Viral Video: "Hamas आमच्यावर हल्ला करणार हे त्यांना आधीच माहीती होते...", इस्रायलचा 6 फोटो पत्रकारांवर आरोप

Israel Hamas War: हे पत्रकार गाझा सीमेवर हमासच्या हल्ल्याचे कव्हरेज करत होते. यापैकी एका चित्रात गाझाचे स्थानिक पत्रकार हसन इस्लाया यांचे हमास प्रमुख याह्या सिनवार चुंबन घेताना दिसत आहेत.
"6 photojournalists knew in advance that Hamas would attack us...", Israel alleges.
"6 photojournalists knew in advance that Hamas would attack us...", Israel alleges.Dainik Gomantak
Published on
Updated on

"6 photojournalists knew in advance that Hamas would attack us...", Israel alleges:

कॅनडातील इस्रायलच्या राजनैतिकाने जागतिक वृत्त संस्था आणि मोठ्या मीडिया हाऊससाठी काम करणाऱ्या गाझाच्या फ्रीलान्स फोटो पत्रकारांच्या विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित केले आहेत.

गाझातील या फोटो पत्रकारांना ७ ऑक्टोबरच्या हमासच्या हल्ल्याची पूर्व माहिती होती, असा दावा त्यांनी केला. या हल्ल्यात हमासने 1400 इस्रायलची हत्या केली आणि 200 हून अधिक लोकांना ओलीस ठेवले.

टोरंटोमधील इस्रायली कॉन्सुल जनरल इदित शामीर यांनी इस्रायली मीडिया वॉचडॉग, Honest Reporting चा एक अहवाल शेअर केला आहे. त्यामध्ये असे म्हटले आहे की, जेव्हा हमासच्या दहशतवाद्यांनी इस्रायली सीमेवर हल्ला केला. त्यावेळी हे छायाचित्र पत्रकार तिथे आधीच उपस्थित होते. त्यामुळे या पत्रकारांना 7 ऑक्टोबरच्या हल्ल्याची आधीच माहिती होती असा संशय बळावतो.

इदित शमीरने गाझातील या दोन फ्रीलान्स पत्रकारांची छायाचित्रेही शेअर केली आहेत. हे पत्रकार गाझा सीमेवर हमासच्या हल्ल्याचे कव्हरेज करत होते. यापैकी एका चित्रात गाझाचे स्थानिक पत्रकार हसन इस्लाया यांचे हमास प्रमुख याह्या सिनवार चुंबन घेताना दिसत आहेत.

"6 photojournalists knew in advance that Hamas would attack us...", Israel alleges.
भारताविरुद्ध सतत विष ओकणारा लष्कर-ए-तैयबाचा दहशतवादी Akram Ghazi याची पाकिस्तानात हत्या

Honest Reportingच्या अहवालात सहा फ्रीलान्स फोटो पत्रकारांची ओळख पटली आहे. हसन इसलिया, युसूफ मसूद, अली महमूद, हातम अली, मोहम्मद फाक अबू मुस्तफा आणि यासर कुदीह अशी त्यांची नावे आहेत.

7 ऑक्टोबर रोजी इस्रायलवर हमासच्या हल्ल्यावेळी हे सर्व फोटो पत्रकार उपस्थित होते. हे फ्रीलान्स पत्रकार रॉयटर्स, द असोसिएटेड प्रेस (एपी) आणि द न्यूयॉर्क टाइम्ससाठी काम करत आहेत.

7 ऑक्टोबर रोजी त्यांनी हमासचे दहशतवादी इस्रायली रणगाडे जाळताना, इस्रायली लोकांना ओलीस ठेवताना आणि मृतदेह वाहून नेतानाचे फोटोही काढले.

"6 photojournalists knew in advance that Hamas would attack us...", Israel alleges.
Israel Hamas War: इस्रायली सैन्यातील अमेरिकन तरुणीची हत्या करणाऱ्या पॅलेस्टिनी मुलाला IDF ने केले ठार

इस्रायलने ७ ऑक्टोबरला हमासच्या हल्ल्याचे कव्हरेज करणाऱ्या फोटो पत्रकारांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे.

पत्रकारांचे हे कृत्य मानवतेविरुद्ध गुन्हा असून पत्रकारितेच्या नैतिक मूल्यांच्या विरुद्ध आहे. इस्त्रायली सरकारने हे पत्रकार ज्या माध्यम संस्थांसाठी काम करतात त्यांच्या ब्युरो प्रमुखांना पत्र जारी करून या प्रकरणावर स्पष्टीकरण मागितले आहे.

रॉयटर्सने आरोपांवर काय म्हटले?

या प्रकरणी रॉयटर्सने एक निवेदन जारी केले की, आम्हाला HonestReporting च्या अहवालाबद्दल आणि 7 ऑक्टोबरच्या हल्ल्याबद्दल रॉयटर्ससाठी रिपोर्टिंग करणाऱ्या दोन फ्रीलान्स पत्रकारांवरील आरोपांबद्दल माहिती आहे. फोटो पत्रकारांना 7 ऑक्टोबरच्या हल्ल्याची पूर्व माहिती होती हे आम्ही ठामपणे नाकारतो. आम्ही 7 ऑक्टोबर रोजी गाझा सीमेवर उपस्थित असलेल्या दोन स्वतंत्र छायाचित्रकारांकडून छायाचित्रे घेतली. हमासने दक्षिण इस्रायलवर रॉकेट डागल्यानंतर दोन तासांनी हे फोटो रॉयटर्सने प्रकाशित केले आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com