Israel-Hamas War Dainik Gomantak
ग्लोबल

Israel-Hamas War: गाझामध्ये इस्रायलचं मोडलं कंबरडं, हमासनं मोसादाची काढली हवा

Israel-Hamas War: गाझा युद्धापूर्वी इस्रायलची गुप्तचर संस्था मोसादचा जगभर बोलबाला होता. जगभरातील गुप्तचर संस्थांमध्ये मोसाद सर्वात शक्तिशाली मानली जात होती.

Manish Jadhav

Israel-Hamas War: गाझा युद्धापूर्वी इस्रायलची गुप्तचर संस्था मोसादचा जगभर बोलबाला होता. जगभरातील गुप्तचर संस्थांमध्ये मोसाद सर्वात शक्तिशाली मानली जात होती. पण, हीच मोसाद हमासने ऑक्टोबर 2015 मध्ये केलेला एवढा मोठा हल्ल्याचा सुगाव लावण्यात अपयशी ठरली. इस्रायली आर्मी म्हणजेच इस्रायल डिफेन्स फोर्सेस (आयडीएफ) देखील आपल्या शत्रूंविरुद्ध अचूक कारवाई करण्यात पारंगत मानली जात होती. परंतु, त्याच IDF ला गाझामध्ये 70 दिवसांपेक्षा जास्त दिवस युद्ध सुरु होऊनही हमासच्या एकाही सर्वोच्च कमांडरला पकडण्यात किंवा ठार करण्यात अपयश आले. अशा स्थितीत गाझावर हल्ला करुन इस्रायल फसला का? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. जगभरातील हायटेक शस्त्रास्त्रांनी सुसज्ज इस्रायली लष्कर आणि मोसादला 42 चौरस किलोमीटर परिसरात लपलेले हमासचे दहशतवादी आणि त्यांच्या 200 हून अधिक ओलीसांचा शोध अद्यापही लावता आलेला नाही.

दरम्यान, इस्रायली सैन्याला उत्तर गाझामध्ये हमासच्या लष्करी मुख्यालयाच्या खाली ठेवलेली शस्त्रास्त्र मिळाली. यामध्ये इस्रायली लष्कराला हमासचे व्हिडिओ फुटेज, दोन व्हीलचेअर आणि हमासचा लष्कर प्रमुख मुहम्मद देइफ याच्याशी संबंधित गुप्तचर माहिती आणि कागदपत्रे सापडली. ही एक मोठी उपलब्धी मानली जाते, परंतु देइफ अजूनही व्हीलचेअर वापरतो की तो स्वत: चालू शकतो की नाही यावर वाद आहे. पण, देइफ आता कुठे आहे हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. इस्त्रायलच्या लष्करी सूत्रांनी सांगितले की, मुहम्मद देइफ कुठे आहे हे अद्याप त्यांना ठाऊक नाही.

देइफ आणि सिनवारचा शोध लागला नाही

दुसरीकडे, इस्रायली सैन्याने उत्तर गाझामधील बहुतांश भाग ताब्यात घेतला आहे. तथापि, इस्रायली गुप्तचर संस्थांचा असा विश्वास आहे की, ऑक्टोबरच्या उत्तरार्धात आयडीएफच्या हल्ल्यानंतर मुहम्मद देइफ दक्षिणी गाझामधील त्याच्या लष्करी मुख्यालयातून पळून गेला. असेही मानले जाते की, देईफ खान युनिसमध्ये आहे, जिथे त्याचे बरेच संपर्क आहेत आणि जिथे हमासच्या दहशतवादी शक्ती त्यांची सर्वात महत्वाची आघाडी स्थापन करु शकतात. याव्यतिरिक्त मुहम्मद देइफ खान युनिस जवळील एका छोट्या गावात असू शकतो, ज्याकडे IDF सैन्याने दुर्लक्ष केले असेल किंवा तो इजिप्तच्या सीमेवरील संवेदनशील फिलाडेल्फिया कॉरिडॉर क्षेत्राजवळील रफाह येथे पळून गेला असावा, ज्याला IDF अजूनही दुर्लक्ष करत आहे.

हमासचे कमांडर इजिप्तमध्ये पळून जाऊ शकतात

हे देखील शक्य आहे की, ते इजिप्तमध्ये पळून गेला असावेत, तेथून ते हमासच्या दहशतवाद्यांना सुरक्षित आश्रय देणार्‍या जगभरातील अनेक ठिकाणी जाऊ शकतात. या युद्धाच्या 10 आठवड्यांनंतरही IDF ने देइफ आणि हमासचा दुसरा सर्वोच्च नेता याह्या सिनवार यांना मारले नाही किंवा अटक केली नाही. खान युनिसमध्ये आयडीएफने प्रवेश केल्यानंतर दोन आठवड्यांहून अधिक काळ लोटला तरी, हमासच्या या दोन प्रमुख कमांडरपैकी एकालाही पकडले जाण्याची चिन्हे नाहीत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT