Mullah Abdul Ghani Baradar Dainik Gomantak
ग्लोबल

आयएसआय चीफने तालिबानी नेत्याची काबूलमध्ये घेतली भेट, या मुद्द्यांवर झाली चर्चा

तालिबानने (Taliban) 15 ऑगस्ट रोजी काबूल ताब्यात घेतल्यानंतर हमीद यांची काबूलमध्ये येण्याची ही पहिलीच वेळ आहे.

दैनिक गोमन्तक

अफगाणिस्तानमधील (Afghanistan) अशरफ घनी (Ashraf Ghani) यांचे सरकार उलथवून लावत तालिबान्यांनी (Taliban) सत्ता आपल्या हातामध्ये घेतली आहे. मात्र सत्ता स्थापनेचा तिढा काही सुटता सुटत नाही. हक्कानी नेटवर्क आणि तालिबान या दोघांमध्ये सत्तेसाठी संघर्ष सुरु आहे. यातच आता तालिबानने सोमवारी पुष्टी केली की, पाकिस्तानी गुप्तचर संस्थेचे प्रमुख लेफ्टनंट जनरल फैज हमीद (Faiz Hameed) यांनी तालिबानचे सह-संस्थापक मुल्ला अब्दुल गनी बरदार (Mullah Abdul Ghani Baradar) यांची भेट घेतली होती. ही बैठक अशा वेळी झाली आहे, जेव्हा तालिबान लवकरच अफगाणिस्तानमध्ये सरकार स्थापन करणार आहे. हमीद गेल्या आठवड्यात काबूलला गेले होते. तालिबानने 15 ऑगस्ट रोजी काबूल ताब्यात घेतल्यानंतर हमीद यांची काबूलमध्ये येण्याची ही पहिलीच वेळ आहे.

तालिबानचे प्रवक्ते जबीउल्लाह मुजाहिद यांनी काबूलमध्ये पत्रकार परिषदेत सांगितले की, आयएसआय प्रमुखाने मुल्ला बरदार यांची भेट घेतली होती. यावेळी ते म्हणाले की, तालिबानने इस्लामाबादला आश्वासन दिले आहे की, अफगाणिस्तानचा भूभाग पाकिस्तानच्या विरोधात वापरला जाणार नाही (ISI Chief in Kabul). तत्पूर्वी, पाकिस्तानी माध्यमांनी म्हटले होते की, लेफ्टनंट जनरल हमीद यांच्या नेतृत्वाखाली वरिष्ठ अधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ तालिबानच्या आमंत्रणावरून काबूलला गेले होते, तर दुसरीकडे तालिबानने सांगितले की, पाकिस्तानी अधिकारी स्वतःहून आले आहेत.

हमीद संबंध सुधारण्यासाठी अफगाणिस्तानात आले

तालिबानने रविवारी सांगितले की, हमीद काबूल आणि इस्लामाबादमधील द्विपक्षीय संबंध सुधारण्यासाठी अफगाणिस्तानात आले होते. तालिबानच्या सांस्कृतिक आयोगाचे उपप्रमुख अहमदुल्लाह वासिक म्हणाले की, तालिबानच्या नेत्यांनी लेफ्टनंट जनरल हमीद यांच्याशी द्विपक्षीय संबंध आणि अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यातील तोरखम आणि स्पिन बोल्डक पासवर येणाऱ्या समस्यांविषयी चर्चा केली आहे. (Pakistan Taliban Issues). स्थानिक टोलो न्यूजने वासिकच्या हवाल्याने म्हटले आहे की, “पाकिस्तानी अधिकारी अफगाण प्रवाशांच्या समस्या सोडवण्यासाठी सीमा भागात, विशेषत: तोरखाम आणि स्पिन बोल्डक येथे आले आहेत. त्यांना काबूलला यायचे होते यासाठी आम्ही त्यांना परवानगी दिली.

पाकिस्तानने चमन सीमा ओलांडणे केले बंद

पाकिस्तानने गुरुवारी सुरक्षा कारणांमुळे अफगाणिस्तानसह चमन सीमा (Chaman Border Crossing) ओलांडणे बंद केले, अफगाणिस्तानसह खैबर पख्तूनख्वामधील तोरखम शहरानंतरचा दुसरा सर्वात मोठा बॉर्डर क्रॉसिंग आहे. पत्रकार परिषदेत घेत मुजाहिद म्हणाले की, पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी अफगाणिस्तानमधील कैद्यांच्या सुटकेशी संबंधित सुरक्षा चिंतेमुळे क्रॉसिंग बंद झाल्याचे कळवले असून देशामध्ये प्रवेश करु इच्छिणाऱ्यांची चौकशी करण्याची विनंती केली. हिज्ब-ए-इस्लामी पक्षाचे नेते गुलबुद्दीन हेकमतयार यांच्या निकटवर्तीय सूत्रांचा हवाला देत चॅनलने सांगितले की, पाकिस्तानच्या गुप्तचर प्रमुखांनीही त्यांची भेट घेऊन देशातील सद्यस्थितीवर चर्चा केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT