Landlord in Chicago killed 6 years Muslim boy|Israel Hamas War Dainik Gomantak
ग्लोबल

Israel Hamas War मुळे हेट क्राइम फोफावला, सहा वर्षांच्या मुस्लिम चिमुकल्यावर चाकूने 26 वार

“त्याला सर्व काही आवडायचे, त्याचे प्रत्येकावर प्रेम होते आणि त्याला फिरायलाही आवडायचे. जगात घडत असलेल्या या मोठ्या समस्यांबद्दल त्याला काहीच माहिती नाही. पण त्याला त्याची किंमत मोजावी लागली,” अशा शब्दात या मुलाच्या आईने आपल्या भावनांना वाट करून दिली.

Ashutosh Masgaunde

Israel Hamas War sparks hate crime, six-year-old Muslim boy stabbed 26 times in USA:

इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम जगातील इतर देशांमध्येही दिसून येत आहे. अमेरिकेतील शिकागोमध्ये एका व्यक्तीने सहा वर्षांच्या चिमुरड्यावर चाकूने हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. या हल्ल्यात मुलाचा मृत्यू झाला आहे.

शिकागो, इलिनॉय येथील एका व्यक्तीवर इस्रायल-हमास युद्धातून उद्भवलेल्या हेट क्राइमच्या गुन्ह्यात एका 6 वर्षाच्या मुस्लिम मुलाची हत्या केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी सांगितले की, या व्यक्तीवर 32 वर्षीय महिलेलाही गंभीर जखमी केल्याचा आरोप आहे.

चिमुरड्यावर 26 वार

विल काउंटी शेरीफ कार्यालयाने सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, या घटनेचा द्वेषाच्या गुन्ह्याशी संबंध आहे का याचा तपास तपासकर्ते करत आहेत.

याशिवाय आरोपीने दोघेही मुस्लिम असल्याने त्यांच्यावर हल्ला केला होता का, याचाही तपास सुरू आहे.

शेरीफच्या कार्यालयाने सांगितले की, रविवारी दोघेही घरात जखमी अवस्थेत आढळले. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले.

मात्र, रुग्णालयात मुलाला मृत घोषित करण्यात आले. पोलिसांनी सांगितले की, मुलावर चाकूने 26 वार करण्यात आले. याशिवाय महिलेच्या अंगावर डझनभराहून अधिक चाकूच्या जखमा आढळून आल्या आहेत.

हल्ल्यासाठी लष्करी चाकूचा वापर

अधिकार्‍यांनी सांगितले की, महिलेने आरोपीशी संघर्ष केल्यानंतर कसाबसा 911 वर कॉल केला. त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी पोलिसांना दोन्ही पीडितांच्या छातीवर, धडावर आणि डोक्यावर चाकूच्या अनेक जखमा आढळल्या.

शवविच्छेदनादरम्यान मुलाच्या ओटीपोटातून सात इंच ब्लेड असलेला एक सेरेटेड लष्करी शैलीचा चाकू काढण्यात आला, असे निवेदनात म्हटले आहे.

आरोपीला अटक

या प्रकरणातील आरोपीचे नाव जोसेफ कझुबा (71) असे आहे. त्याला त्याच्या घराजवळून अटक केल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याच्या कपाळावर जखमेच्या खुणा आढळल्या. या व्यक्तीने हेट क्राइम म्हणून ही घटना घडवून आणल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

आईसोबत राहायचा मृत चिमुरडा

त्याचवेळी, अमेरिकन-इस्लामिक रिलेशन्सच्या शिकागो कार्यालयाने कुटुंबातील एका सदस्याचा हवाला देत मुलाचा मृत्यू झाल्याचे सांगितले आहे. तो पॅलेस्टिनी-अमेरिकन होता. जो त्याची आई हनान शाहीनसोबत राहत होता.

इस्रायलने गेल्या रविवारी हमास विरुद्ध युद्ध घोषित केले आहे. त्यानंतर गाझापट्टीत इस्रायली सैन्याने हमास संबंधीतांसह गाझा पट्टीमध्ये बहुसंख्य सामान्य पॅलेस्टिनी लोकांचा मृत्यू झाला आहे.

तसेच यामुळे जगातही दोन गट पडले आहेत. काहीजण इस्रायलला तर काहीजण पॅलेस्टाईनला पाठींबा देत आहेत. यातूनच हेट क्राइमला चालना मिळत असून, वरील प्रकार याचेच उदाहरण आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: 17 वर्षीय मुलीला पळवून नेऊन केला लैंगिक अत्याचार, डिचोलीतील घटनेनं खळबळ; कणकवलीच्या तरुणाला अटक

Makharotsav: ..उत्सवमूर्ती जिवंत झाल्याचा आभास देणारा 'मखरोत्सव', गोव्यातील लोकसंस्कृतीचे दर्शन

Viral Video: 'खतरों के खिलाडी' वाली स्टंटबाजी, पठ्ठ्याचा सोशल मीडियावर व्हिडिओ तूफान व्हायरल; नेटकरी म्हणाले...

मनोज परबांच्या कार्यकर्त्यावर मंत्री नीलकंठ हळर्णकर धावून गेले; कोलवाळमध्ये आरजी आणि भाजप समर्थक आमने-सामने Watch Video

Harus Rauf Controversy: रौफला '6-0' आणि 'प्लेन क्रॅश'ची नक्कल भोवली! फायनलआधी 'ICC'नं केली कारवाई, भारताशी पंगा घेणं पडलं भारी

SCROLL FOR NEXT