Texas Supreme Court: टेक्सासच्या सर्वोच्च न्यायालयाची गर्भपातावर तात्पुरती बंदी, कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय केला रद्द!

Texas Supreme Court Stay On Abortion: अमेरिकेतील टेक्सासच्या सर्वोच्च न्यायालयाने एका महिलेचा आपत्कालीन गर्भपात करण्यावर तात्पुरती बंदी घातली आहे.
Texas Supreme Court: टेक्सासच्या सर्वोच्च न्यायालयाची गर्भपातावर तात्पुरती बंदी, कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय केला रद्द!
Published on: 
Updated on: 

Texas Supreme Court Stay On Abortion: अमेरिकेतील टेक्सासच्या सर्वोच्च न्यायालयाने एका महिलेचा आपत्कालीन गर्भपात करण्यावर तात्पुरती बंदी घातली आहे. राज्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या अॅटर्नी जनरलने कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय रद्द करण्याची विनंती न्यायालयाला केली होती. ज्याने एका महिलेला गर्भपात करण्याची परवानगी दिली होती. अनेक राज्यांनी प्रजनन आरोग्य सेवेबाबत गर्भपाताचे कायदे कडक केले असताना न्यायालयाने हे पाऊल उचलले आहे. सर्वोच्च न्ययालयाने या प्रकरणाचा आढावा घेण्याचा निर्णय घेतला आणि पूर्ण मूल्यांकन होईपर्यंत कनिष्ठ न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे.

न्यायालयाच्या निर्णयावर वकिलांनी प्रश्न उपस्थित केला

दरम्यान, अॅटर्नी जनरल पॅक्सटन यांनी कनिष्ठ न्यायालयाच्या निर्णयावर आक्षेप घेत म्हटले आहे की, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे टेक्सास राज्याच्या गर्भपात कायद्याचे उल्लंघन केल्याबद्दल दिवाणी आणि गुन्हेगारी दायित्वापासून रुग्णालये, डॉक्टर किंवा इतर कोणालाही संरक्षण मिळत नाही. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला उत्तर देताना, सेंटर फॉर रिप्रॉडक्टिव्ह राइट्सच्या वरिष्ठ वकील मॉली डुआन यांनी न्यायात संभाव्य विलंबाबद्दल चिंता व्यक्त केली. केट कॉक्स आधीच 20 आठवड्यांची गरोदर होती हे लक्षात घेऊन डुआन यांनी अशा प्रकरणांमध्ये वैद्यकीय सेवेचा आग्रह धरला. आम्हाला भीती वाटते की, न्यायास उशीर झाल्यास न्याय नाकारला जाईल, असेही त्या पुढे म्हणाल्या.

Texas Supreme Court: टेक्सासच्या सर्वोच्च न्यायालयाची गर्भपातावर तात्पुरती बंदी, कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय केला रद्द!
Indian Student in America: अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याला बेदम मारहाण, सात महिने ठेवले ओलीस; अन्...

महिला 20 आठवड्यांची गर्भवती आहे

कनिष्ठ न्यायालयाच्या न्यायाधीशांनी सांगितले की, 31 वर्षीय केट कॉक्स आई होण्यासाठी खूप उत्सुक आहे. या कायद्यामुळे तिची आई बनण्याची क्षमता कमी होऊ शकते आणि हा न्यायाचा खरा गर्भपात होईल. मीडिया रिपोर्ट्सनुसार कॉक्स 20 आठवड्यांची गरोदर आहे आणि ती ट्रायसोमी 18 ने ग्रस्त आहे, ही अशी स्थिती आहे जिची जगण्याची शक्यता खूपच कमी आहे. टेक्सास सर्वोच्च न्यायालयाचा तात्पुरता प्रतिबंधात्मक आदेश 20 डिसेंबरपर्यंत लागू राहणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa Ration Card Suspension From October 25
supreme court verdict children internet access
Goa High Court Land Compensation Case
Supreme Court Delhi barricades
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com