Election In Israel: इस्त्रायलमध्ये तीन वर्षात पाचव्यांदा निवडणूक

माजी पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्या लिकुड पक्षाला बहुमत मिळण्याची शक्यता
Benjamin Netanyahu
Benjamin NetanyahuDainik Gomantak
Published on
Updated on

Election In Israel: इस्त्रायलमध्ये मंगळवारी पुन्हा सार्वजनिक निवडणूक होत आहे. गेल्या तीन वर्षात इस्त्रायलमध्ये पाचव्यांदा निवडणूक होत आहे. माजी पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्या लिकुड पक्षाला पुन्हा बहुमत मिळण्याची शक्यता मिळण्याचे संकेत आहेत.

Benjamin Netanyahu
Jimmi Jimmi Song in China: चिनमध्ये लॉकडाऊनने त्रस्त जनता गातेय मिथून-बप्पीदांचे गाणे

या वर्षीच्या सुरवातीलाच इस्त्रायलमध्ये खासदार इदित सिलमॅन यांनी माजी पंतप्रधान नफ्तली बेनेट यांच्या धार्मिक राष्ट्रवादी यामिना पक्षाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे यामिना पक्षाच्या बहुमतावर परिणम झाला होता. बेनेट यांनी नेतान्याहू समर्थकांनी सिलमॅन यांना धमकावल्याचा दावा केला होता. महिनाभर सतत झालेल्या छळामुळे सिलमॅन यांनी आघाडी सोडली, असे बेनेट म्हणाले होते.

तर सिलमॅन यांनी आरोग्य मंत्री होरोविट्झ यांनी रूग्णालयांना ज्यू धर्मविरोधी निर्देश दिल्याच्या निषेधार्थ हा राजीनाम्याचा निर्णय घेतल्याचे म्हटले होते. माजी पंतप्रधान बेनेट यांचे सरकार आठ पक्षांच्या आघाडीने मिळून बनले होते. इस्त्रायलची संसद नेसेटमध्ये एकाही पक्षाला बहुमत मिळाले नाही. नेसेटमध्ये 120 सदस्य निवडून येतात. पण 61 हा बहुमताचा आकडा कुणालाच गाठता आला नाही. त्यामुळे इस्त्रायलमध्ये आठ पक्षांचे आघाडी सरकार बनवावे लागले होते.

Benjamin Netanyahu
Russia Ukraine War: 'सेक्सी ड्रेस' घाला, युक्रेनियन महिलांना का केलं जातयं आवाहन

आता 73 वर्षीय बेंजामिन नेतान्याहू यांनी पुन्हा पंतप्रधानपदासाठी दावेदारी ठोकली आहे. सत्ताधाऱ्यांच्या विरोधातील लाटेचा फायदा नेतान्याहू यांच्या लिकुड पक्षाला होऊ शकतो. नेतान्याहू यांचा थेट सामना सध्याचे पंतप्रधान येर लापिड यांच्याशी होणार आहे. तर आपला येश आतिद पक्ष दुसऱ्या स्थानी राहिल, असा विश्वास लापिड यांनी व्यक्त केले आहे. संरक्षण मंत्री बेनी गँट्ज यांनी त्यांच्या नव्या नॅशनल युनिटी पक्षाला चांगल्या जागा मिळतील, असा विश्वास व्यक्त केला आहे.

दरम्यान, इस्त्रायलचे राष्ट्राध्यक्ष इसाक हर्जोग यांनी जेरूसलेम येथे मंगळवारी सकाळी मतदानाचा हक्क बजावला. इस्त्रायल हा खरा लोकशाही देश आहे. देशाचे भविष्य आणि दिशा ठरविण्यासाठी लोक मतदान करतील, असे ते म्हणाले होते. इस्त्रायलमध्ये 67.8 लाख नागरिक मतदार 25 व्या इजरायली संसदेची निवड करतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com