Israel-Hamas War: हमासविरुद्धच्या युद्धामुळे इस्रायलचं आर्थिक गणित बिघडलं, देश अब्जावधी डॉलर्सचा 'कर्जबाजारी'

Israel-Hamas War: इस्रायल आणि हमास यांच्यात गेल्या महिन्यापासून युद्ध सुरु आहे. यातच, हमाससोबत सुरु असलेल्या युद्धाचा परिणाम आता दिसू लागला आहे.
Benjamin Netanyahu
Benjamin Netanyahu Dainik Gomantak
Published on
Updated on

Israel-Hamas War: इस्रायल आणि हमास यांच्यात गेल्या महिन्यापासून युद्ध सुरु आहे. यातच, हमाससोबत सुरु असलेल्या युद्धाचा परिणाम आता दिसू लागला आहे. इस्रायलच्या अर्थव्यवस्थेला मोठा हादरा बसला आहे.

7 ऑक्टोबरपासून सुरु असलेल्या युद्धादरम्यान इस्रायलने अब्जावधी डॉलर्सचे कर्ज घेतले आहे. इस्रायली अर्थ मंत्रालयाने सांगितले की, हमासबरोबर संघर्ष सुरु झाल्यापासून इस्रायलने सुमारे 30 अब्ज शेकेल ($7.8 अब्ज) कर्ज घेतले आहे.

इस्रायली अर्थ मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, त्या रकमेपैकी $4.1 बिलियन कर्ज होते, जे आंतरराष्ट्रीय बाजारातून उभारले होते. मंत्रालयाने त्यांच्या साप्ताहिक बाँड लिलावात स्थानिक बाजारातून आणखी $957 दशलक्ष उभारले आहेत. इस्रायली अधिकारी दावा करतात की, त्यांचे सरकार (Government) आपल्या सर्व गरजा पूर्णपणे आणि चांगल्या प्रकारे व्यवस्थापित करु शकते.

Benjamin Netanyahu
Israel Hamas War: अखेर इस्रायलचा हमासच्या 'संसदे'वर कब्जा, IDFने फडकावला इस्रायली ध्वज

कर्ज सतत वाढत आहे

इस्रायली सरकारचा दावा आहे की, ते आपला निधी मुख्यतः लष्करी आणि हमास यांच्याकडून पकडलेल्या पीडित आणि ओलीसांच्या कुटुंबीयांना भरपाई देण्यासाठी खर्च करत आहे. यामुळे, गेल्या महिन्याचे बजेट $6 अब्ज इतके वाढले आहे, जे एका वर्षापूर्वीच्या तुलनेत सात पटीने जास्त आहे.

नेतन्याहू यांच्या युद्धाच्या घोषणेचा काय परिणाम होईल?

दरम्यान, इस्रायली अर्थ मंत्रालयाने मागील महिन्यापेक्षा नोव्हेंबरमध्ये 75% अधिक कर्ज घेण्याची योजना जाहीर केली आहे. दरम्यान, बँक ऑफ इस्रायलचे गव्हर्नर अमीर याओरॉन यांनी सरकारला अर्थव्यवस्थेला पाठिंबा देणे आणि मजबूत आर्थिक स्थिती राखणे यात संतुलन राखण्याचे आवाहन केले आहे.

अर्थशास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की, पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू (Benjamin Netanyahu) यांनी संघर्षामुळे प्रभावित झालेल्यांना मदत करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांमुळे 2024 पर्यंत तूट आणि कर्ज-ते-जीडीपी प्रमाण झपाट्याने वाढेल.

Benjamin Netanyahu
Israel Hamas War: हमास विरुद्ध लढणारा वेब सिरीज FAUDA चा क्रू मेंबर मतन मीरचा गाझामध्ये मृत्यू

रेटिंग एजन्सींनी दिला इशारा

गेल्या महिन्यात, आंतरराष्ट्रीय क्रेडिट रेटिंग एजन्सी 'S&P' ने इस्रायलचे रेटिंग 'स्थिर' वरुन 'नकारात्मक' केले. तेव्हापासून फिचने देशाला 'नकारात्मक' रेटिंग वॉचवर ठेवले आहे. विशेष म्हणजे, चेतावणी दिली आहे की दीर्घ संघर्षामुळे इस्रायलच्या क्रेडिट स्कोअरमध्ये लक्षणीय घट होऊ शकते. दुसरीकडे, मूडीजने म्हटले आहे की ते इस्रायलचे रेटिंग कमी करण्याचा विचार करत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com