Donald Trump Dainik Gomantak
ग्लोबल

Explainer: इस्रायल अन् अमेरिकेचा इराणवर भीषण हल्ला! युद्धाचा भडका का उडाला? जाणून घ्या वादाचं 'मेन' कारण VIDEO

Why Israel And US Attacked Iran: 28 फेब्रुवारी 2026 हा दिवस जागतिक इतिहासात अत्यंत विनाशकारी दिवस म्हणून नोंदवला गेला.

Manish Jadhav

Why Israel And US Attacked Iran: 28 फेब्रुवारी 2026 हा दिवस जागतिक इतिहासात अत्यंत विनाशकारी दिवस म्हणून नोंदवला गेला. या दिवशी इस्रायल आणि अमेरिकेने अत्यंत आक्रमक पाऊल उचलत इराणवर भीषण लष्करी हल्ला चढवला. या मोहिमेदरम्यान इराणची राजधानी तेहरानसह अनेक शहरांवर एकाच वेळी क्षेपणास्त्रांचा वर्षाव करण्यात आला.

धक्कादायक बाब म्हणजे या संयुक्त हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांचे घर आणि कार्यालय यांनाही थेट लक्ष्य करण्यात आले. या हल्ल्यात इराणच्या अनेक अण्वस्त्र केंद्रांचे प्रचंड नुकसान झाल्याचा दावा केला जात आहे. सुदैवाने, या हल्ल्यातून खामेनेई थोडक्यात बचावले असून ते सध्या अज्ञात स्थळी लपून बसले असल्याची माहिती समोर येत आहे.

इस्रायल आणि अमेरिकेच्या (America) या भीषण कारवाईनंतर इराणनेही गप्प न बसता जशास तसे प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली. इराणने इस्रायल आणि अमेरिकेच्या लष्करी तळांना लक्ष्य करत 30 हून अधिक बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे डागली. यापूर्वीच इराणने इशारा दिला होता की, जर आमच्यावर हल्ला झाला तर आम्ही असा पलटवार करु ज्याचा विचारही कोणी केला नसेल. सध्या संपूर्ण मध्यपूर्वेत आगीचे लोट आणि धुराचे साम्राज्य पसरले असून, या संघर्षामुळे जगात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

या खूनी संघर्षामागे सर्वात मोठे कारण म्हणजे इराणची अण्वस्त्र सज्ज होण्याची वाढती महत्त्वाकांक्षा. इराण सातत्याने अण्वस्त्रे बनवण्याच्या प्रयत्नात असून त्याने मोठ्या प्रमाणावर युरेनियमचा साठा जमा केला आहे. अमेरिका आणि इस्रायलला असा मोठा धोका वाटत होता की इराण गुप्तपणे अणुबॉम्ब तयार करुन जगासाठी संकट निर्माण करु शकतो. यापूर्वी जून 2025 मध्येही इराणच्या (Iran) अण्वस्त्र कार्यक्रमाला रोखण्यासाठी हल्ला करण्यात आला होता, मात्र तरीही इराणने आपले काम थांबवले नाही. त्यामुळेच यावेळी त्याचा अण्वस्त्र कार्यक्रम कायमचा उद्ध्वस्त करण्याच्या उद्देशाने अमेरिकेने 'ॲक्शन मोड'मध्ये येत हे पाऊल उचलले आहे.

या युद्धाचे दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे इराणकडून हिजबुल्लाह, हमास, हूती आणि इराक-सीरियातील शिया मिलिशिया यांसारख्या गटांना मिळणारा खंबीर पाठिंबा. 2023-24 च्या गाझा युद्धादरम्यान या गटांनी अमेरिका आणि इस्रायलला मोठ्या प्रमाणावर त्रास दिला होता, ज्याची मूळ प्रेरणा इराण असल्याचे मानले जाते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसमोर सर्व अण्वस्त्र कार्यक्रम बंद करण्याच्या आणि दहशतवादी गटांना पाठिंबा न देण्याच्या कठोर अटी ठेवल्या होत्या, मात्र इराणने त्या धुडकावून लावल्या.

परिणामी, ट्रम्प यांनी चर्चेचे दरवाजे बंद करत लष्करी कारवाईचा आदेश दिला, ज्यामुळे आज इराणमध्ये रक्ताचे पाट वाहत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT