Muslim Women Dainik Gomantak
ग्लोबल

Israel-Hamas War: युद्घग्रस्त गाझामध्ये 9000 महिलांचा मृत्यू; दररोज 160 हून अधिक महिला मुलांना देतायेत जन्म

Muslim Women: इस्रायल आणि हमास यांच्यात सुरु असलेल्या युद्धादरम्यान गाझामधून थरकाप उडवणाऱ्या गोष्टी समोर येत आहेत.

Manish Jadhav

Israel-Hamas War:

इस्रायल आणि हमास यांच्यात सुरु असलेल्या युद्धादरम्यान गाझामधून थरकाप उडवणाऱ्या गोष्टी समोर येत आहेत. इस्रायलच्या हल्ल्याने उद्ध्वस्त होत असलेल्या गाझामधील परिस्थिती अत्यंत वाईट असल्याचे हमास संचालित आरोग्य मंत्रालयाचे म्हणणे आहे. येथील 60 हजारांहून अधिक गर्भवती महिला कुपोषणाच्या शिकार ठरल्या आहेत. येथे दररोज 160 हून अधिक महिला मुलांना जन्म देत आहेत. कोलमडलेल्या आरोग्य व्यवस्थेमध्ये महिला अत्यंत कठीण परिस्थितीत डिलीवरी होत आहेत.

दरम्यान, गाझाच्या आरोग्य मंत्रालयाने 8 मार्च रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिनी माहिती दिली होती की गाझा पट्टीतील सुमारे 60,000 गर्भवती महिला कुपोषणाचा सामना करत आहेत. मंत्रालयाने यावर भर दिला की, महिलांना पुरेशा आरोग्य सेवा मिळत नाहीत. गाझाच्या एकूण लोकसंख्येपैकी 49 टक्के महिला आहेत, ज्यामध्ये डिलीवरी होणाऱ्या महिलांचे सर्वाधिक प्रमाण आहे. गोळीबार आणि हल्ल्यांमुळे घर सोडावे लागल्यानंतर महिलांना कठीण परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. गाझामध्ये दर महिन्याला सुमारे 5,000 महिला मुलांना जन्म देत आहेत.

यूएननेही चिंता व्यक्त केली

यापूर्वी, 19 फेब्रुवारी रोजी युनायटेड नेशन्स चिल्ड्रेन्स फंड युनिसेफने गाझामधील मुले, गर्भवती महिला आणि स्तनपान करणाऱ्या माता यांच्या कुपोषणात लक्षणीय वाढ झाल्याबद्दल चिंता व्यक्त केली होती. गाझामध्ये इस्रायली हल्ल्यानंतर झालेल्या नरसंहारामुळे शहरातील महिला आणि मुलांची स्थिती अत्यंत दयनीय असल्याचे यूएनने आपल्या अहवालात म्हटले होते.

नरसंहार थांबवण्यासाठी आवाहन करा

गाझा आरोग्य मंत्रालयाने एका निवेदनात संयुक्त राष्ट्रांना पॅलेस्टिनी महिला आणि त्यांच्या कुटुंबांवरील इस्रायली हल्ले आणि नरसंहार ताबडतोब थांबवण्याचे आवाहन केले आहे. मंत्रालयाने आंतरराष्ट्रीय संस्थांना पॅलेस्टिनी महिलांच्या (Women) आरोग्य, मानसिक आणि सामाजिक गरजा लक्षात घेण्याचे आवाहन केले आहे. आंतरराष्ट्रीय महिला दिनी, गाझाच्या आरोग्य मंत्रालयाने 7 ऑक्टोबर 2023 पासून शहरातील 9,000 पॅलेस्टिनी महिलांच्या मृत्यूची नोंद केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: 'ट्रेनच्या खिडकीतून बाहेर लटकणारे पाय अन्...'; चिमुकलीच्या व्हिडिओनं खळबळ; सोशल मीडियावर थरकाप व्हायरल

Sanjay Dutt Luxury Hotel In Goa: संजय दत्तचं गोव्यात आलिशान लक्झरी हॉटेल, उद्घाटनापूर्वीच रचला इतिहास; आंतरराष्ट्रीय स्तरावर ठरतंय चर्चेचा विषय

Vaidhriti Yoga: ऑफिसमध्ये वाद अन् प्रवासात नुकसान! सूर्य-चंद्राची अशुभ युती उडवणार झोप; वैधृती योग 'या' राशींसाठी ठरणार घातक

Delhi Student Protest: मुलांचा आक्रोश, अमानुष अत्याचार अन् रक्ताळलेलं 'आंदोलन'! शिक्षणातील लाल फितीविरुद्ध 'जेन-झी'चा आरपारचा रणसंग्राम

Anti Defection Law: सत्तेची चिता पेटवण्यासाठी निष्ठेचा बळी? राजकीय पक्षांतराच्या अनैतिक नाट्यावर ताशेरे; आमदार पळवणाऱ्या वृत्तीमुळे प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व धोक्यात

SCROLL FOR NEXT