Israel Hits Hezbollah Dainik Gomantak
ग्लोबल

Israel Hits Hezbollah: सीरियातील हिजबुल्लाच्या ठिकाणांना इस्रायलनं केलं लक्ष्य; हल्ल्याचा व्हिडिओही केला प्रसिद्ध

Israel Hits Hezbollah: इस्त्रायल आणि हिजबुल्ला दोघेही एकमेकांच्या ठिकाणांना लक्ष्य करत आहेत. यातच आता, इस्रायलने पुन्हा एकदा हिजबुल्लाच्या ठिकाणांना लक्ष्य केले आहे.

Manish Jadhav

Israel Hits Hezbollah: इस्त्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध थांबण्याचं नाव घेत नाहीये. इस्त्रायल सातत्याने गाझावर हवाई हल्ले करत आहे. तर दुसरीकडे, इस्त्रायल आणि हिजबुल्ला यांच्यातील संघर्षानेही परिसीमा गाठली आहे. इस्त्रायल आणि हिजबुल्ला दोघेही एकमेकांच्या ठिकाणांना लक्ष्य करत आहेत. यातच आता, इस्रायलने पुन्हा एकदा हिजबुल्लाच्या ठिकाणांना लक्ष्य केले आहे. इस्त्रायली सैन्याने बुधवारी पहाटे सांगितले की, त्यांनी लेबनीज दहशतवादी संघटना हिजबुल्लाला रोखण्यासाठी सीरियामधील त्याच्या ठिकाणांना लक्ष्य केले आहे. गाझामध्ये हमासच्या दहशतवाद्यांशी लढत असताना इस्त्रायल हिजबुल्लाला तोंड देण्यासही तयार असल्याचे वारंवार या हल्ल्यांच्या माध्यमातून दर्शवून देत आहे. अलीकडच्या काही दिवसांत इस्रायलने हिजबुल्लाला लक्ष्य करुन हल्ले केले आहेत.

बॉम्बस्फोटाचा व्हिडिओ जारी

इस्रायली सैन्याने एका निवेदनात म्हटले की, "अचूक गुप्तचर रिपोर्टच्या आधारे हिजबुल्लाच्या ठिकाणांवर हल्ला केला.'' विशेष म्हणजे, इस्रायलने बॉम्बस्फोटाचा व्हिडिओही प्रसिद्ध केला आहे. हिजबुल्ला सीरियातून इस्त्रायलवर हल्ले करत आहे.

इस्रायलचा कडक इशारा

इस्रायली लष्कराच्या वतीने सांगण्यात आले की, इस्रायल आपल्या हद्दीत होणाऱ्या सर्व कारवायांसाठी सीरियाच्या राजवटीला जबाबदार धरते. सीरियाच्या सीमेवर हिजबुल्लाची पकड मजबूत होईल अशा कोणत्याही कृतीला इस्त्रायली लष्कर बळ देऊ देणार नाही. गेल्या काही तासांत आयडीएफने दक्षिण लेबनॉनमधील हिजबुल्लाच्या अनेक ठिकाणांना आणि दहशतवादी पायाभूत सुविधांवर हल्ला केल्याचेही लष्कराने सांगितले. दक्षिण लेबनॉनमधील धायरा आणि तायर हर्फा या भागात धोका दूर करण्यासाठी असा हल्ला करण्यात आला आहे.

सीरियन ऑब्झर्व्हेटरी फॉर ह्युमन राइट्स या ब्रिटनस्थित संघटनेने सांगितले की, इस्रायली विमानांनी सोमवारी आणि मंगळवारी उशिरा सीरियामध्ये हल्ले केले. दक्षिण सीरियातील धायरा भागात शस्त्रास्त्रांचा साठा असलेला डेपो नष्ट करण्यात आला. याशिवाय, एक लष्करी तळ देखील नष्ट करण्यात आला जो इराण आणि हिजबुल्ला समर्थित दहशतवादी गोलन हाइट्सवरुन रॉकेट सोडण्यासाठी वापरत होते. गृहयुद्ध सुरु झाल्यापासून इस्रायली सैन्याने सीरियामध्ये शेकडो हल्ले केले आहेत, विशेषत: इराण समर्थक ठिकाणांना लक्ष्य केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Online Betting Raid: गोवा पोलिसांचा डबल धमाका! ऑनलाइन सट्टेबाजी आणि दलालांवर एकाच वेळी कारवाईचा बडगा

Dewald Brevis: 22 वर्षीय बेबी एबीचं वादळ, ऑस्ट्रेलियाला धुतलं, विराट कोहली- बाबर आझमचा विक्रम उद्ध्वस्त

Goa Tourism: 'अन्यथा पर्यटन सेवा बंद करू!' म्हादईवरील रिव्हर राफ्टींग निधीसाठी पंचायत आक्रमक

Cristiano Ronaldo In Goa: गोव्यात 'ख्रिस्तियानो रोनाल्डो'ला पाहण्याचे स्वप्न अधांतरी; खेळण्याबाबत अनिश्चितता कायम

Rahul Gandhi: "चोरी चोरी, चुपके चुपके..." राहुल गांधींनी केला 'वोट चोरीचा' व्हिडिओ; निवडणूक आयोगावर साधला निशाणा

SCROLL FOR NEXT