Necessary Goods Dainik Gomantak
ग्लोबल

Israel-Hamas War: अखेर इजिप्तने बॉर्डर खोलली, युद्धग्रस्तांना मिळाला मोठा दिलासा!

Israel-Hamas War: इस्रायलच्या बॉम्बहल्ल्यात उद्ध्वस्त झालेल्या गाझामध्ये राहणाऱ्या पॅलेस्टिनींसाठी इजिप्तने अखेर आपली बॉर्डर खुली आहे.

Manish Jadhav

Israel-Hamas War: इस्रायल आणि हमास यांच्यात मागील 15 दिवसांपासून घनघोर युद्ध सुरु आहे. इस्रायलच्या बॉम्बहल्ल्यात उद्ध्वस्त झालेल्या गाझामध्ये राहणाऱ्या पॅलेस्टिनींसाठी इजिप्तने अखेर आपली बॉर्डर खुली आहे.

इजिप्तने गाझा बॉर्डर खुली करताच पॅलेस्टिनींना जीवनावश्यक वस्तू मिळू लागल्या आहेत. यामुळे युद्धग्रस्तांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. संयुक्त राष्ट्र, अमेरिका आणि भारतासह अनेक देशांनी पॅलेस्टिनींना मदत सामग्री पाठवली आहे.

मात्र गाझामध्ये जाण्यासाठी मार्ग नसल्यामुळे आतापर्यंत शेकडो ट्रक बॉर्डजवळ उभे होते. आता इजिप्तने मानवता डोळ्यासमोर ठेवून आपली बॉर्डर खुली केली आहे. त्यामुळे हजारो बाधितांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, इजिप्त आणि गाझा दरम्यानची बॉर्डर शनिवारी खुली करण्यात आली, त्यानंतर इस्रायली वेढा असलेल्या भागात अन्न, औषध आणि पाण्याची कमतरता असलेल्या पॅलेस्टिनींना मदत पुरवण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली होती.

गाझाला जाणारी सुमारे 3,000 टन मदत घेऊन जाणारे 200 हून अधिक ट्रक अनेक दिवसांपासून बॉर्डवर थांबले होते. असोसिएटेड प्रेस (एपी) च्या प्रतिनिधीने हे ट्रक पॅलेस्टाईनमध्ये प्रवेश करताना पाहिले.

इस्रायलने (Israel) गाझा पट्टीला वेढा घातला आणि 7 ऑक्टोबर रोजी हमासच्या दहशतवाद्यांनी दक्षिण इस्रायलमधील शहरांवर हल्ला केल्यानंतर अनेक प्रत्युत्तरात्मक हवाई हल्ले सुरु केले.

दुसरीकडे, गाझावरील हल्ल्यामुळे लोक भूक, तहान आणि औषधासाठी तळमळत होते. गाझामधील लोक मदतीची आतुरतेने वाट पाहत होते. बॉम्बस्फोटात जखमी झालेल्या लोकांवर उपचार करणाऱ्या रुग्णालयातील (Hospital) कर्मचाऱ्यांनाही वैद्यकीय पुरवठा आणि जनरेटरसाठी इंधनाची तातडीची गरज होती.

युद्धादरम्यान शेकडो परदेशी नागरिकही इजिप्त आपली बॉर्डर कधी खोलणार याकडे आस लावून बसले होते. मात्र आता, युद्धग्रस्तांना मोठा दिलासा मिळू लागला आहे. इजिप्तने बऱ्याच दिवसांनी आपली बॉर्डर खुली केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT