Donald Trump
Donald TrumpDainik Gomantak

Israel Hamas War: ट्रम्प यांनी इस्रायलच्या युद्ध तयारीवर प्रश्न केले उपस्थित, नेतन्याहू हमासवरील हल्ल्यासाठी...

Israel-Hamas Conflict Update: इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धात आतापर्यंत 2300 हून अधिक लोकांनी आपला जीव गमावला आहे.
Published on

Israel-Hamas Conflict Update: इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धात आतापर्यंत 2300 हून अधिक लोकांनी आपला जीव गमावला आहे, ज्यामध्ये इस्रायलमधील 1200 आणि गाझामधील 1000 हून अधिक लोकांचा समावेश आहे.

त्याचवेळी, इस्रायलच्या प्रत्युत्तरादाखल कारवाईनंतर गाझामध्ये हाहाकार माजला आहे. दरम्यान, गाझाला संपवल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही, असे इस्रायलच्या संरक्षणमंत्र्यांनी जाहीर केले आहे.

दरम्यान, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू (Benjamin Netanyahu) यांच्यावर प्रश्न उपस्थित केले आहेत. चला तर मग ट्रम्प नेतन्याहूंबद्दल काय म्हणाले ते जाणून घेऊया...

ट्रम्प यांनी नेतन्याहूंवर निशाणा साधला

हमासने इस्रायलवर केलेल्या हल्ल्याचा अनेक देश निषेध करत आहेत. त्याचवेळी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प म्हणाले की, इस्रायल आणि पंतप्रधान नेतन्याहू हमासवरील हल्ल्यासाठी तयार नव्हते. या हल्ल्यामुळे नेतान्याहू खूप दुखावले गेले आहेत.

यापूर्वी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी इस्रायलवरील हल्ल्यासाठी अमेरिकेचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांना जबाबदार धरले आहे. सोमवारी न्यू हॅम्पशायरमध्ये भाषणादरम्यान अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांचे व्हाईट हाऊसचे उत्तराधिकारी आणि विद्यमान अध्यक्ष जो बायडन यांच्यावर टीका केली.

ट्रम्प म्हणाले की, लोक आमच्या देशात येत आहेत आणि ते कोठून येत आहेत हे आम्हाला माहिती नाही. बऱ्याच प्रकरणांमध्ये, हे तेच लोक असू शकतात ज्यांनी नुकतेच इस्रायलवर हल्ला केला आहे.

Donald Trump
Israel-Hamas War: अन्न,पाणी आणि विजेविना गाझाची होरपळ, जिवनावश्यक वस्तूंचा पुरवठा बंद

हमासचा नायनाट

इस्रायलच्या संरक्षणमंत्र्यांनी याआधी जे काही सांगितले, ते प्रत्यक्षात आणण्यात त्यांचे लष्कर व्यस्त आहे. आधी इस्रायलच्या लढाऊ विमानांनी आकाशातून बॉम्बफेक करुन हमासचे तळ उद्ध्वस्त केले आणि आता हमासच्या (Hamas) दहशतवाद्यांचा खात्मा करता यावा म्हणून इस्रायली संरक्षण दलाने संपूर्ण गाझाला वेढा घातला आहे.

खरे तर, हमासच्या दहशतवाद्यांनी ऑक्टोबर 2015 मध्ये इस्रायलमध्ये ज्या प्रकारे घुसखोरी करुन अत्याचार केले, त्यावरुन केवळ इस्रायलमध्येच नव्हे तर जगाच्या मोठ्या भागात द्वेषाच्या उकळ्या फुटल्या आहेत.

ज्याप्रकारे लहान मुले आणि महिलांवर अत्याचार केले, त्यांच्या घरात घुसून त्यांची हत्या करण्यात आली. या कृतीने हमासच्या अंतावर शिक्कामोर्तब केले.

Donald Trump
Israel-Hamas War: 25 वर्षीय इनबार लिबरमॅन ठरली हमासच्या दहशतवाद्यांचा 'कर्दनकाळ', हल्ल्यात 24 दहशतवादी ठार!

हमास ISIS पेक्षा वाईट आहे

इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी हमासचे वर्णन ISIS पेक्षाही भयंकर असे केले तर इस्रायलच्या पाठीशी उभी असलेली महासत्ता अमेरिकेनेही या लढ्याला दहशतवादाविरुद्धचे युद्ध म्हटले आहे.

हमासच्या कारवायांचा हा परिणाम आहे की, सहा दिवसांपूर्वी गाझामधील लोक इस्रायलवर झालेल्या हल्ल्याचा आनंद साजरा करत होते, आज त्यांच्या आनंदावर विरजन पडले आहे.

जे इस्रायली लोकांबाबत रानटीपणाने आनंद साजरा करत होते, आज त्यांच्या दुःखात अश्रू ढाळायला कोणी उरले नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com