Jimmi Jimmi Song in China: चीनमध्ये अलीकडच्या काळात पुन्हा कोरोना रूग्णांची संख्या वाढू लागल्याने अनेक ठिकाणी लॉकडाऊन केले जात आहे. त्यामुळे अनेकांना दोन वेळच्या जेवणाचे हाल होत आहेत. या विरोधात लोकांना सरकारला वेगळ्या प्रकारे विरोध सुरू केला आहे. भारतीय संगीतकार बप्पी लाहिरी यांचे आणि मिथून चक्रवर्तीवर चित्रित झालेले एक गाणे चक्क या चळवळीचे गाणे बनून गेले आहे.
1982 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'डिस्को डान्सर' चित्रपटातील ‘जिमी-जिमी आजा आजा’ हे ते गाणे आहे. विशेष म्हणजे यातील जिमी जिमी हे जे शब्द आहेत त्याचा चिनी मँडरिन भाषेतील अर्थ वेगळा होतो. मँडरिनमध्ये ‘जि मी, जि मी’ (Jie mi, Jie mi) म्हणजे 'मला तांदुळ द्या.' लोकांचा हा विरोधाचा विचित्र अंदाज सोशल मीडियात व्हायरल झाला आहे.
या व्हिडिओंमध्ये लोक हातात रिकामी भांडी घेऊन या गाण्यावर व्हिडिओ, रिल्स बनवत आहेत. त्यातून लॉकडाऊनमुळे लोकांचे जेवणाचे हाल होत आहेत, हे त्यांना दाखवायचे आहे. लोकांनी सरकारविरोधात यातून नाराजी व्यक्त केली आहे.
गेल्याच महिन्यात चिनचे राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग यांनी कोरोनाची परिस्थिती पाहून कडक लॉकडाऊनचे आदेश दिले होते. या लॉकडाऊनमध्ये कोणत्याही प्रकारची सूट नसेल, असे त्यांनी जाहीर केले होते.
चीनमधील झेंग्झो येथे आयफोनचा सर्वात मोठा कारखाना आहे. येथेही लॉकडाऊनमुळे कर्मचारी पळून जात आहेत. येथे तीन लाख कर्मचारी काम करतात. जगात सर्वाधिक आयफोन येथेच बनतात. येथून अनेक कर्मचारी पायीच आपापल्या घरी जातानाचे चित्र दिसून येत आहे. येथे कोरोनाचे किती रूग्ण आहेत. याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.