Israel-Hamas War Dainik Gomantak
ग्लोबल

Israel-Hamas War: इस्रायली हल्ल्यात गेल्या 24 तासात 158 जणांचा मृत्यू; 12 लोकांचं संपूर्ण कुटुंब संपलं

Israel-Hamas War: इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध दिवसेंदिवस उग्र होत चालले आहे. इस्रायली सैन्य गाझावर बॉम्बहल्ले करत आहे.

Manish Jadhav

Israel-Hamas War: इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध दिवसेंदिवस उग्र होत चालले आहे. इस्रायली सैन्य गाझावर बॉम्बहल्ले करत आहे. आतापर्यंत या युद्धात गाझामधील 25 हजार लोकांचा बळी गेला आहे. इस्त्रायली बॉम्बने अवघ्या एका दिवसात गाझा पट्टीवर कहर केला आहे. गेल्या 24 तासात इस्रायलने गाझावर केलेल्या बॉम्बहल्ल्यात 158 लोक मारले गेल्याचे वृत्त आहे. या हवाई हल्ल्यात लहान मुलांसह 12 जणांचे संपूर्ण कुटुंब ठार झाले. रात्रभर झालेल्या बॉम्बहल्ल्यात शेकडो पॅलेस्टिनी ठार झाले आहेत. तसेच, शेकडो जखमी झाले आहेत.

दरम्यान, गाझामध्ये विध्वंसक हल्ले सुरुच असल्याचा दावा हमासने केला आहे. ताज्या हल्ल्यात इस्रायलने अनेक निष्पाप लोकांचा बळी घेतला आहे. हमास-नियंत्रित गाझाच्या आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे की, गेल्या 24 तासांत इस्रायलने गाझावर केलेल्या बॉम्बहल्ल्यात 158 लोक मारले गेले आहेत. राफाह येथे इस्रायली हल्ल्यात मुलांसह 12 जणांचे संपूर्ण कुटुंब ठार झाले. रात्रभर झालेल्या बॉम्बहल्ल्यात शेकडो पॅलेस्टिनी ठार आणि जखमी झाले आहेत.

मृतांमध्ये बहुतांश मुले आणि महिलांचा समावेश आहे

मंत्रालयाच्या निवेदनात म्हटले आहे की, गाझामध्ये इस्रायलच्या बॉम्बहल्ल्यात मारल्या गेलेल्या 75 टक्क्यांहून अधिक मुले, महिला आणि वृद्ध होते. युद्धात किमान 10,600 मुले, 7,200 महिला आणि 1,049 वृद्ध लोक आतापर्यंत मारले गेले आहेत. यात सुमारे 61,154 लोक जखमी झाल्याचे सांगण्यात आले.

ढिगाऱ्यातून मृतदेह बाहेर काढले जात आहेत

दुसरीकडे, अजूनही हजारो लोक ढिगाऱ्याखाली अडकले असल्याचे मंत्रालयाने म्हटले आहे. गाझाच्या नागरी संरक्षण आणि रुग्णवाहिका पथकांनी मध्य गाझामधील मघाजी निर्वासित छावणीत ढिगाऱ्याखालून पॅलेस्टिनींचे मृतदेह बाहेर काढले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून इस्रायलने छावणीवर केलेल्या गोळीबारात हे बळी गेले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Diwali Bonus for Central Govt Employees: केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळीची मोठी भेट! मोदी सरकारकडून बोनस जाहीर; खात्यात येणार 'इतके' पैसे

Crime News: आधी प्रेमसंबंध, नंतर हत्येचा कट! पत्नीने पतीच्या मदतीने प्रियकराचा गळा आवळला; मृतदेह गोणीत भरून कालव्यात फेकला

Triple Talaq Case: लग्नानंतर 21 वर्षे संसार, 3 मुलं आणि आता...! बायकोला ट्रिपल तलाक देणाऱ्या नवऱ्याला कोर्टाचा दणका; सुनावली 'इतक्या' वर्षांची शिक्षा अन् दंड

VIDEO: 'सर्वात मोठे ओठ' बनवण्याचा अट्टहास! डॉक्टरांनी नकार दिल्यावर महिलेने घरीच घेतलं इंजेक्शन; पुढे नको तेच झालं, पाहा व्हिडिओ

Bulbul Film Festival: बुलबुल बालचित्रपट महोत्सवाची सांगता; 'द ग्रेट ग्रॅंड सुपर हिरो'चे प्रदर्शन, सर्वोत्तम चित्रपटाची घोषणा

SCROLL FOR NEXT