Israel-Hamas War Dainik Gomantak
ग्लोबल

Israel-Hamas War: इस्रायलवरील हमासच्या हल्ल्यात भारतीय महिला जखमी, 10 नेपाळी नागरिकांचा मृत्यू

Israel-Hamas War: इस्रायलवरील हमासच्या दहशतवादी हल्ल्यात जखमी झालेल्यांमध्ये एका भारतीय महिलेचाही समावेश आहे.

Manish Jadhav

Israel-Hamas War: इस्रायलवरील हमासच्या दहशतवादी हल्ल्यात जखमी झालेल्यांमध्ये एका भारतीय महिलेचाही समावेश आहे. ही महिला भारताच्या केरळ राज्यातील रहिवासी असून गेल्या अनेक वर्षांपासून ती इस्रायलमध्ये राहत होती.

महिलेची प्रकृती चिंताजनक असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्याचबरोबर, हमासच्या हल्ल्यात 10 नेपाळी नागरिकांचाही मृत्यू झाला आहे. नेपाळच्या दूतावासाने याला दुजोरा दिला आहे.

भारतीय महिला इस्रायलवरील हल्ल्याची बळी ठरली

हमासच्या (Hamas) हल्ल्यात जखमी झालेल्या महिलेचे नाव शिजा आनंद (वय 41 वर्षे) असे आहे. रॉकेट हल्ल्यात भारतीय महिला जखमी झाली असून तिच्यावर इस्रायलमधील रुग्णालयात उपचार सुरु असल्याचे सांगण्यात येत आहे.

इस्रायलवर हमासच्या हल्ल्यानंतर शीजा आनंद यांनी केरळमध्ये राहणाऱ्या त्यांच्या कुटुंबीयांशी बोलून आपण सुरक्षित असल्याची माहिती देत होत्या, मात्र संभाषण सुरु असताना त्यांचा फोन कट झाला.

नंतर इस्रायलमध्ये राहणाऱ्या केरळमधील रहिवाशाने शीजा यांच्या कुटुंबीयांना सांगितले की, शीजा या हल्ल्यात जखमी झाल्या असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

शीजा यांच्यावर एक शस्त्रक्रीया झाली असून दुसरी शस्त्रक्रीया लवकरच होणार आहे. शिजा आनंद गेल्या आठ वर्षांपासून इस्रायलमध्ये राहून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहेत.

10 नेपाळी नागरिकांचा मृत्यू झाला

हमासच्या हल्ल्यात नेपाळमधील 10 नागरिकांचाही मृत्यू झाला आहे. अन्य चार नेपाळी नागरिक जखमी झाले असून एक बेपत्ता आहे. नेपाळच्या परराष्ट्र मंत्रालयाने सोमवारी एक निवेदन जारी करुन याला दुजोरा दिला आहे.

नेपाळच्या (Nepal) परराष्ट्र मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, 17 नेपाळी नागरिक इस्रायलमधील किबुट्झ अल्युमिम येथील एका कृषी फार्ममध्ये काम करत होते. यापैकी 10 नेपाळी नागरिकांचा हमासच्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे. तर दोघे सुखरुप बचावले.

अन्य चार नेपाळी नागरिक जखमी झाले असून एक बेपत्ता आहे. जेरुसलेममधील नेपाळी दूतावासानेही हमासच्या हल्ल्यात 10 नेपाळी नागरिक ठार झाल्याचे म्हटले आहे. सध्या या नेपाळी नागरिकांची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

तसेच बेपत्ता नेपाळी नागरिकाचा शोध सुरु आहे. मृतदेह लवकरच नेपाळला आणण्यात येणार आहेत. नेपाळ सरकारने जखमींना मदत करण्याचे आवाहन इस्रायल सरकारला केले आहे.

इस्रायलमध्ये काम करणाऱ्या नेपाळी नागरिकांना परत आणण्यासाठी इस्रायल सरकारकडून मदत घेण्यात येईल, असेही नेपाळच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.

हमासच्या हल्ल्याने जग हादरले

दरम्यान, शनिवारी हमासने इस्रायलवर अनपेक्षित हल्ला केला. आधी हमासने इस्रायलवर हजारो रॉकेट डागले आणि त्यानंतर तेथील दहशतवाद्यांनी इस्रायलच्या हद्दीत घुसून सीमावर्ती भागात प्रचंड विध्वंस घडवून आणला आणि मोठ्या प्रमाणावर लोकांचा बळी घेतला.

हमासच्या हल्ल्यात इस्रायलमध्ये 700 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून शेकडो लोक जखमी झाले आहेत. अनेक लोकांना हमासने ओलीस ठेवले आहे. या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून इस्रायली हवाई दलाने गाझा पट्टीतील हमासच्या ठिकाणांवर बॉम्ब हल्ला केला.

इस्रायलच्या हल्ल्यात गाझा पट्टीतील 400 हून अधिक लोक मारले गेल्याची माहिती आहे. इस्रायल-हमास संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारताने आपल्या नागरिकांना एक अॅडवायजरी जारी केली असून इस्रायलमध्ये राहणाऱ्या भारतीयांना सतर्क राहण्याचा आणि सरकारी आदेशांचे काटेकोरपणे पालन करण्याचा सल्ला दिला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao: कचऱ्यावर प्रक्रियेसाठी सोनसड्यावर उभा राहणार गॅसिफिकेशन प्रकल्‍प; साडेसात कोटी रुपये खर्च, नगरसेवकांकडून स्वागत

Curchorem: कुडचडे रेल्वे स्टेशनलगतच्या शौचालयाची नळजोडणी तोडली, आस्थापनाची 2.75 लाखांची थकबाकी

Trump Tariff Policy: ट्रम्प यांची ‘टॅरिफ’ पॉलिसी फसली! अमेरिकेत वाढली बेरोजगारी, महागाईनेही गाठला नवा उच्चांक

School Discipline: कच्च्या मडक्यांना योग्य वळण देणारी शाळेची शिकवण; विद्यार्थी आणि शिक्षकांची अविस्मरणीय गाथा

रुद्रेश्वरासमोर दामू नाईकांचे 'मिशन 27'! प्रदेशाध्यक्षांचा वाढदिवस, भाजपने केला निवडणुकीचा श्रीगणेशा

SCROLL FOR NEXT