Iran May Attack On Saudi: Dainik Gomantak
ग्लोबल

Iran May Attack On Saudi: तिसरे महायुद्ध भडकणार? इराण सौदी अरेबियावर हल्ला करण्याच्या तयारीत

सौदीच्या गुप्तचर खात्याची अमेरिकेला माहिती; अमेरिकेचे सैन्य हाय अलर्टवर

गोमन्तक डिजिटल टीम

Iran May Attack On Saudi: सौदी अरेबिया आणि इराण यांच्यातील तणाव वाढत चालला असून इराण कुठल्याही क्षणी सौदी अरेबियावर हल्ला करू शकतो, अशी शक्यता आहे. ही गुप्त माहिती सौदीने अमेरिकेला सांगितली आहे. त्यानंतर आखातील देशांमधील अमेरिकेच्या सैन्याला हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे.

इराणने सौदीवर हल्ला केला तर जगात तिसरे महायुद्ध भडकू शकते. अमेरिकेतील वॉल स्ट्रीटजर्नल या वृत्तपत्राने म्हटले आहे की, अमेरिका आणि सौदी अरेबिया सध्या हाय अलर्टवर आहेत. कारण सौदीच्या गुप्तचर विभागने इराण सौदीमधील अनेक ठिकाणांवर हल्ला करण्याची योजना आखत आहे, असे म्हटले आहे.

सौदीच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे की, इराण सौदीशिवाय अमेरिकन सैन्याची उपस्थिती असलेल्या एरबिल, इराक यांच्यावरही हल्ला करू इच्छितो. आगामी 48 तासात इराण हल्ला करण्याची शक्यता आहे. काही प्रसारमाध्यमांतील वृत्तांनुसार इराणमध्ये होत असलेल्या आंदोलनावर लक्ष दुसरीकडे वळविण्यासाठी इराण हे पाऊल उचलू शकतो.

अमेरिकेचा संरक्षण विभाग पेंटॅगॉनचे वायु सेना ब्रिगेडियर जनरल पॅट रायटर म्हटले आहे की, या भागातील धोक्याच्या स्थितीमुळे अमेरिका चिंतित आहे. आम्ही सौदीच्या अधिकाऱ्यांसोबत नियमित संपर्कात आहोत. आमचे सैन्य इराकमध्ये असो वा इतर कुठेही. आम्ही आमचे संरक्षण आणि बचावाचा अधिकार सुरक्षित ठेऊ.

इराण सौदी अरेबियाचा प्रतिस्पर्धी आहे. सौदीने 2016 मध्ये इराणसोबतचे संबंध तोडले होते. त्या वेळी इराणी आंदोलकांनी सौदी अरेबियाच्या एका शिया मौलवीला काढून टाकल्याबद्दल सौदीच्या दुतावासावर हल्ला केला होता. इराण समर्थक हौथी बंडखोऱांनीही संयुक्त अरब अमिरात आणि सौदी अरेबियाच्या तेल सुविधांवर हल्ले केले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vasco ATM Scam: एटीएममध्ये पैसे भरणारेच निघाले चोर! खासगी कंपनीच्या 5 कर्मचाऱ्यांनी लंपास केले 14 लाख; वास्कोतील धक्कादायक प्रकाराने खळबळ

Goa Tiger Symbolism: वाघाच्या पुढच्या 2 पायांमध्ये रानडुक्कर, तर मध्ये छोटेखानी सिंह; वागऱ्यागाळ येथील वैशिष्ट्यपूर्ण मूर्ती

Vaibhav Suryavanshi Century: 15 षटकार 11 चौकार...! 32 चेंडूत शतक ठोकत रचला इतिहास, कतारमध्ये 14 वर्षीय वैभव सूर्यवंशीचं वादळ VIDEO

Viral Video: भर रस्त्यात काकाची 'दारु पार्टी'! कुणाचीही हटवण्याची हिंमत नाही, व्हिडिओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल; नेटकरी म्हणाले, "काका ऑन रॉक"

VIDEO: बुमराहच्या तोंडून निघाली शिवी, बावुमाच्या उंचीवर केलेलं वक्तव्य व्हायरल; म्हणाला, 'बौना भी तो है यह...'

SCROLL FOR NEXT