Antony Blinken Dainik Gomantak
ग्लोबल

Israel-Hamas War: हमाससोबत सुरु असलेल्या युद्धादरम्यान अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री इस्रायलमध्ये दाखल, 'ही' मोठी मागणी...

Israel: तेल अवीवच्या बाहेरील इस्त्रायलच्या बेन गुरियन आंतरराष्ट्रीय विमानतळावर स्थानिक वेळेनुसार सकाळी 10:30 वाजता ब्लिंकेन युद्धग्रस्त देशात उतरले.

Manish Jadhav

Israel-Hamas War: इस्रायल आणि हमास यांच्यात सुरु असलेल्या भीषण युद्धादरम्यान अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटोनी ब्लिंकन इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू आणि इतर इस्रायली नेत्यांना भेटण्यासाठी तेल अवीवमध्ये पोहोचले आहेत.

तेल अवीवच्या बाहेरील इस्त्रायलच्या बेन गुरियन आंतरराष्ट्रीय विमानतळावर स्थानिक वेळेनुसार सकाळी 10:30 वाजता ब्लिंकेन युद्धग्रस्त देशात उतरले.

त्यांनी विमानतळावरच इस्रायलचे परराष्ट्र मंत्री एली कोहेन आणि अधिकाऱ्यांची भेट घेतली. अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांनी अद्याप कोणतीही सार्वजनिक टिप्पणी केली नाही.

ब्लिंकन ही मोठी मागणी करु शकतात

दरम्यान, या भेटीदरम्यान ब्लिंकन काही अमेरिकनांसह हमासने अपहरण केलेल्या नागरिकांच्या सुटकेची मागणी करतील अशी अपेक्षा आहे. याव्यतिरिक्त, ते संयम ठेवण्याचे आवाहन करतील.

इस्त्रायल आणि हमास यांच्यात सुरु असलेल्या युद्धात आतापर्यंत किमान 1200 इस्रायली ठार झाले आहेत, तर गाझामधील हवाई हल्ल्यात 1100 हून अधिक पॅलेस्टिनींना आपला जीव गमवावा लागला आहे.

इस्रायलमध्ये (Israel) सुमारे 22 अमेरिकन नागरिकांचा मृत्यू झाला आहे. ब्लिंकन पंतप्रधान नेतन्याहू यांच्यासह इस्रायली अधिकाऱ्यांना भेटणार आहेत. ते शुक्रवारी अम्मानमध्ये पॅलेस्टिनी राष्ट्राध्यक्ष महमूद अब्बास आणि जॉर्डनचे राजे अब्दुल्ला द्वितीय यांची भेट घेणार आहेत.

तर 22 अमेरिकन नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे

यापूर्वी, यूएस व्हाईट हाऊसने म्हटले होते की, इस्रायलवरील हमासच्या (Hamas) हल्ल्यात सुमारे 22 अमेरिकन नागरिकांचा मृत्यू झाला आहे. येत्या काही दिवसांत हा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिव्हन म्हणाले की, पॅलेस्टिनी दहशतवादी गट हमासने ओलिस ठेवलेल्यांमध्ये आणखी काही अमेरिकन असू शकतात. ओलिसांची सुटका करण्यासाठी अमेरिका इस्रायलशी चर्चा करत असल्याचे त्यांनी सांगितले.

याआधी अमेरिकेने या हल्ल्यात 14 अमेरिकनांचा मृत्यू झाल्याची पुष्टी केली होती. "आज आम्हाला आणखी किती अमेरिकन बेपत्ता आहेत याची थोडीशी कल्पना आली आहे," असेही सुलिव्हन यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

आम्हाला माहित आहे की, त्यापैकी बरेच अमेरिकन सध्या हमासने ओलिस ठेवले आहेत. मला वाटते की, ही संख्या आणखी वाढू शकते आणि या शक्यतेसाठी आपण सर्वांनी स्वतःला तयार करणे आवश्यक आहे.” असेही सुलिव्हन म्हणाले होते.

'हमास'चा इस्रायलवरील हल्ला...

याआधी इस्रायलचा नाश करणे आणि ज्यू लोकांची हत्या करणे हे हमासचे उद्दिष्ट असल्याचे बायडन म्हणाले. “आपल्या आयुष्यात असे काही क्षण येतात जेव्हा जगावर वाईट गोष्टी लादल्या जातात,” असे बायडन यांनी व्हाईट हाऊसमधून राष्ट्राला संबोधित करताना सांगितले.

इस्रायलचे लोकांनी या शनिवार आणि रविवार असे क्षण अनुभवले. हा हल्ला हमास या दहशतवादी संघटनेने केला, ज्याचा उद्देश ज्यूंना मारणे हा आहे.'', असेही बायडन पुढे म्हणाले.

दुसरीकडे, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडन यांनी यापूर्वी इस्रायलला पाठिंबा देण्याची आपली वचनबद्धता व्यक्त केली आहे.

इस्रायलला पाठिंबा मिळवून देण्यासाठी आणि पॅलेस्टिनी दहशतवादी गट हमासविरुद्ध आवश्यक कारवाई करण्यासाठी अमेरिकेने एक मोठी जागतिक राजनैतिक मोहीम सुरु केली आहे. हमासने शनिवारी इस्रायलवर अनेक हल्ले सुरु केले ज्यात शेकडो लोक मारले गेले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Village Tourism: "आम्हाला प्रकल्प हवाच!" सुर्ला ग्रामस्थांकडून इको-टुरिझमचे स्वागत; शासनाच्या प्रकल्पाला ग्रामसभेचा पाठिंबा

TCS Layoff: मोठी बातमी! टीसीएस देणार 12,000 जणांना देणार नारळ; सीईओ म्हणाले, 'भविष्यासाठी गरजेच...'

Goa Live News: नागपंचमीसाठी नागोबा सज्ज

Bison In Sawantwadi: एक, दोन नव्हे… थेट 15 गवारेड्यांचा धुमाकूळ! लोकांना फुटला घाम, पाहा थरकाप उडवणारा VIDEO

तुम्हालाही विनाकारण राग येतोय? सावधान! असू शकते रक्तातील साखरेच्या बदलांचे लक्षण, 'या' गोष्टी ठेवा लक्षात

SCROLL FOR NEXT