Israel-Hamas War Dainik Gomantak
ग्लोबल

Israel Hamas War: आता इस्त्रायली सैन्य दक्षिण गाझा करणार खाली? नेतन्याहू म्हणाले, ''हमासने हॉस्पिटलमध्ये ओलिस...''

Israel Hamas War Latest Update: इस्रायल आणि हमास यांच्यात सुरु असलेलं युद्ध थांबण्याचं नाव घेत नाहीये.

Manish Jadhav

Israel Hamas War Latest Update: इस्रायल आणि हमास यांच्यात सुरु असलेलं युद्ध थांबण्याचं नाव घेत नाहीये. यातच, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू म्हणाले की, हमासने काही ओलीस रुग्णालयात लपवले असल्याची ठोस माहिती आमच्याकडे होती.

नेतन्याहू यांनी एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, अल शिफा रुग्णालयाजवळ किबुत्झ बेरी येथून ओलिस ठेवलेल्या 65 वर्षीय महिलेचा मृतदेह सापडला आहे. महिलेच्या मृतदेहाजवळ एके-47 सारखी शस्त्रे सापडली आहेत. त्यांनी सांगितले की, आमचे सैन्य येण्यापूर्वीच हमासने ओलिसांना रुग्णालयातून बाहेर काढले आणि त्यांना दुसरीकडे हलवले.

दुसरीकडे, इस्रायलच्या (Israel) हवाई दलाने गाझामध्ये आतापर्यंत हजारो दहशतवाद्यांचा खात्मा केल्याचा दावा केला आहे. वायुसेना प्रमुखांनी गुरुवारी रात्री प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, ''7 ऑक्टोबर रोजी हमासने आमच्या देशावर हल्ला केला. हल्ला झाल्यापासून आम्ही हमासला पूर्णपणे संपवण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही आतापर्यंत हजारो दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे.''

दक्षिण गाझामध्ये लष्कराने पत्रके टाकली

इस्रायली लष्कराने आता गाझाचा ताबाही घेतला आहे. लष्कराला इथे अनेक बोगदेही सापडले आहेत, जे त्यांनी उद्ध्वस्त केले आहेत. या भागात हमास (Hamas) नौदल कमांडो तयार करत असल्याचे लष्कराने सांगितले, इथेही लष्कराने हमासचे 10 कमांडोज मारले.

दरम्यान, उत्तर गाझानंतर आता इस्त्रायली सैन्य दक्षिण गाझा सुद्धा खाली करणार असल्याची बातमी आहे. लष्कराने दक्षिण गाझामध्ये अरबी भाषेत लिहिलेली पत्रके टाकली आहेत.

याआधी लष्कराने उत्तर गाझामध्ये लोकांना परिसर खाली करण्यास सांगणारी पत्रके टाकली होती. कमांड सेंटरजवळील सर्व कामगार आपला जीव धोक्यात घालून काम करत असल्याचे पत्रकात लिहिले आहे.

इस्रायली लष्कराचे प्रवक्ते डॅनियल हगारी म्हणाले की, "आम्हाला रुग्णालयात शस्त्रे, गुप्तचर साहित्य आणि लष्करी तंत्रज्ञान आणि उपकरणे सापडली आहेत." ते पुढे म्हणाले की, ''आम्हाला ऑपरेशनल मुख्यालय देखील सापडले, ज्यामध्ये हमासचे गणवेश आणि उपकरणे होती.''

इस्रायली सैन्याने रुग्णालयात सापडलेली शस्त्रे, ग्रेनेड आणि इतर लष्करी उपकरणांचे फोटो जारी केले आहेत. डॅनियल हगारी पुढे असेही म्हणाले की, यावरुन हे स्पष्ट होते की, रुग्णालयाचा वापर दहशतवादासाठी केला जात होता, जे आंतरराष्ट्रीय कायद्याचे पूर्ण उल्लंघन आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

SIR Allegation: 'मतदारांची नावे रद्द करणे हे कटकारस्थान'; सरदेसाईंचा आरोप, दवंडेतील एकाच कुटुंबातील सहा नावे वगळल्याचे उघड

Abhinav Tejarana Captaincy: स्नेहलनंतर अभिनवकडे गोव्याच्या रणजी संघाची धुरा? 7 सामन्यांत 788 धावांचा पाऊस; कर्णधारपदासाठी तेजराणा आघाडीवर

America Visa: भारतीय आयटी प्रोफेशनल्ससाठी महत्त्वाची अपडेट! H-1B व्हिसा नियम मोडणाऱ्या कंपन्यांना 2.4 कोटींच्या दंडासह 10 वर्षांचा बॅन; नव्या विधेयकाने खळबळ

Goa Agriculture: डिचोलीत बळीराजाच्या नजरा आभाळाकडे! भातपीक कणसे धरण्याच्या टप्प्यावर, दमदार पाऊस गायब; हातातोंडाशी आलेला घास करपण्याची भीती

Electricity Tariff Hike: 1 नोव्हेंबरपासून उद्योगांची वीज महागणार! सौर-ऑफपीक वेळेत 80 पैसे, पीक अवरमध्ये 2 रुपये अतिरिक्त

SCROLL FOR NEXT