Israel Hezbollah Conflict Dainik Gomantak
ग्लोबल

Israel Hezbollah Conflict: सीजफायरनंतरही रक्ताचा सडा! दक्षिण लेबनॉनमध्ये इस्रायलने हिजबुल्लाहचे 250 हून अधिक दहशतवादी केले ठार; कमांड सेंटर्स चक्काचूर VIDEO

IDF Claims 250 Terrorists Killed: इस्रायल आणि लेबनॉनमध्ये युद्धविराम लागू झाल्यानंतरही दोन्ही पक्षांमधील तणाव निवळण्याची चिन्हे दिसत नाहीत.

Manish Jadhav

IDF Claims 250 Terrorists Killed: इस्रायल आणि लेबनॉनमध्ये युद्धविराम लागू झाल्यानंतरही दोन्ही पक्षांमधील तणाव निवळण्याची चिन्हे दिसत नाहीत. उलट, इस्रायली संरक्षण दलाने दक्षिण लेबनॉनमध्ये मोठी कारवाई करत हिजबुल्लाहच्या 250 हून अधिक दहशतवाद्यांना कंठस्नान घातल्याचा दावा केला. विशेष म्हणजे, इस्रायली सैन्याने दिलेल्या माहितीनुसार, हे सर्व दहशतवादी युद्धविराम जाहीर झाल्यानंतर झालेल्या विविध कारवायांमध्ये मारले गेले आहेत. इस्रायली नागरिक आणि सैनिकांच्या सुरक्षेला असणारा धोका पूर्णपणे नष्ट करण्यासाठी ही मोहीम सातत्याने राबवली जात असल्याचे आयडीएफने स्पष्ट केले.

इस्रायली सैन्याने सोशल मीडियावर केलेल्या एका पोस्टमध्ये म्हटले की, युद्धविराम कराराची अंमलबजावणी सुरु झाल्यापासून आतापर्यंत हिजबुल्लाह या दहशतवादी संघटनेचे 220 हून अधिक दहशतवादी (Terrorist) आणि महत्त्वाचे कमांडर मारले गेले आहेत. हे दहशतवादी इस्रायली नागरिक आणि सीमेवर तैनात असलेल्या सैनिकांसाठी थेट धोका निर्माण करत होते. या मोहिमेदरम्यान आयडीएफने हिजबुल्लाहच्या अनेक कमांड सेंटर्सवर आणि महत्त्वाच्या लष्करी तळांवर भीषण हवाई हल्ले करुन ते पूर्णपणे उद्ध्वस्त केले. या कारवाईमुळे हिजबुल्लाहच्या पायाभूत सुविधांचे मोठे नुकसान झाल्याचे लष्कराने नमूद केले.

दुसरीकडे, गुरुवारी इस्रायली सैन्याने पुन्हा एकदा बेरुतची उपनगरे आणि दक्षिण लेबनॉनमधील अनेक भागांना लक्ष्य केले. या हल्ल्यांमुळे युद्धविराम कराराचे पुन्हा एकदा उल्लंघन झाल्याची चर्चा आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरु झाली. लेबनॉनच्या आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, बेरुतच्या दाहियाह भागात इस्रायलने केलेल्या ताज्या हल्ल्यात 2 जणांचा मृत्यू झाला असून 7 जण जखमी झाले. या हल्ल्यांमुळे परिसरात दहशतीचे वातावरण असून सीजफायर टिकणार की नाही, याबाबत आता शंका उपस्थित केल्या जात आहेत. इस्रायलने मात्र आपली सुरक्षा धोक्यात आल्यास कारवाई सुरुच ठेवणार असल्याचा पवित्रा घेतला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Canada Technology Deal: भारत-कॅनडा टेक डील! विद्यार्थ्यांना मिळणार एआय आणि डेटा सायन्सचे धडे, बंगळुरुमध्ये दीपस्पेशियलचे दोन मोठे करार

Goa Regional Development: गोव्याचे भौतिकशास्त्र आणि राज्यशास्त्र! कॅसिनो, खाणउद्योग अन् विकासाच्या राजकारणाचा वेध

प्रयत्ने साखरेचे कण वेचिता... तक्रारी सोडा, आनंदाचे क्षण निवडा; सुखी आयुष्याचा सुंदर मंत्र!

Egypt Tourism: इजिप्तचा गूढ वारसा! पिरॅमिड्सपासून नाईल नदीपर्यंत; इतिहास, संस्कृती अन् आधुनिकतेचा अद्भुत संगम

JNU Global Reputation: जेएनयूच्या पाण्यात काय आहे?

SCROLL FOR NEXT