Israel Hamas War: इस्रायल आणि हमास यांच्यात कतारची मध्यस्थी; हमास करणार 50 ओलिसांची सुटका, पण...

Israel Hamas War: दहशतवादी संघटना हमासने तीन दिवसांच्या युद्धविराम आणि कैद्यांच्या सुटकेच्या बदल्यात 50 ओलिसांची सुटका करण्यासाठी कतारच्या मध्यस्थी करारावर सहमती दर्शविली आहे.
Israel Hamas War
Israel Hamas WarDainik Gomantak
Published on
Updated on

Israel Hamas War: इस्रायल आणि हमास यांच्यात भीषण युद्ध सुरु आहे. यातच, दहशतवादी संघटना हमासने तीन दिवसांच्या युद्धविराम आणि कैद्यांच्या सुटकेच्या बदल्यात 50 ओलिसांची सुटका करण्यासाठी कतारच्या मध्यस्थी करारावर सहमती दर्शविली आहे.

याबाबत अधिक माहिती देताना एका अधिकाऱ्याने 'रॉयटर्स' या वृत्तसंस्थेला सांगितले की, कतार आणि अमेरिकेच्या पुढाकाराने बुधवारी हमास आणि इस्रायल यांच्यात झालेल्या करारानुसार इस्रायल काही पॅलेस्टिनी महिला आणि मुलांना इस्रायली तुरुंगातून सोडणार आहे.

दरम्यान, या करारामुळे गाझामधील मानवतावादी मदतीचे प्रमाणही वाढणार आहे. तसेच तीन दिवसांच्या युद्धबंदीदरम्यान गाझामधून 50 ओलिसांची सुटका करण्यात येणार आहे. हमासने 7 ऑक्टोबर रोजी इस्रायलवर केलेल्या हल्ल्यादरम्यान इस्रायली नागरिकांना बंधक बनवले होते.

मात्र आता 50 ओलिसांची सुटका ही सर्वात मोठी संख्या आहे. दुसरीकडे, याबाबात इस्रायलने (Israel) अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, इस्रायल अजूनही या संदर्भात आणखी चर्चेचा पक्षधर आहे. या करारानुसार इस्रायल आपल्या तुरुंगातून किती पॅलेस्टिनी महिला आणि मुलांना सोडणार हे अद्याप माहित नाही.

Israel Hamas War
Israel-Hamas War: सुरक्षा परिषदेत इस्रायलविरोधी 4 प्रस्ताव अयशस्वी, आता 5 वा आणण्याची तयारी; जाणून घ्या काय आहे मागणी?

इस्रायलचे सैन्य गाझावर सातत्याने हल्ले करत आहे

दुसरीकडे, उत्तर गाझामध्ये इस्रायलचे सैन्य सातत्याने हल्ले करत आहे. इस्रायली लष्कर हमासच्या दहशतवाद्यांचा खात्मा करण्याच्या जवळ पोहोचले आहे. संपूर्ण गाझा शहर इस्रायली सैन्याने ताब्यात घेतले आहे. पण अनेक ठिकाणी हमासचे दहशतवादी (Terrorist) अजूनही भूमिगत बोगद्यांमध्ये रुग्णालये आणि नागरी तळांचा ढाल म्हणून वापर करत आहेत.

गाझाचे अल-शिफा रुग्णालय यापैकी एक आहे. गेल्या 3 दिवसांपासून अल-शिफा रुग्णालयाला इस्रायली सैन्याच्या रणगाड्यांनी वेढले आहे. इस्रायली सैन्याने रुग्णालय कॉम्प्लेक्समध्ये आणि आजूबाजूच्या परिसरात जोरदार बॉम्बफेक आणि जमिनीवरील कारवाई केली, ज्यामध्ये डझनभर दहशतवादी मारले गेले आहेत.

Israel Hamas War
Israel-Hamas War: हमासविरुद्धच्या युद्धामुळे इस्रायलचं आर्थिक गणित बिघडलं, देश अब्जावधी डॉलर्सचा 'कर्जबाजारी'

अल शिफा रुग्णालय रिकामे केले जात आहे

अल-शिफा रुग्णालय हळूहळू रिकामे केले जात आहे. रुग्णालयाच्या तळघरात दहशतवादी लपल्याची बातमी आहे. अशा स्थितीत इस्रायली लष्कराने हमासच्या दहशतवाद्यांना आत्मसमर्पण करण्यास सांगितले आहे. पण हमासचे दहशतवादी इस्रायली सैन्याला रुग्णालयाच्या तळघरातून जोरदार प्रत्युत्तर देत आहेत. रुग्णालयात लष्करी कारवाई करण्यात रुग्णांची उपस्थिती अडथळा ठरत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com