Mojtaba Khamenei  Dainik Gomantak
ग्लोबल

Iran US Israel War: इरणा नवा 'गेमचेंजर' आक्रमक! मोजतबा खामेनेईंनी दिली अमेरिकेला खुली धमकी; जगाची 'लाईफलाईन' रोखणार?

Strait of Hormuz Blockade: मध्यपूर्वेतील युद्धाच्या धगधगत्या ज्वाळांमध्ये इराणने आपल्या नव्या नेतृत्वाचा चेहरा जगासमोर आणला.

Manish Jadhav

Mojtaba Khamenei Aggressive On Strait of Hormu: मध्यपूर्वेतील युद्धाच्या धगधगत्या ज्वाळांमध्ये इराणने आपल्या नव्या नेतृत्वाचा चेहरा जगासमोर आणला. 28 फेब्रुवारीच्या त्या भीषण हल्ल्यात अली खामेनेई यांचे पर्व संपल्यानंतर त्यांचे पुत्र मोजतबा खामेनेई यांनी सत्तेची सूत्रे हातात घेताच जागतिक राजकारणाला हादरा देणारा पवित्रा घेतला.

गुरुवारी (12मार्च) इराणच्या (Iran) सरकारी वाहिनीवरुन प्रसारित झालेल्या त्यांच्या पहिल्याच संदेशाने हे स्पष्ट केले की, इराण आता केवळ बचावात्मक पवित्रा घेणार नाही, तर जागतिक अर्थव्यवस्थेची नस दाबायलाही मागे हटणार नाही. मोजतबा यांनी म्हटले की, 'होर्मुझची सामुद्रधनी' (Strait of Hormuz) कायमस्वरुपी बंद राहिली पाहिजे. त्यांचे हे वक्तव्य जगाला वेठीस धरण्याचे एक मोठे आर्थिक हत्यार असल्याचे म्हटले जात आहे, कारण जगातील 20 टक्के तेल पुरवठा याच चिंचोळ्या सागरी मार्गावर अवलंबून आहे.

मोजतबा खामेनेई यांचा हा संदेश अत्यंत वेगळ्या पद्धतीने जगापर्यंत पोहोचवण्यात आला. स्वतः कॅमेऱ्यासमोर न येता त्यांनी एका टीव्ही प्रेझेंटरद्वारे आपले शब्द वाचून दाखवले, जे त्यांच्या गूढ आणि तितक्याच कठोर रणनीतीचे प्रतीक मानले जात आहे. त्यांनी अमेरिकेला स्पष्ट शब्दांत अल्टिमेटम दिला की, मध्यपूर्वेतील अमेरिकेचे सर्व लष्करी तळ तात्काळ रिकामे केले जावे. जर हे तळ सुरु राहिले, तर इराणकडून होणारे हल्ले अधिक तीव्र होतील.

या वक्तव्याद्वारे त्यांनी शेजारील राष्ट्रांना मित्रत्वाचा हात पुढे करतानाच, अमेरिकेला आश्रय देणाऱ्या देशांनाही अप्रत्यक्ष इशारा दिला. मोजतबा यांची ही 'बदल्याची भाषा' केवळ राजकीय नसून ती भावनिकही आहे. त्यांनी मिनाब शहरातील त्या मुलींच्या शाळेचा उल्लेख केला, जिथे युद्धाच्या पहिल्या दिवशी झालेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात चिमुकल्या मुलींचा बळी गेला. हा उल्लेख करुन त्यांनी आपल्या आक्रमकतेला नैतिक अधिष्ठान देण्याचा प्रयत्न केला.

दुसरीकडे, अली खामेनेईंच्या हत्येनंतर इराण कोसळेल, असा पाश्चिमात्य देशांचा अंदाज मोजतबा यांच्या पहिल्याच कृतीने खोटा ठरवला. इराणने आधीच इस्रायलची राजधानी तेल अवीववर क्षेपणास्त्रे डागून आपली ताकद दाखवून दिली. आता होर्मुझचा मार्ग रोखून त्यांनी विकसित देशांच्या इंधन पुरवठ्यावर घाला घातला. यामुळे जगभरात 'ऑईल क्राईसिस'ची स्थिती निर्माण झाली असून, या मार्गावरुन जाणाऱ्या जहाजांवर इराणकडून सातत्याने होणारा क्षेपणास्त्र वर्षाव हा जागतिक व्यापारासाठी मोठा धोका बनला आहे. मोजतबा खामेनेईंनी घेतलेली ही 'आर पार'ची लढाई केवळ लष्करी वर्चस्वासाठी नसून ती इराणच्या अस्तित्वाची आणि इराणवरील हल्ल्यांचा प्रतिशोध घेण्याची एक क्रूर पण प्रभावी चाल ठरत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

आधी पाण्यासाठी तडफडला, आता महापुराची भीती! निसर्गाच्या दुहेरी चक्रव्यूहात अडकला पाकिस्तान; भारताकडून कोणताही डेटा मिळेना

King Cobra Viral Video: 'स्टंट' पडला महागात! किंग कोब्राला किस करण्यासाठी झुकला अन् क्षणार्धात जीवघेणा हल्ला; व्हिडिओ पाहून अंगावर काटा

8th Pay Commission: 8व्या वेतन आयोगाबाबत मोठी बातमी! रिपोर्ट कधी जाहीर होणार आणि पगारात किती वाढ होणार? जाणून घ्या सर्व काही

'वो दबाव नहीं, सम्मान का हकदार है...', रोहितच्या निवृत्तीच्या वृत्ताने माजी क्रिकेटपटू संतापला; गंभीर-अजित टार्गेटवर

Guru Gochar 2026: नक्षत्रांचा राजा आणि देवगुरुंची युती! 'या' 5 राशींच्या आयुष्यात सुरु होणार सोन्यासारखा काळ; व्यवसायात नव्या आयडिया ठरतील सुपरहीट

SCROLL FOR NEXT