Israel Hamas War: गाझामधील खान युनूस रुग्णालयातील खोदकामादरम्यान सापडले 200 मृतदेह; UN व्यक्त केला संताप

Israel Hamas War: इस्त्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध थांबण्याचं नाव घेत नाहीये. इस्त्रायल सातत्याने हमासशासित गाझावर हल्ले करत आहे.
Khan Younis Hospital Gaza
Khan Younis Hospital GazaDainik Gomantak

Israel Hamas War: इस्त्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध थांबण्याचं नाव घेत नाहीये. इस्त्रायल सातत्याने हमासशासित गाझावर हल्ले करत आहे. हमासचा जोपर्यंत संपूर्णपणे सफाया होत नाही तोपर्यंत स्वस्त बसणार नाही अशी शपथ इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी घेतली आहे. इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धाला 200 हून अधिक दिवस झाले आहेत. गाझा शहरात इस्रायली लष्कराने केलेल्या हत्याकांडावर अमेरिकेनेही चिंता व्यक्त केली आहे.

एका दिवस आधीच अमेरिकेने इस्त्रायली लष्कराच्या बटालियनवर निर्बंध लादण्याची भाषा केली होती. दरम्यान, गाझामध्ये इस्त्रायली लष्कराचं नवं कांड समोर आलं आहे. खान युनूस रुग्णालयातील खोदकामादरम्यान 200 हून अधिक मृतदेह सापडल्याचा आरोप हमासच्या अधिकाऱ्यांनी केला आहे. इस्रायलने रुग्णालयाचे सामूहिक दफनभूमीत रुपांतर केल्याचा आरोप हमासने केला आहे. मृतदेहांच्या क्रूरतेमुळे संयुक्त राष्ट्रही संतापले आहे. काही मृतदेहांचे हात बांधलेले होते तर काहींच्या अंगावर कपडेही नव्हते, असे त्यांचे म्हणणे आहे.

Khan Younis Hospital Gaza
Israel Hamas War: इस्रायली लष्करातील उच्चपदस्थ अधिकाऱ्याचा राजीनामा; हमासचा हल्ला रोखण्यात अपयशी ठरल्याची स्वीकारली जबाबदारी

इस्रायली लष्कराने शेकडो निरपराध लोकांना मारुन रुग्णालयात पुरले, असा दावा हमासच्या अधिकाऱ्यांनी केला. येथे सामूहिक दफनभूमी असल्याचा दावा हमासने केला आहे. मात्र, इस्रायली लष्कराने हमासचा हा दावा खोटा असल्याचे म्हटले आहे. आयडीएफच्या प्रवक्त्याने एका निवेदनात म्हटले की, इस्रायली ओलिसांचा शोध घेत असताना आमच्या लष्कराने नासेर रुग्णालयाजवळ पॅलेस्टिनींनी पूर्वी दफन केलेल्या मृतदेहांची तपासणी केली.

Khan Younis Hospital Gaza
Israel Hamas War: मुलगी जन्माताच झाली अनाथ, सबरीन अल-सकानीची ह्रदयद्रावक कहाणी; वाचा सविस्तर

काही मृतदेहांचे हात बांधलेले होते, तर काहींच्या अंगावर कपडेही नव्हते

दुसरीकडे संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार कार्यालयाने दावा केला की, रुग्णालयातील उत्खननादरम्यान सापडलेल्या मृतदेहांपैकी काहींचे हात बांधलेले होते तर काहींचे कपडे काढले होते. या दाव्यावर आयडीएफकडून सांगण्यात आले की, इस्त्रायली नागरिकांचा शोध सुरु असताना नासेर रुग्णालयाच्या परिसरात पॅलेस्टिनी नागरिकांची दफनभूमी आम्हाला आढळली."

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com