Israel working 24/7 to collect sperm from war dead soldiers DAINIK GOMANTAK
ग्लोबल

Israel Hamas War: इस्रायल का गोळा करत आहे युद्धात शहीद झालेल्या सैनिकांचे 'वीर्य'?

Sperm Of War Dead Soldiers: मंत्रालयाने म्हटले आहे की, शुक्राणू मृत्यूच्या 24 तासांच्या आत गोळा करणे आवश्यक असते जेणेकरून ते गोठवले जाऊ शकतात आणि एग फर्टिलायझर करण्यासाठी वापरले जाऊ शकतात.

Ashutosh Masgaunde

Israel working 24/7 to collect sperm from war dead soldiers:

दहशतवादी संघटना हमाससोबतच्या भीषण युद्धादरम्यान इस्रायलमधून एक वेगळी बातमी समोर आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, इस्रायलच्या आरोग्य मंत्रालयाने ज्या पालकांची मुले युद्धात शहीद झाली आहेत त्यांना शुक्राणू प्राप्त करण्याची परवानगी दिली आहे.

यासाठी त्यांना कोणत्याही कायदेशीर प्रक्रियेतून जावे लागणार नाही. युद्धात विधवा झालेल्या महिलांनाही अशीच सूट देण्यात आली आहे.

इस्रायली आरोग्य मंत्रालयाने पालकांना हमास विरुद्ध सुरू असलेल्या युद्धादरम्यान मरण पावले आहेत त्यांच्या मुलांचे शुक्राणू मिळवण्यासाठी कायदेशीर प्रक्रियेतून सुट दिली आहे. त्याचे दफन करण्यापूर्वी शुक्राणू गोळा करण्याच्या सूचना मंत्रालयाने दिल्या आहेत.

का गोळा केले जात आहे मृत सैनिकांचे वीर्य?

जेव्हा जेव्हा एखादा इस्रायली सैनिक मारला जातो तेव्हा युनिट त्याच्या पत्नीला किंवा कुटुंबाला पहिल्यांदा याबाबत कळवते. त्यानंतर ते इच्छित असल्यास भविष्यातील पिढ्या तयार करण्यासाठी मृत सैनिकाचे शुक्राणू कुटुंबियांना देण्यात येतात.

त्यामुळे आताही हमासबरोबरच्या सुद्धात शहीद झालेल्या सैनिकांचे वीर्य गोळा करण्याचे काम सुरू आहे.

टाईम्स ऑफ इस्रायलच्या वृत्तानुसार, गेल्या महिन्यापासून युद्धादरम्यान 33 शहीद जवानांचे वीर्य घेण्यात आले होते. या अहवालात असे म्हटले आहे की, ठार झालेल्यांपैकी चार नागरिक होते, तर उर्वरित सैनिक होते. इस्रायल डिफेन्स फोर्सेस (IDF) सह एक विशेष टीम आणि शुक्राणू बँक असलेली चार रुग्णालये यावर 24 तास कार्यरत आहेत.

इतर वेळी, ज्या पालकांनी त्यांच्या मृत मुलाचे शुक्राणू हवे असतात तेव्हा त्यांना कौटुंबिक न्यायालयाकडून परवाणगी घेणे आवश्यक असते. मात्र सरकारने आता ही प्रक्रिया तात्पुरती बंद केली आहे.

मंत्रालयाने म्हटले आहे की, शुक्राणू मृत्यूच्या 24 तासांच्या आत गोळा करणे आवश्यक असते जेणेकरून ते गोठवले जाऊ शकतात आणि एग फर्टिलायझर करण्यासाठी वापरले जाऊ शकतात.

तथापि, तज्ज्ञांचे म्हणणे आहे की जेव्हा शुक्राणू यापुढे गतिमान नसतात तेव्हा मृत्यूनंतर अनेक दिवसांनी त्याचे पीएसआर केले जाऊ शकते.

कॅप्लन मेडिकल सेंटरमधील आयव्हीएफ युनिटचे प्रमुख डॉ. युवल यांनी सांगितले की, आम्ही गतीशील शुक्राणू शोधतो आणि त्यांना प्राधान्य देतो, परंतु जो शुक्राणू गतिशील नसतो त्याचा अर्थ असा नाही की ते जिवंत नाही. एकदा ते स्थापित झाल्यानंतर ते कसे उपयोगात आणायचे हे आम्हाला माहित आहे.

7 ऑक्टोबर रोजी हमासच्या दहशतवाद्यांनी गाझा पट्टीतून इस्रायलवर हल्ला केला, ज्यामध्ये 1,400 हून अधिक इस्रायली मारले गेले. या काळात 200 हून अधिक लोकांना ओलीस ठेवण्यात आले होते.

तेव्हापासून हमासचा खात्मा करण्यासाठी इस्रायल गाझा पट्टीवर सातत्याने हल्ले करत आहे. गाझा पट्टीमध्ये आतापर्यंत 10,500 हून अधिक लोक मारले गेले आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: वाळपईत पावसाचं धूमशान

Cash For Job Scam: 'सोमवारपर्यंत चौकशी आयोग नेमा अन्यथा...'; कॅश फॉर जॉब प्रकरणी पाटकरांचा सावंत सरकारला अल्टिमेटम

Cyber Crime: एस्कॉर्ट सर्व्हिसच्या नावाखाली सुरू असलेल्या ७८ वेबसाईट्स ब्लॉक; गोवा पोलिसांचा दणका, दोघांना अटक

Rashi Bhavishya 15 November 2024: आरोग्यात सुधारणा होईल, नोकरी किंवा व्यवसायाच्या ठिकाणी प्रगती कराल; जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस

Goa Politics: मांद्रेतील जनतेच्या मनात कोण? मायकल लोबोंमुळे हवा तापली; अरोलकरांनी दिलं चॅलेंज

SCROLL FOR NEXT