Israel-Hamas War: गाझामध्ये हमास आणि इस्रायल यांच्यात घनघोर युद्ध सुरु आहे. युद्धविराम करारासाठी वाटाघाटी होण्याची शक्यता आता कमी दिसतेय. दरम्यान, टाईम्स ऑफ इस्रायलने आपल्या एका वृत्तात म्हटले आहे की, इस्रायलने गाझामधील लढाई कायमची थांबवण्याची हमासची मागणी फेटाळून लावली आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी युद्धाबाबत आपल्या जुन्या भूमिकेचा पुनरुच्चार केला आहे. जोपर्यंत हमास पूर्णपणे नष्ट होत नाही आणि ओलीसांची सुरक्षित सुटका होत नाही तोपर्यंत लढाई थांबणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे. नेतन्याहू म्हणाले की, हमासला एक सोपा पर्याय देण्यात आला होता - एकतर आत्मसमर्पण करा किंवा मरा. त्यांच्याकडे आता कोणताही पर्याय उरलेला नाही.
दरम्यान, गाझामधील जमिनी हल्ल्यात आतापर्यंत 134 इस्रायली सैनिक ठार झाले असून सुमारे 740 जखमी झाले आहेत. इस्त्रायली लष्कराच्या हवाल्याने संयुक्त राष्ट्राने ही माहिती दिली आहे. गाझामध्ये आणखी तीन इस्रायली सैनिक ठार झाले आहेत, त्यात बटालियन 931 मधील 19 वर्षीय सार्जंट आणि 20 आणि 21 वयोगटातील दोन लेफ्टनंट यांचा समावेश आहे, असे वृत्त अल जझीराने दिले.
इस्रायल डिफेन्स फोर्सेस (आयडीएफ) ने लेबनॉनमधील हिजबुल्लाहच्या ऑपरेशनल कमांड सेंटरवर हल्ला केला. आयडीएफच्या युद्धविमानांनी लेबनॉनमधील हिजबुल्लाहच्या ऑपरेशनल कमांड सेंटरवर हल्ला केला, असे आयडीएफने बुधवारी टेलिग्रामवर दिलेल्या निवेदनात म्हटले. आयडीएफने सांगितले की, त्यांच्या सैन्याने मेतुला भागात सीमेजवळ लेबनॉनमधून सुरक्षा सीमेकडे जाणाऱ्या अनेक दहशतवाद्यांना ओळखले. त्यानंतर आयडीएफ जवानांनी त्यांच्यावर गोळीबार केला.
दुसरीकडे, यावर्षी 7 ऑक्टोबर रोजी हमासने सीमेपलीकडील गाझा पट्टीतून इस्रायलवर मोठा रॉकेट हल्ला केला, ज्यामध्ये 1,200 हून अधिक लोक मारले गेले आणि सुमारे 240 लोकांना ओलीस बनवले गेले. इस्रायलने प्रतिआक्रमण सुरु केले, गाझाची संपूर्ण नाकेबंदी करण्याचे आदेश दिले आणि हमासच्या सैनिकांना संपवण्याच्या आणि ओलिसांची सुटका करण्याच्या उद्दिष्टासह पॅलेस्टिनी एन्क्लेव्हमध्ये घुसखोरी केली. या संघर्षात गाझामध्ये आतापर्यंत 20,000 हून अधिक लोक मारले गेल्याचे स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितले. 24 नोव्हेंबर रोजी, कतारने इस्रायल आणि हमास यांच्यात तात्पुरता युद्धविराम आणि काही कैदी आणि ओलीस यांची देवाणघेवाण तसेच गाझासाठी मानवतावादी मदतीचा करार केला. युद्धविराम अनेक वेळा वाढवण्यात आला आणि 1 डिसेंबर रोजी संपला.
दरम्यान, 10 आठवड्यांपूर्वी युद्ध सुरु झाल्यापासून गाझामधील अर्धा दशलक्षाहून अधिक लोक उपासमारीला सामोरे जात आहेत. संयुक्त राष्ट्राने गुरुवारी जारी केलेल्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. जागतिक खाद्यान्न कार्यक्रमाचे मुख्य अर्थशास्त्रज्ञ आरिफ हुसेन म्हणाले की, गाझामधील जवळजवळ प्रत्येकजण उपासमारीला सामोरे जात आहे अशी परिस्थिती आहे. इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध याच पातळीवर सुरु राहिल्यास आणि पुरेशा प्रमाणात अन्नाचा पुरवठा सुनिश्चित न केल्यास येत्या सहा महिन्यांत लोकसंख्येला तीव्र उपासमारीला सामोरे जावे लागू शकते, असा इशारा त्यांनी दिला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.