Israel Hamas War Dainik Gomantak
ग्लोबल

Israel Hamas War: इस्त्रायलचा गाझामध्ये मोठा हल्ला; निष्पाप मुलांसह 17 जण ठार; निर्वासितांच्या छावणीला केलं लक्ष्य

Israel Hamas War: इस्त्रायल आणि हमास यांच्यातील संघर्ष वाढतच चालला आहे. इस्त्रायल हमासशासित गाझासह अनेक शहरांना लक्ष्य करत आहे.

Manish Jadhav

Israel Hamas War: इस्त्रायल आणि हमास यांच्यातील संघर्ष वाढतच चालला आहे. इस्त्रायल हमासशासित गाझासह अनेक शहरांना लक्ष्य करत आहे. यातच, बकरीदच्या रात्री गाझावर इस्रायलकडून सुरु असलेले हल्ले आणखी तीव्र झाले. मध्य गाझावर केलेल्या हल्ल्यात महिला आणि मुलांसह 17 लोक ठार झाले. अल जझीराच्या वृत्तानुसार, हे हल्ले दोन ठिकाणी झाले जिथे बेघर लोकांना निर्वासित छावण्यांमध्ये ठेवण्यात आले होते. या छावण्यांवर झालेल्या हल्ल्यात या लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. इस्रायलचे म्हणणे आहे की, आता हमासच्या दहशतवाद्यांनी राफाह शहरात आश्रय घेतला आहे, त्यामुळे तिथे हल्ले करुनच त्यांचा नाश होऊ शकतो.

वृत्तानुसार, बकरीदच्या रात्री झालेल्या पहिल्या हल्ल्यात महिला (Women) आणि मुलांसह 10 जणांचा मृत्यू झाला. यातील 5 जण एकाच कुटुंबातील होते. याशिवाय, सुमारे 20 जण जखमी झाले. तासाभरानंतर लगेच दुसरा हल्ला झाला, ज्यामध्ये 7 लोक मारले गेले. या भीषण हल्ल्यात एका संपूर्ण कुटुंबाचा मृत्यू झाला. यामध्ये निष्पाप मुले आणि अगदी कुटुंबातील आजी-आजोबांचाही समावेश होता. इस्रायलवर यापूर्वीही निर्वासितांच्या छावण्यांमध्ये हल्ले केल्याचा आरोप आहे. या दोन्ही हल्ल्यात सुमारे 35 जण गंभीर जखमी झाले असून, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान, इस्रायलमध्ये (Israel) अंतर्गत कलहही तीव्र झाला आहे. पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी वॉर कॅबिनेट बरखास्त केले. विरोधी पक्षनेते यायर लॅपिड यांचे म्हणणे आहे की, जर सर्व विरोधक एकत्र आले तर बेंजामिन नेतन्याहू यांना सत्तेवरुन हटवता येईल. विरोधी एकजुटीसाठी प्रयत्न सुरु असल्याचेही ते म्हणाले. लॅपिड पुढे असेही म्हणाले की, 'हे सरकार सत्तेतून बाहेर गेले पाहिजे आणि हे शक्य आहे. वॉर कॅबिनेटमधील दोन महत्त्वाच्या सदस्यांनी राजीनामा दिल्यानंतर इस्रायली पंतप्रधानांची चिंता वाढली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

DA Hike: सरकारी कर्मचाऱ्यांची दिवाळी यंदा एकदम दणक्यात! सरकारकडून महागाई भत्त्यात 'इतक्या' टक्क्यांची घसघशीत वाढ; मिळालं तगडं गिफ्ट

Kumar Kushagra Century: भारतीय फलंदाजीचा नवा हुकमी एक्का! 21 वर्षाच्या पोरानं ठोकलं शानदार शतक, कांगारुंची काढली पिसं; सिलेक्टर्सचं वेधलं लक्ष

श्रीलंकन कोर्टाचा मोठा निकाल! ईस्टर साखळी बॉम्बस्फोटातील 15 दोषींना सुनावली प्रत्येकी 220 वर्षांची शिक्षा; 11 भारतीयांसह 270 बळींना न्याय

Ranji Trophy: गोव्याचा स्वप्नील अस्नोडकर आता केरळचा मुख्य प्रशिक्षक! रणजीसह वनडे-टी-20 संघाचीही जबाबदारी; 2026-27मोसमासाठी मोठी संधी

Vagator Turtle Protection: वागातोर किनाऱ्यावर कासवांची 24 तास निगराणी! ऑलिव्ह रिडलेच्या अंड्यांच्या संरक्षणासाठी वन विभागाची कडक गस्त

SCROLL FOR NEXT