Israel-Hamas War: गाझावर बॉम्ब हल्ले करण्यासाठी इस्रायली लष्कर घेतंय AI ची मदत; रिपोर्टमध्ये धक्कादायक दावा

Israel-Hamas War: इस्रायल आणि हमास यांच्यात गेल्या सहा महिन्यांपासून युद्ध सुरु आहे. इस्रायल गाझावर सातत्याने हवाई हल्ले करत आहे.
Israel-Hamas War
Israel-Hamas WarDainik Gomantak

Israel-Hamas War: इस्रायल आणि हमास यांच्यात गेल्या सहा महिन्यांपासून घनघोर युद्ध सुरु आहे. इस्रायल गाझावर सातत्याने हवाई हल्ले करत आहे. त्यामुळे सध्यातरी युद्ध थांबण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. दरम्यान, गाझामधील हमासच्या दहशतवाद्यांना लक्ष्य करण्यासाठी इस्रायल आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय)चीही मदत घेत असल्याच्या बातम्या येत आहेत. इस्रायलच्या गुप्तचर अधिकाऱ्यांच्या हवाल्याने मीडिया रिपोर्टमध्ये ही माहिती देण्यात आली आहे.

'लॅव्हेंडर'साठी मदत घेतली जात आहे

इस्रायली अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आधारित या टूलला 'लॅव्हेंडर' म्हणतात. 'लॅव्हेंडर'च्या मदतीने चूक होण्याची शक्यता खूपच नगण्य आहे. इस्रायलच्या संरक्षण दलाला याबाबत विचारले असता त्यांनी या टूलसंबंधी कोणत्याही प्रकारचं भाष्य टाळलं. तथापि, संशयित दहशतवाद्यांना ओळखण्यासाठी एआयचा वापर केला जात असल्याचे त्यांनी नाकारले. त्याचवेळी, एका अधिकाऱ्याने सांगितले की, हे टूल मशीन रबर स्टॅम्पप्रमाणे काम करते. पहिल्या 20 सेकंदात टार्गेट ओळखते आणि जोरदार हल्ला करते. अहवालानुसार, इस्रायलच्या लष्कराने आर्टिफिशियल इंटेलिजन्सशी जोडलेली यंत्रणा दहशतवाद्यांना ओळखण्याच्या प्रक्रियेतील केवळ एक साधन आहे.

Israel-Hamas War
Israel-Hamas War: इस्रायलचा गाझामधील अल शिफा रुग्णालयावर हल्ला; 13 दिवसांत 400 जणांचा मृत्यू

बायडन आणि नेतन्याहू यांच्यात चर्चा

दरम्यान, इस्रायलने शुक्रवारी सांगितले की ते गाझा पट्टीला मानवतावादी मदत देण्यासाठी पावले उचलत आहे, ज्यामध्ये उत्तर गाझामधील स्थिती पूर्वपदावर आणणे हे देखील समाविष्ट आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या कार्यालयाने यासंबंधीच्या प्लॅनविषयीची घोषणाही केली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन आणि नेतन्याहू यांच्यातील चर्चेनंतर इस्रायलकडून ही घोषणा करण्यात आली आहे.

इस्रायलचे मोठे पाऊल

इस्रायलच्या घोषणेपूर्वी बायडन आणि नेतन्याहू यांच्यात फोनवर चर्चा झाली. या संभाषणादरम्यान, अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी आपली भूमिका स्पष्ट करत म्हटले की, गाझामधील युद्धासाठी अमेरिकेचे भविष्यातील समर्थन इस्रायली नागरिक आणि मदत कर्मचाऱ्यांच्या संरक्षणासाठी अधिक पावले उचलण्यावर अवलंबून असेल. दुसरीकडे मात्र, इस्रायलने केलेल्या घोषणेमध्ये कोणत्या वस्तू आणि कोणत्या प्रमाणात प्रवेश दिला जाईल हे स्पष्ट केलेले नाही.

Israel-Hamas War
Israel-Hamas War: हमासने विवस्त्र करुन काढली धिंड; तिच्या फोटोला मिळाला 'अवॉर्ड'; जगभर होतेय चर्चा

इस्रायलला पाठिंबा

दुसरीकडे, मतभेद निर्माण होऊनही बायडन प्रशासनाने हमासविरुद्धच्या युद्धात इस्रायलला महत्त्वपूर्ण लष्करी मदत आणि राजनैतिक समर्थन देणे सुरु ठेवले आहे. गाझामध्ये जीवनावश्यक मदत पोहोचवताना सात कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्यामुळे इस्रायलला आंतरराष्ट्रीय समुदयाच्या टीकेचा सामना करावा लागत आहे. गाझाच्या आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी सांगितले की, पॅलेस्टाईनमधील मृतांची संख्या 33,000 हून अधिक झाली आहे, तर 75,600 इतर जखमी झाले आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com