Fighter jets struck home of Hamas intelligence chief in Gaza
Fighter jets struck home of Hamas intelligence chief in Gaza  Dainik Gomantak
ग्लोबल

WATCH: इस्रायलची एअर स्ट्राईक, हमासच्या गुप्तचर प्रमुखाचे उडवले घर; पाहा व्हिडिओ

Manish Jadhav

Hamas-Israel News: हमासच्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून इस्रायली लष्कराने मोठी कारवाई केली आहे. इस्रायलने हमास या दहशतवादी संघटनेला आणि पॅलेस्टाईन इस्लामिक जिहादला या हल्ल्यासाठी जबाबदार धरले आहे.

इस्रायलने आता हमासविरुद्ध स्टेट वॉर घोषित केले आहे. घुसखोरी करणाऱ्या हमासच्या दहशतवाद्यांना सोडले जाणार नाही, असे म्हटले आहे.

इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले की, हमासने मोठी चूक केली आहे, त्याने इस्रायलविरुद्ध युद्ध पुकारले आहे. घुसखोरीच्या प्रत्येक टप्प्यावर आयडीएफ सैनिक शत्रूशी लढत आहेत. मी सर्व नागरिकांना होम फ्रंट कमांडच्या सुरक्षा सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करतो. हे युद्ध इस्रायल जिंकेल.

हमासच्या गुप्तचर प्रमुखाच्या घरावर हवाई हल्ला

दुसरीकडे, इस्रायली लष्कराने (Army) हमासच्या गुप्तचर प्रमुखाच्या घरावर हवाई हल्ला केला आहे. इस्रायलच्या लढाऊ विमानांनी गाझा येथील हमासच्या गुप्तचर प्रमुखाच्या घरावर हवाई हल्ला केला आहे. इस्रायली लष्कराने जारी केलेल्या व्हिडिओमध्ये हवाई हल्ल्यानंतर इमारतीमध्ये स्फोट होताना दिसत आहे.

दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले

दरम्यान, हमासच्या हल्ल्याला इस्रायली लष्कर कसे चोख प्रत्युत्तर देत आहे, याचा व्हिडिओ जारी करण्यात आला आहे. गाझावरील हवाई हल्ल्याच्या व्हिडिओमध्ये इस्रायली लष्कर हमासच्या दहशतवाद्यांचे लपलेले ठिकाण कसे उद्ध्वस्त करत आहे, हे तुम्ही पाहू शकता. एकट्या गाझामध्ये 232 हून अधिक लोक मारले गेले आहेत, तर इस्रायली सैन्याने केलेल्या हवाई हल्ल्यात 1700 हून अधिक लोक जखमी झाले आहेत.

इस्रायलवर सर्वात भीषण हल्ला

हमासने इस्रायलवर (Israel) आतापर्यंतचा सर्वात भीषण हल्ला केला आहे, ज्यामध्ये 300 हून अधिक लोक मारले गेले, शेकडो जखमी झाले आणि मोठ्या संख्येने लोकांना ओलिस ठेवले आहे.

हमासच्या लष्करी कमांडरची घोषणा

त्याचवेळी, हमासचा लष्करी कमांडर मोहम्मद डेफ याने इस्रायलविरोधातील हल्ले हे शेवटचे युद्ध असल्याचे म्हटले आहे. मोहम्मद दाईफ म्हणाला की, आम्ही त्यांना संपवण्याचा निर्णय घेतला आहे, जेणेकरुन शत्रूला हे समजू शकेल की, विनाशाची वेळ आली आहे. आम्ही 'ऑपरेशन अल अक्सा फ्लड' सुरु झाल्याची घोषणा करतो.

काय आहे इस्रायल-पॅलेस्टाईन वाद?

इस्त्रायल आणि पॅलेस्टाईनमधील संघर्ष 100 वर्षे जुना आहे. वेस्ट बँक, गाझा पट्टी आणि गोलन हाइट्स या भागांवरुन वाद आहे. पूर्व जेरुसलेमसह या भागांवर पॅलेस्टाईनचा दावा आहे. त्याचवेळी, इस्रायल जेरुसलेमवरील आपला दावा सोडायला तयार नाही.

दुसरीकडे, अमेरिका सौदी अरेबिया आणि इस्रायलमध्ये करार करुन इस्रायलला मान्यता मिळवून देण्याचा प्रयत्न करत आहे. पण दरम्यान, इस्रायलवरील या मोठ्या हल्ल्यामुळे जगात महायुद्धाची भीती वाढत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ED ची गोव्यात मोठी कारवाई! चौगुले उद्योग समूहाच्या सात ठिकाणांवर छापे, कागदपत्रे जप्त

Gallantry Awards: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते शूरवीरांना किर्ती अन् शौर्य चक्र प्रदान

Goa: आई स्वयंपाकात व्यस्त असताना चिमुकलीचा वीज तारेशी संपर्क आला, झारखंडच्या मजुर कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला

Panjim News: अग्निशमनच्या नागपुरातील अधिकाऱ्यांना गोव्यात प्रशिक्षण

Harvalem Caves And Waterfall: इतिहास आणि निसर्गाची आवड आहे? मग हरवळेतील धबधबा आणि पांडवकालीन गुहा नक्की पाहा

SCROLL FOR NEXT