Israel PM Benjamin Netanyahu Dainik Gomantak
ग्लोबल

Israel Iran Tensions: इराणच्या हल्ल्यापूर्वी इस्रायलने केली होती तयारी, अझरबैजानमध्ये तयार केले होते 3 एअरबेस

Israel Iran Tensions: इस्त्रायल आणि हमास यांच्यातील संघर्ष थांबण्याचं नाव घेत नाहीये. तर दुसरीकडे, इस्त्रायल आणि इराण यांच्यातील स्ंघर्ष शिगेला पोहोचला आहे.

Manish Jadhav

Israel Iran Tensions: इस्त्रायल आणि हमास यांच्यातील संघर्ष थांबण्याचं नाव घेत नाहीये. तर दुसरीकडे, इस्त्रायल आणि इराण यांच्यातील स्ंघर्ष शिगेला पोहोचला आहे. इराणच्या 14 एप्रिलच्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून इस्रायलने 19 एप्रिल रोजी हल्ला केला होता, त्यानंतर आता अशी माहिती समोर येत आहे की, इराणच्या हल्ल्यापूर्वीच इस्रायलने इराणवर कारवाई करण्याची तयारी केली होती आणि अझरबैजानमधील अनेक एअसबेसवर आपले सैन्य तैनात केले होते.

इस्रायलने 1 एप्रिल रोजी दमास्कसमधील इराणच्या दूतावासावर हल्ला केला होता, त्याला प्रत्युत्तर म्हणून इराणने 14 एप्रिल रोजी इस्रायलवर ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी हल्ला केला होता. त्यानंतर दोघांमध्ये संघर्षाची ठिणगी पडली. 19 एप्रिल रोजी इस्रायलने इराणी शहर इस्फहानवर हल्ला केला. त्यानंतर आता मिळालेल्या माहितीनुसार, इराणच्या हल्ल्यापूर्वीच इस्रायलने इराणवर हल्ला करण्याची तयारी केली होती.

अझरबैजानमध्ये इस्रायलचे तीन एअरबेस

दरम्यान, इस्रायलने आपल्या कारवायांसाठी गुप्तपणे अझरबैजानचे 3 एअरबेस तयार केले होते, ज्यामध्ये नखचिवान, कुर्दमीर, गांजा या शहरांमध्ये ड्रोन आणि सर्व्हिलान्सबरोबरच फाइटर एयर क्राफ्टच्या ऑपरेशनची तयारी केली जात होती.

इराणने धमकी दिली?

इराणच्या आण्विक संरक्षण आणि सुरक्षा दलाचे प्रमुख जनरल अहमद हकताब यांनी इस्रायलला धमकी दिली आहे. इराण आपल्या आण्विक धोरणात बदल करेल, असे त्यांनी म्हटले आहे. हकताब यांनी म्हटले की, इस्रायलने इराणच्या आण्विक साइटला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केल्यास आम्ही इस्रायलची आण्विव साइट नष्ट करु.

इस्रायलच्या आण्विक साइटची संपूर्ण माहिती आहे

इराणचे जनरल अहमद हकताब यांनी दावा केला की, त्यांच्याकडे इस्रायलच्या आण्विक साइटची संपूर्ण माहिती आहे. प्लांट कुठे आहे हे देखील आम्हाला माहित आहे. इस्रायलच्या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी आमचे बोट ट्रिगरवर आहे. इस्त्रायलने इराणविरुद्ध अजून काही करण्याचा प्रयत्न केल्यास त्याला चोख प्रत्युत्तर दिले जाईल.

इस्रायलही इराणला चोख प्रत्युत्तर देण्याची तयारी करतोय

इराणच्या हल्ल्यानंतर इस्रायल पूर्णपणे तयार आहे. अलीकडेच इस्रायलच्या वॉर कॅबिनेटनेही इराणला चोख प्रत्युत्तर देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. मात्र, या शियाबहुल इराणला कसे आणि केव्हा प्रत्युत्तर दिले जाईल हे अद्याप ठरलेले नाही. विशेष म्हणजे या वॉर कॅबिनेटमध्ये इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू, संरक्षण मंत्री योव गॅलेंट आणि माजी लष्करप्रमुख बेनी गँट्झ यांचा समावेश आहे. वॉर कॅबिनेटच्या मंजुरीनंतर इस्रायल इराणवर मोठा हल्ला करु शकतो, असे मानले जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cricket Controversy: "आपसी रंजिश, गुस्सा और खराब भाषा..." ज्युनियर्सवर हल्ल्याच्या आरोपानंतर बांगलादेशी कर्णधाराचा मोठा खुलासा, पोस्ट करत म्हणाली...

मोठा आवाज, टिंटेड गाडी आणि जीवघेणी स्टंटबाजी! गोव्यात प्रसिद्ध इन्फ्लुएंसरची मॉडिफाईड BMW जप्त

Terror Attack In Jammu Kashmir: 'ऑपरेशन सिंदूर'चा बदला! जम्मू-काश्मीरमध्ये मोठ्या दहशतवादी हल्ल्याची तयारी सुरु, गुप्तचर रिपोर्टमधून धक्कादायक खुलासा

MS Dhoni Retirement: 'कॅप्टन कूल'च्या निवृत्तीबद्दलचा सस्पेन्स संपला! एमएस धोनी IPL 2026 खेळणार की नाही? CSK च्या CEO ने स्पष्टच सांगितलं, म्हणाले...

Horoscope: 2026 साठी काहीच दिवस बाकी! शनि-गुरूच्या हातात नशिबाचे चक्र, 'या' राशींना मिळणार भाग्याची खास साथ; मात्र काहींना साडेसातीचा धोका फार

SCROLL FOR NEXT