Israel Hamas War|Gaza Hospital Dainik Gomantak
ग्लोबल

Israel Hamas War: येथे माणुसकी ओशाळली! गाझातील रुग्णालयांमध्ये कुजलेल्या अवस्थेत सापडले नवजात बालकांचे मृतदेह

Ashutosh Masgaunde

Israel Hamas War, Dead bodies of newborn babies found decomposing in Gaza hospitals:

इस्रायल आणि हमास विरुद्धच्या युद्धाने अकल्पनीय मानवतावादी आपत्ती आणली आहे. गाझा येथील अल नसर रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये नवजात मुलांचे मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडले आहेत.

गाझाच्या एका पत्रकाराने रुग्णालयाचा एक व्हिडिओ बनवला, ज्यामध्ये नवजात बालकांचे मृतदेह अजूनही आयसीयू बेडवर जीवरक्षक उपकरणे जोडलेले दिसतात.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, व्हिडिओमध्ये चार नवजात मुलांचे मृतदेह दिसत आहेत आणि काहींचे सांगाड्यात रूपांतर झाले आहे.

नोव्हेंबरच्या सुरुवातीला गाझा येथील हॉस्पिटलमध्ये इस्रायल आणि हमास यांच्यात युद्ध झाले होते. या रुग्णालयांमध्ये हमासच्या दहशतवाद्यांनी आपले अड्डे बनवल्याचा आरोप इस्रायलने केला आहे.

इस्रायलने हल्ल्यापूर्वी रुग्णालय रिकामे करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यामुळे रुग्णालयातील कर्मचारी घाईघाईने निघून गेले आणि यादरम्यान अनेक नवजात बालके रुग्णालयातच राहिली, ज्यांचा नंतर मृत्यू झाल्याचे समजते.

रुग्णालयातील एका डॉक्टरने सांगितले की, रुग्णालयातून बाहेर काढण्याआधीच दोन नवजात बालकांचा मृत्यू झाला होता, तर इतर मुले जिवंत होती परंतु नंतर काळजी न घेतल्याने त्यांचा मृत्यू झाला.

रुग्णालयाच्या बालरोग विभागाचे प्रमुख डॉ. मुस्तफा अल कहलौत सांगतात की, रुग्णालयाच्या आयसीयूला ऑक्सिजनचा पुरवठा ९ नोव्हेंबर रोजी खंडित झाला होता. या वेळी आंतरराष्ट्रीय संस्था, रेडक्रॉस आदींनाही पुरवठा सुरू करण्याचे आवाहन करण्यात आले होते, मात्र तरीही पुरवठा बंदच होता.

तसेच युद्धामुळे रुग्णवाहिका रुग्णालयात पोहोचू शकल्या नाहीत. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनाही तातडीने रुग्णालयाचा परिसर रिकामा करण्याचे आदेश देण्यात आले.

इस्रायली लष्कराने नवजात मुलांची जबाबदारी घेण्यास नकार दिला असून, त्यांच्यावरील आरोप निराधार आणि खोटे असल्याचे म्हटले आहे.

युद्धबंदीचा प्रस्ताव संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत फेटाळला

हमास आणि इस्रायल यांच्यात गाझामध्ये गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेली लढाई सुरू आहे. दरम्यान, गाझा पट्टीमध्ये तात्काळ युद्धबंदीचा प्रस्ताव संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत फेटाळण्यात आला आहे.

वास्तविक, अमेरिकेने आपला व्हेटो पॉवर इस्रायलच्या बाजूने वापरला. यूएनचे यूएस उपप्रतिनिधी, रॉबर्ट वुड म्हणाले की, हा प्रस्ताव वास्तविकतेपासून दूर आहे. दुर्दैवाने आमच्या जवळपास सर्व शिफारशींकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे आम्ही व्हेटोचा वापर करत आहेत.

याआधीही अमेरिका संयुक्त राष्ट्रात उघडपणे इस्रायलच्या बाजूने बोलत आली आहे. याआधीही अमेरिकेने मांडलेल्या प्रस्तावावर व्हेटो केला आहे. अशा प्रकारे अमेरिका पुन्हा एकदा इस्रायलची ढाल बनून उभी राहिली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT