Emergency landing of Air India Express Dubai-Amritsar flight in Karachi:
दुबईहून अमृतसरला येणाऱ्या एअर इंडिया एक्सप्रेसच्या विमानाचे शनिवारी कराचीत इमर्जन्सी लँडिंग करावे लागले. कारण एका प्रवाशाला वैद्यकीय समस्या झाली होती आणि त्याला त्वरित मदतीची आवश्यकता होती. एअर इंडिया एक्सप्रेसच्या प्रवक्त्याने रविवारी ही माहिती दिली.
एअरलाइन्सच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, विमान प्रवाशांना घेऊन सकाळी 8.51 वाजता दुबईहून निघाले. विमानातील एका प्रवाशाला अचानक वैद्यकीय समस्या निर्माण झाली.
त्यामुळे या विमनाचे कराचीमध्ये दुपारी 12.30 वाजता इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. प्रवाशाला तत्काळ वैद्यकीय सेवा प्रदान करण्यात आली. प्रवाशावर उपचार केल्यानंतर विमानाने कराचीहून अमृतसरसाठी दुपारी 2.30 वाजता उड्डाण केले.
एअर इंडिया एक्सप्रेसच्या प्रवक्त्याने सांगितले की, कराची येथील विमानतळावरील डॉक्टरांनी आवश्यक औषधे दिली आणि वैद्यकीय तपासणीनंतर प्रवाशाला विमानतळाच्या वैद्यकीय पथकाने फ्लाइटमध्ये चढण्यास परवानगी दिली. स्थानिक वेळेनुसार दुपारी 2.30 वाजता विमान कराचीहून अमृतसरसाठी रवाना झाले.
या घटनेनंतर विमान कंपनीच्या प्रवक्त्याने कराची विमानतळावरील स्थानिक अधिकाऱ्यांचे आभार मानले. प्रवक्ता म्हणाले, आम्ही कराची विमानतळावरील स्थानिक अधिकाऱ्यांचे तत्पर प्रतिसाद आणि मदतीबद्दल त्यांचे आभार व्यक्त करू इच्छितो.
यापूर्वी, 27 सप्टेंबर रोजी करीपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून दुबईला जाणारे एअर इंडिया एक्स्प्रेसचे विमान टेक ऑफ केल्यानंतर सुमारे एक तासाने कन्नूरच्या दिशेने वळवण्यात आले होते. कारण वैमानिकाला विमानाच्या कार्गो होल्डमध्ये आगीचा इशारा देणारा दिवा दिसला होता. त्यावेळी फ्लाइटमध्ये क्रू मेंबर्ससह सुमारे 176 लोक होते.
जुलै महिन्यातही अशीच घटना घडली होती. मुंबईहून रांचीला जाणारे इंडिगोचे विमान एका प्रवाशाच्या वैद्यकीय आणीबाणीमुळे नागपूर विमानतळाकडे वळवण्यात आले. उतरल्यावर प्रवाशाला रुग्णालयात नेण्यात आले होते, तरी आजारपणामुळे त्याचा मृत्यू झाला.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.