Israel Hamas War Dainik Gomantak
ग्लोबल

Israel-Hamas War: इस्त्रायल आणि हमास यांच्यात पुन्हा होणार युद्धविराम? ओलिसांच्या सुटकेसाठी...

Israel-Hamas War: इस्त्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध अधिक धोकादायक वळणावर पोहोचले आहे.

Manish Jadhav

Israel-Hamas War: इस्त्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध अधिक धोकादायक वळणावर पोहोचले आहे. रमजानच्या पवित्र महिन्यातही इस्रायल आणि हमास यांच्यातील घनघोर युद्ध सुरुच आहे. युद्ध सुरु झाल्यापासून दोघांमध्ये चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या. मात्र, अद्याप कोणताही तोडगा निघालेला नाही. दरम्यान, इस्रायली सैन्याने शनिवारी सांगितले की, त्यांनी गाझामध्ये ओलीस ठेवलेल्या 47 वर्षीय शेतकऱ्याचा मृतदेह ताब्यात घेतला आहे. इस्रायल आणि हमास यांच्यातील सहा महिन्यांपासून सुरु असलेले युद्ध संपवण्यासाठी आणि उर्वरित ओलीसांची सुटका करण्यासाठी वार्ताहर रविवारी दुसऱ्या फेरीच्या चर्चेची तयारी करत असताना हमासने ओलीस ठेवलेल्या इस्रायली नागरिकाचा मृतदेह सापडला आहे.

इस्रायली सैन्यांकडून सांगण्यात आले की, त्यांना इलाद कात्झीरचा मृतदेह सापडला आहे, ज्याची जानेवारी महिन्यात इस्लामिक दहशतवाद्यांनी हत्या केली होती. हमासचे दहशतवादी 7 ऑक्टोबर रोजी दक्षिण इस्रायलमध्ये घुसले आणि त्यांच्या हल्ल्यात 1,200 हून अधिक लोक मारले गेले. या हल्ल्यानंतर हमासने 250 इस्रायली लोकांना ओलीस ठेवले होते. नीर ओज या सीमावर्ती शहरातून शेतकरी कात्झीर यांचे अपहरण करण्यात आले होते.

दरम्यान, या मृतदेहाच्या शोधामुळे इस्रायली सरकारवर ओलिसांची सुटका करण्यासाठी तडजोड करण्यासाठी दबाव वाढला आहे. ओलिसांची सुटका करण्यासाठी लवकरात लवकर करार करण्याची आणि मध्यावधी निवडणुका घेण्याच्या मागणीसाठी तेल अवीवमध्ये हजारो लोक जमले. आतापर्यंत 36 ओलिसांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे, तर पकडलेल्यांपैकी निम्म्या लोकांना सोडण्यात आले आहे.

दुसरीकडे, कात्झीर यांची बहीण करमीत यांनी एका निवेदनात म्हटले की, "वेळेत करार झाला असता तर त्याला वाचवता आले असते. आमचे नेतृत्व भ्याड आणि राजकीय विचाराने प्रेरित आहे, त्यामुळेच कोणताही करार होऊ शकला नाही. इजिप्शियन अधिकारी आणि इजिप्तच्या सरकारी मालकीच्या अल कैरो टीव्हीच्या वृत्तानुसार रविवारी इस्त्रायल आणि हमास यांच्यातील युद्धविरामाची चर्चा पुन्हा सुरु होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Comunidade Land Goa: कोमुनिदादींच्या जमिनी केवळ गावकार व भागधारकांच्याच; हस्तक्षेप करण्याचा राज्य सरकारला अधिकार नाही

Viral Video: जगाला वेड लावणारा 'ऑरा फार्मर'! 11 वर्षांचं पोर बनलं सोशल मीडियावर स्टार; त्याचा अनोखा डान्स तुम्ही पाहिला का?

Nagpur Goa Highway: गोव्यात नेमके कोणते शक्तिपीठ? महामार्ग विरोधात रक्ताच्या अखेरच्या थेंबापर्यंत लढण्याचा राजू शेट्टींचा निर्धार

Israel Syria Attack: इस्त्रायलचा सीरियावर भीषण हल्ला, दमास्कसमधील संरक्षण मंत्रालय-सैन्य मुख्यालय उडवले; युद्धाची शक्यता वाढली!

Viral Video:...म्हणून शेन वॉर्न ग्रेट आहे... चार चेंडू आणि चार वेरिएशन्स; पाहा फिरकीच्या जादुगाराचा खास व्हिडिओ

SCROLL FOR NEXT