे जग भावूक झाले. भारत इस्त्रायलचा खरा मित्र असल्याचे म्हणत मोरन म्हणाली की, ''आमच्या अत्यंत कठीण काळात भारतातील लोकांनी मैत्रीचा हात पुढे केला त्याबद्दल आम्ही सर्व कृतज्ञ आहोत. भारत सरकारचे तसेच तेथील लोकांचे आभार. दोन्ही देशांमधील मैत्रीचे नाते कायम राहील. थँक्यू पीएम मोदी... ''

'भारतीय लोक आमच्या गरजा पूर्ण करत आहेत'

दरम्यान, भारताने इस्रायलचा आवाज जागतिक स्तरावर बळकट केल्याचे मोरन यांचे म्हणणे आहे. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे भारतातील लोक आपल्या गरजा पूर्ण करत आहेत. दुसरीकडे, इस्रायलचे भारतातील राजदूत नाओर गिलॉन म्हणाले की, भारत असा देश आहे ज्याने दहशतवादाविरोधात नेहमीच उघडपणे आवाज उठवला आहे. हमासच्या हल्ल्यानंतर भारताने आम्हाला पाठिंबा दिला. त्याची कदर आहे.

Israel-Hamas War
Israel-Hamas War: इस्रायल-हमास संघर्षावर भारताने UN मध्ये पुन्हा मांडली भूमिका; भारतीय राजदूत रुचिरा कंबोज म्हणाल्या...

गेल्या वर्षी 7 ऑक्टोबरला हमासने इस्रायलवर हल्ला केला होता. यामध्ये सुमारे 1200 लोकांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्यानंतर इस्रायलने युद्धाची घोषणा करत गाझावर हल्ले करण्यास सुरुवात केली. यामध्ये हमाससह पॅलेस्टाईनचेही मोठे नुकसान झाले. काल गाझाच्या आरोग्य मंत्रालयाने सांगितले होते की, इस्रायलच्या कारवाईत आतापर्यंत 33 हजारांहून अधिक पॅलेस्टिनी मारले गेले आहेत.

Israel-Hamas War
Israel-Hamas War: इस्त्रायलचा मोठा निर्णय; गाझामधून परत बोलावले सैन्य; युद्धविरामासाठी ठेवली 'ही' अट

हमासच्या हल्ल्यानंतर पीएम मोदींनी ही पोस्ट केली होती

तथापि, गाझा अधिकाऱ्यांनी यापैकी किती नागरिक आणि दहशतवादी आहेत हे स्पष्ट केलेले नाही. मात्र, ठार झालेल्यांमध्ये बहुतांश महिला आणि लहान मुले असल्याचे निश्चितपणे सांगितले जात आहे. हमासच्या हल्ल्यानंतर, पीएम मोदी इस्रायलला पाठिंबा व्यक्त करणाऱ्या पहिल्या जागतिक नेत्यांपैकी एक होते. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर एक पोस्ट केली होती. या पोस्टमध्ये ते म्हणाले होते की, ''इस्रायलमधील दहशतवादी हल्ल्याच्या वृत्ताने धक्का बसला. आमच्या संवेदना पीडित आणि त्यांच्या कुटुंबियांप्रती आहेत. या कठीण काळात आम्ही इस्रायलच्या पाठीशी उभे आहोत.'' एवढेच नाही तर 10 ऑक्टोबर रोजी पीएम मोदींनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्याशी संवाद साधला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com