Israel: अल-अक्सा मस्जिद वादावर PM नेत्यान्याहू यांचा मोठा निर्णय; म्हणाले...

Israel: पॅलेस्टाइनचे मुस्लिम नागरिक आणि इस्त्राइलचे पोलिस यांच्यामध्ये नेहमीच वाद दिसून येतो.
Israel PM
Israel PMDainik Gomantak

Israel: जेरुशलम मधील अल-अक्सा मजिद्दवरुन इस्त्राइल आणि पॅलेस्टाइनमध्ये दशकांपासून विवाद सुरु आहे. आता रमजानच्या महिन्यातदेखील अल-अक्सा मस्जिदीवरुन पून्हा वाद सुरु झाला आहे.

रमजानच्या दरम्यान, पॅलेस्टाइनचे मुस्लिम नागरिक आणि इस्त्राइलचे पोलिस यांच्यामध्ये नेहमीच वाद दिसून येतो.

गेल्या आठवड्यात पॅलेस्टाइन नागरिकांनी इस्त्राइली पोलिसांवर आरोप लावताना म्हटले आहे की, इस्त्राइली सेनेने अल- अक्सा मजिद्द मध्ये नमाजसाठी गेलेल्या काही पॅलेस्टाइन नागरिकांना मारहान करत काही नागरिकांना अटकदेखील केल्याचे म्हटले आहे.

इस्त्राइली सेनेचे छापेमारीचे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर इस्लामिक देशांनी इस्त्राइलला चेतावणीदेखील दिली आहे. आता हा विवाद रोखण्यासाठी इस्त्राइलचे पंतप्रधानांनी एक निर्णय घेतला आहे.

इस्त्राइलचे प्रधानमंत्री बेंजामिन नेतन्याहू यांनी रमजान संपेपर्यत यहूदींना टेंपल माऊंटला जाण्याला बंदी घातली आहे. बुधवारपासून पुढच्या 10 दिवसांपर्यत यहुदींना टेंपल माऊंटला जाण्यास बंदी घातली आहे.

Israel PM
US Poop Donor: चक्क मानवी विष्ठेसाठी 'ही' कंपनी देते कोट्यवधी रुपये; जाणून घ्या यामागचे कारण...

दरम्यान, गेल्या आठवड्यात इस्त्राइली सेनेने इस्लाम धर्मासाठी सर्वात पवित्र मानल्या जाणाऱ्या धार्मिक स्थळांपैकी एक असलेल्या अल-अक्सा मस्जिदमध्ये छापेमारी केली होती.

या छापेमारीनंतर पॅलेस्टाइनहमासकडून इस्त्राइलवर रॉकेट डागले होते. त्याला उत्तर देताना इस्त्राइलनेदेखील पॅलेस्टाइनवर रॉकेट डागले होते. या प्रकरणावर इस्लामिक राष्ट्रांनी नाराजी व्यक्त केली आहे. आता इस्त्राइलच्या पंतप्रधानांनी घेतलेला निर्णयाचा किती परिणाम होणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com