Khalil al-Haya, leader of the political wing of Hamas Dainik Gomantak
ग्लोबल

Israel Hamas War: ''आम्ही युद्धविरामासाठी तयार आहोत, पण...''; हमासच्या लीडरने इस्त्रायलसमोर ठेवली ही अट

Khalil al-Haya: बुधवारी एपीला दिलेल्या मुलाखतीत खलील अल-हया यांचे हे वक्तव्य पॅलेस्टिनी भूमीतून इस्रायलला हाकलून देण्याची हमासची वचनबद्धता दर्शवते.

Manish Jadhav

Israel Hamas War: इस्रायल आणि हमास यांच्यातील तणावादरम्यान एक मोठी बातमी समोर आली आहे. गाझामध्ये सरकार चालवणाऱ्या हमासच्या एका उच्च राजकीय अधिकाऱ्याने असोसिएटेड प्रेसला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, 'हमास इस्रायलसोबत पाच वर्षे किंवा त्याहून अधिक काळासाठी युद्धविराम करण्यास तयार आहे. 1967 च्या धर्तीवर स्वतंत्र पॅलेस्टिनी राज्यास मान्यता दिल्यास ते शस्त्रे खाली ठेवतील आणि सशस्त्र गटातून राजकीय पक्षात रुपांतरित होतील.' बुधवारी एपीला दिलेल्या मुलाखतीत खलील अल-हया यांचे हे वक्तव्य पॅलेस्टिनी भूमीतून इस्रायलला हाकलून देण्याची हमासची वचनबद्धता दर्शवते.

युद्धविरामाच्या चर्चेदरम्यान वक्तव्य आले

दरम्यान, मागील काही महिन्यांपासून सुरु असलेल्या युद्धविरामाच्या चर्चेदरम्यान हमासच्या पॉलिटीकल विंगचे नेते खलील अल-हया यांचे हे वक्तव्य आले आहे. पण इस्रायल हया यांच्या वक्तव्यावर विचार करेल अशी शक्यता फार कमी आहे. कारण हमासच्या 7 ऑक्टोबरच्या हल्ल्यानंतर इस्रायलने हमासला संपवण्याची शपथ घेतली आहे. दुसरीकडे, हमास देखील टू-स्टेट फॉर्म्युल्याच्या विरोधात आहे. संपूर्ण भूमीवर पॅलेस्टिनी राज्य स्थापन करुन इस्रायलच्या समूळ उच्चाटनाची भाषा हमास बोलतो.

"हमासची लष्करी विंग बरखास्त करणार"

इस्तंबूलमधील एपी न्यूज एजन्सीशी बोलताना अल-हया म्हणाले की, हमास गाझा आणि वेस्ट बँकमध्ये सरकार स्थापन करण्यासाठी त्यांच्या प्रतिस्पर्धी फतह गटाच्या नेतृत्वाखालील पीएलओ (पॅलेस्टाईन लिबरेशन ऑर्गनायझेशन) मध्ये सामील होण्यास तयार आहे. ते पुढे म्हणाले की, '' 1967 च्या धर्तीवर इस्रायलने वेस्ट बँक आणि गाझा पट्टीमध्ये स्वतंत्र पॅलेस्टिनी राज्यास मान्यता आणि आंतरराष्ट्रीय ठरावांनुसार पॅलेस्टिनी निर्वासितांचे परतणे स्वीकारल्यास आम्ही आमची लष्करी विंग बरखास्त करु.'' दुसरीकडे, हमास आणि फतह यांच्यातील मतभेद टोकाचे आहेत. गाझामधील फतहकडून सत्ता हस्तगत करण्यासाठी हमासने दीर्घ संघर्ष केला आहे. या दोन गटांमध्ये परस्पर संघर्षाचा मोठा इतिहास आहे.

नऊ हजारांहून अधिक रुग्ण आहेत

जागतिक आरोग्य संघटनेने सांगितले की, गाझामध्ये 9 हजारांहून अधिक रुग्ण आहेत, ज्यांची प्रकृती अत्यंत नाजूक आहे. ज्यांना परदेशात नेऊन लवकरात लवकर उपचार देण्याची गरज आहे. रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या लोकांमध्ये अनेक रुग्ण जुन्या आजारांनी त्रस्त आहेत. यापैकी एक 12 वर्षांची मुलगी आहे, जी गंभीररित्या आजारी आहे. तिच्या काळजी आणि उपचारासाठी आंतरराष्ट्रीय वैद्यकीय पथक कार्यरत आहे. दुसरीकडे, हल्ल्यांसोबतच गाझामध्ये उपासमारीचे संकटही अधिक गडद होत चालले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Murder: नवऱ्यापासून झालेली मुलगी आवडत नव्हती; बॉयफ्रेन्डसोबत मिळून आईने 2.5 वर्षाच्या बाळाला संपवले, गोवा हादरला

Ashok Saraf: 'अशें, तुका कळूंक ना?' अशोक मामांच्या तोंडी पुन्हा प्रोफेसर धोंड; सोशल मीडियावर VIDEO तूफान व्हायरल

Viral Video: बंगळुरुत वाहतूक पोलिसाची दादागिरी! बाईकस्वाराला थप्पड मारतानाचा व्हिडिओ व्हायरल; नेटकरी म्हणाले, 'ही तर वर्दीतील गुंडगिरी...'

Gujrat Politics: गुजरातमध्ये चाललंय काय? मुख्यमंत्री वगळता सर्वच्या सर्व 16 मंत्र्यांचा राजीनामा

Viral Post: कॅन्सर जिंकला! 'ही माझी शेवटची दिवाळी...' 21 वर्षीय तरुणाची भावूक पोस्ट; नेटिझन्सकडून 'चमत्कारा'साठी प्रार्थना

SCROLL FOR NEXT