इस्त्रायल आणि हमास यांच्यात सुरु असलेलं युद्ध थांबण्याचं नाव घेत नाहीये. इस्त्रायल सातत्याने गाझावर हल्ले करत आहे. इस्रायलवर हमासच्या दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली होती. इस्रायलमधून पकडलेल्या एका जर्मन मुलीला हमासच्या दहशतवाद्यांनी ओलीस ठेवले होते. शनी लौक असे या मुलीचे नाव असून ती टॅटू आर्टिस्ट होती. हमासच्या दहशतवाद्यांनी शनीच्या मृतदेहाची विवस्त्र धिंड काढली होती. ही मन हेलावून टाकणारी घटना पाहून लोकांना मोठा धक्का बसला होता. आता एका पुरस्कारामुळे शनीला विवस्त्र करुन फिरवल्याचा फोटो पुन्हा चर्चेत आला आहे.
न्यूयॉर्क पोस्टच्या वृत्तानुसार, या फोटोला यावर्षीचा 'टीम पिक्चर स्टोरी ऑफ द इयर' पुरस्कार देण्यात आला आहे. वृत्तसंस्थेला पुरस्कार मिळालेल्या 20 फोटोंमध्ये हा फोटो समाविष्ट आहे. मात्र, पुरस्कार मिळाल्यानंतर सोशल मीडियावर चर्चेला उधाण आले. पत्रकाराला एका छायाचित्रासाठी पुरस्कार दिला जात आहे, ज्यासाठी त्याला तुरुंगात टाकायला हवे होते, असे अनेकांनी म्हटले. त्याचवेळी, हा रानटीपणा जगासमोर आणणाऱ्या पत्रकाराने धाडस दाखवल्याचेही काही लोकांचे म्हणणे आहे. त्यामुळे अशा प्रकारचा पुरस्कार देणे कौतुकास्पद आहे.
दरम्यान, हा पुरस्कार देणाऱ्या ग्रुपचे म्हणणे आहे की, हा जगातील सर्वात जुना फोटो पुरस्कार आहे. शनी लौकची हमासच्या दहशतवाद्यांनी क्रूरपणे हत्या केली. एका यूजरने म्हटले की, मृत शनी लौकच्या फोटोवर हा पुरस्कार देण्यात आला आहे हे जाणून मोठा धक्का बसला. यात काही चूक होऊ शकते का? यूएनमधील स्पीच रायटिंग हेड अविवा क्लॉम्पास म्हणाले की, या फोटोसाठी रिपोर्टरलाही तुरुंगात टाकायला हवे होते.
दुसरीकडे, 7 ऑक्टोबर रोजी जेव्हा हमासच्या दहशतवाद्यांनी इस्रायलवर हल्ला केला, तेव्हा तिथे संगीत महोत्सव सुरु होता. यादरम्यान हमासच्या दहशतवाद्यांनी इस्त्रायली लोकांना ओलीस ठेवले. त्या ओलिसांपैकीच शनी एक होती. शनीच्या हत्येनंतर तिच्या विवस्त्र मृतदेहाची गाडीतून धिंड काढण्यात आली. एवढ्यावरच न थांबता तिच्या मृतदेहावर थुंकण्यात सुद्धा आले. धिंड काढताना हमासच्या दहशतवाद्यांनी 'अल्ला हू अकबर'च्या घोषणाही दिल्या होत्या.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.