Israel-Hamas War Dainik Gomantak
ग्लोबल

Israel-Hamas War: जीवन बनले नरक! इस्रायली हल्ल्यात 17 दिवसांच्या मुलीचा गेला जीव; भावाचाही मृत्यू

Israel-Hamas War: इस्रायल आणि हमास यांच्यात सुरु असलेलं युद्ध थांबण्याचं नाव घेत नाहीये. इस्रायली सैन्य आता हवाई हल्ल्याने हमासची ठिकाणे उद्ध्वस्त करत आहे.

Manish Jadhav

Israel-Hamas War: इस्रायल आणि हमास यांच्यात सुरु असलेलं युद्ध थांबण्याचं नाव घेत नाहीये. इस्रायली सैन्य आता हवाई हल्ल्याने हमासची ठिकाणे उद्ध्वस्त करत आहे. पश्चिम किनारी प्रदेशात अनेक इमारती पाडण्यात आल्या आहेत. हमासचे जास्तीत जास्त नुकसान करण्याचा इस्रायलचा प्रयत्न आहे. हमासची गुपित ठिकाणे शोधण्याचाही इस्रायली सैन्यांकडून प्रयत्न सुरु आहे, जिथे हमासचे वरिष्ठ कमांडर लपले असतील. दरम्यान, अशी बातमी समोर आली आहे, ज्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. जन्मानंतर अवघ्या 17 दिवसांतच इस्रायलच्या हल्ल्यात पॅलेस्टिनी चिमुरडीचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान, दक्षिण गाझा शहरातील एका रुग्णालयात जिथे वीजही नव्हती तिथे युद्धादरम्यान या चिमुरडीचा जन्म झाला असे सांगितले जाते. तिच्या कुटुंबाने तिचे नाव अल-अमिरा आयशा म्हणजेच “राजकुमारी आयशा” असे ठेवले होते, जी आता या जगात नाही. या युद्धाने तिला पृथ्वीवरील तिसरा आठवडाही पूर्ण करु दिला नाही. मंगळवारी तिचे कुटुंब इस्रायलच्या हवाई हल्ल्यात तडाख्यात आले, ज्यात तिचा मृत्यू झाला. या स्फोटात वाचलेली मुलीची आजी सुझान झोराब यांनी सांगितले की, या हल्ल्यात राफाहमधील त्यांची अपार्टमेंट उद्ध्वस्त झाली. हल्ला झाला तेव्हा त्यांचे कुटुंबीय झोपले होते. रुग्णालयातील अधिकाऱ्यांनी सांगितले की, अमीरा आणि तिचा 2 वर्षांचा भाऊ अहमद यांच्यासह 27 जणांचा मृत्यू झाला आहे. सुझान यांनी सांगितले की, ती फक्त 2 आठवड्यांची होती. तिचे नावही नोंदवता आले नाही.

दुसरीकडे, या हल्ल्यात संपूर्ण घर तिच्या अंगावर कोसळल्याचे सुझान यांनी सांगितले. बचाव कर्मचार्‍यांनी तिला आणि इतर पीडितांना ढिगाऱ्यातून बाहेर काढले. इस्रायलचे म्हणणे आहे की, ते गाझा ओलांडून हमासच्या ठिकाणांवर हल्ले करत आहेत. विशेष म्हणजे, त्यांनी नागरिकांच्या मृत्यूसाठी दहशतवाद्यांना जबाबदार धरले कारण ते निवासी भागात कार्यरत आहेत.

‘आयेशाचा जन्म कठीण परिस्थितीत झाला’

राजकुमारी आयशा फक्त 17 दिवसांची होती. सुझान यांनी सांगितले की, तिचा जन्म 2 डिसेंबर रोजी रफाह येथील एमिराती रेड क्रिसेंट रुग्णालयात झाला. त्यावेळी रुग्णालयात वीज नव्हती. अतिशय कठीण परिस्थितीत तिचा जन्म झाला. दुसरीकडे, युनायटेड नेशन्सचे म्हणणे आहे की सोमवारपर्यंत गाझा पट्टीतील 36 रुग्णालयांपैकी 28 बंद आहेत, तर उर्वरित आठ रुग्णालयांमधील आरोग्य सुविधा अंशतः कार्यरत आहेत. डब्ल्यूएचओने म्हटले आहे की, या विनाशाच्या दरम्यान सुमारे 50,000 पॅलेस्टिनी महिला गर्भवती आहेत.

आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, गाझामधील मृतांची संख्या 20,000 च्या जवळ पोहोचली आहे. गाझामध्ये अडीच महिन्यांपासून सुरु असलेल्या इस्रायलच्या हवाई हल्ल्यांमध्ये सर्वाधिक लोक मारले गेले आहेत. इस्रायलने लोकांना त्यांच्या घरातच मारले आहे. त्याचवेळी, रफाह सीमेवर बॉम्बस्फोटामुळे सतत विध्वंस होत आहे. बॉम्बस्फोटानंतर येथे बचावकार्य सुरु असून ढिगाऱ्याखालून लोकांना बाहेर काढण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. या बॉम्बस्फोटात एका पत्रकारालाही आपला जीव गमवावा लागल्याचा दावा केला जात आहे. इस्त्रायलने येथील 2 घरांना लक्ष्य केले.

दरम्यान, 2014 मध्ये इस्रायली सैनिकांनी हमासच्या दहशतवाद्यांच्या शौर्याचे वर्णन करणारे स्मारक पाडले होते. हमासच्या तळांसोबतच हमासने बांधलेली अशी अनेक ठिकाणेही नष्ट केली जात आहेत. इस्त्रायली लष्कर आणि शुजया बटालियन यांच्यात घमासान सुरु आहे. शाळेतून शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. दवाखान्यातही शस्त्रे सापडली आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ireland Head Coach Resign: भारतविरुद्धच्या शानदार विजयानंतर आयर्लंडच्या मुख्य प्रशिक्षकांचा तडकाफडकी राजीनामा; गॅरी विल्सनकडे सोपवली जबाबदारी

Yuti Yog 2026: जुलै महिन्यात ग्रहांचा महाविनाशकारी खेळ! तीन वेळा बनणार 'अशुभ युती योग'; 5 राशींसाठी ठरणार काळ

'8th Pay Commission' ची प्रतीक्षा! सरकारी कर्मचाऱ्यांच्या 'त्या' 5 मागण्यांवर होणार शिक्कामोर्तब? जुलै महिन्यातील बैठकीकडे लक्ष

National Sub Junior Boxing Championship: गोव्याच्या कनिष्काला बॉक्सिंगमध्ये ब्राँझ, राष्ट्रीय सबज्युनियर स्पर्धेत मुलींच्या गटात चमकदार कामगिरी

First Marathi Woman in US Army: कोकणकन्येचा अटकेपार झेंडा! दापोलीच्या प्राजक्ता बोंगाळे अमेरिकी सैन्यात

SCROLL FOR NEXT