Mojtaba Khamenei Health Dainik Gomantak
ग्लोबल

Mojtaba Khamenei: "हाता-पायाचं ऑपरेशन, आता चेहऱ्याची प्लास्टिक सर्जरी!" मोजतबा खामेनेईंची धडकी भरवणारी सद्यस्थिती; अज्ञातवासातून चालतोय इराणचा कारभार

Mojtaba Khamenei Health Update Surgery: इराणचे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत 'न्यूयॉर्क टाइम्स'ने प्रसिद्ध केलेल्या एका धक्कादायक अहवालामुळे आंतरराष्ट्रीय राजकारणात मोठी खळबळ उडाली.

Manish Jadhav

Mojtaba Khamenei Underground Iran: इराणचे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत 'न्यूयॉर्क टाइम्स'ने प्रसिद्ध केलेल्या एका धक्कादायक अहवालामुळे आंतरराष्ट्रीय राजकारणात मोठी खळबळ उडाली. या अहवालानुसार, मोजतबा खामेनेई सध्या कोणासमोरही न येता एका अज्ञात स्थळी 'भूमिगत' राहून देशाचा कारभार हाकत आहेत. विशेष म्हणजे, ते आता स्वतंत्रपणे निर्णय घेण्याऐवजी 'इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड्स कोअर'च्या बड्या जनरल्सच्या एका मंडळाच्या सल्ल्यावर पूर्णपणे अवलंबून आहेत.

माजी राष्ट्राध्यक्ष महमूद अहमदीनेजाद यांचे निकटवर्तीय अब्दोलरेझा दावरी यांनी या स्थितीचे वर्णन करताना म्हटले की, "मोजतबा सध्या एखाद्या कंपनीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सच्या अध्यक्षाप्रमाणे काम करत आहेत, जिथे सर्व महत्त्वाचे निर्णय जनरल्सच्या सल्ल्याने सामूहिकरीत्या घेतले जातात."

मोजतबा खामेनेई यांच्या या गुप्त कार्यपद्धतीमागे सुरक्षेची मोठी कारणे दडलेली आहेत. 28 फेब्रुवारी रोजी अमेरिका आणि इस्रायलने केलेल्या भीषण हवाई हल्ल्यात त्यांचे वडील आयतुल्ला अली खामेनेई यांचा मृत्यू झाला. या हल्ल्यात मोजतबा स्वतः गंभीर जखमी झाले, तर त्यांच्या पत्नी आणि मुलाला प्राण गमवावे लागले. तेव्हापासून ते सार्वजनिक जीवनातून पूर्णपणे गायब आहेत.

आपली सुरक्षा आणि गुप्तता राखण्यासाठी ते आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर टाळून संदेशवहनासाठी जुन्या पद्धतीचा वापर करत आहेत. त्यांचे आदेश बंद लिफाफ्यांमध्ये हस्तलिखित पत्रांच्या स्वरुपात विश्वासू संदेशवाहकांमार्फत पाठवले जातात. हे संदेशवाहक महामार्ग आणि ग्रामीण रस्ते वापरुन अत्यंत गुप्तपणे संदेश पोहोचवतात आणि त्याच मार्गाने प्रत्युत्तर पुन्हा मोजतबा यांच्यापर्यंत पोहोचवले जाते.

मोजतबा खामेनेई यांच्या प्रकृतीबाबतही या अहवालात सविस्तर माहिती देण्यात आली. गंभीर जखमी असूनही ते मानसिकदृष्ट्या पूर्णपणे सक्रिय आणि सतर्क असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांच्या एका पायावर आतापर्यंत तीन वेळा शस्त्रक्रिया करण्यात आली असून त्यांना चालण्यासाठी कृत्रिम पायाचा वापर करावा लागणार आहे. त्यांच्या हातावरही शस्त्रक्रिया झाली असून त्यात हळूहळू सुधारणा होत आहे. मात्र, या हल्ल्यात त्यांचा चेहरा प्रचंड भाजला, ज्यामुळे त्यांना बोलताना त्रास होतो. वैद्यकीय सूत्रांनुसार, त्यांना भविष्यात प्लास्टिक सर्जरीचीही गरज भासू शकते.

विशेष म्हणजे, इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियन, जे स्वतः एक निष्णात हृदय शल्यचिकित्सक आहेत, ते आरोग्यमंत्र्यांच्या सोबतीने मोजतबा यांच्या उपचारांची देखरेख करत आहेत.

मोजतबा खामेनेई यांनी आतापर्यंत एकही मौखिक विधान किंवा व्हिडिओ जारी न करण्यामागे एक धोरणात्मक कारण असल्याचे सांगितले जाते. त्यांना आपली शारीरिक कमकुवत बाजू जगासमोर आणि शत्रूंसमोर आणायची नाही. आपली प्रतिमा एक कणखर नेता म्हणून कायम राहावी, यासाठी ते केवळ लिखित स्वरुपातच आपले आदेश आणि निवेदने जारी करत आहेत. इराणमधील (Iran) ही सत्तासंघर्षाची आणि गुप्ततेची परिस्थिती पश्चिम आशियातील राजकारणाला कोणत्या दिशेला घेऊन जाते, याकडे आता संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Star Cricketer Retirement: ''मी लढाई हरलो...'', स्टार वेगवान गोलंदाजाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला ठोकला रामराम; सततच्या दुखापतींना कंटाळून घेतला मोठा निर्णय

Asian Games Final 2026: अजिंक्य टीम इंडियाची 'गोल्ड' कामगिरी! फायनलमध्ये भारतीय पोरींनी श्रीलंकेला 147 धावांनी लोळवलं; एशियन गेम्समध्ये भारताचा डंका

Women Cancer Symptoms : महिलांमध्ये सर्वाधिक आढळणारा कर्करोग कोणता? 'ही' लक्षणं दिसल्यास वेळीच तपासणी करा

Goa Ranji 2026: गोव्याच्या रणजी संघाची तयारी अंतिम टप्प्यात, स्पर्धेपूर्वी महाराष्ट्राविरुद्ध दोन सराव सामने; खेळाडूंच्या कामगिरीकडे लक्ष

Goa Rain Shortage: पाऊस न पडल्यास भातशेती धोक्यात; कणसे धरू लागल्याने दिवसातून किमान एक हलकी सर आवश्यक, कृषी संचालकांचा इशारा

SCROLL FOR NEXT