Benjamin Netanyahu And Ebrahim Raisi Dainik Gomantak
ग्लोबल

Israel Iran Tensions: इराण येत्या 48 तासांत इस्रायलवर हल्ला करु शकतो; वॉल स्ट्रीट जर्नलचा खळबळजनक दावा

Benjamin Netanyahu And Ebrahim Raisi: इस्रायल-हमास युद्धादरम्यान आणखी एका मोठ्या युद्धाच्या भीतीने जग भयभीत झाले आहे.

Manish Jadhav

Israel Iran Tensions: इस्रायल-हमास युद्धादरम्यान आणखी एका मोठ्या युद्धाच्या भीतीने जग भयभीत झाले आहे. जगातील प्रसिद्ध वृत्तपत्र वॉल स्ट्रीट जर्नलने दावा केला आहे की, इराण पुढील 48 तासांत इस्रायलवर हल्ला करु शकतो. वॉल स्ट्रीट जर्नलच्या या अहवालाने जगभरात खळबळ उडाली आहे. वृत्तपत्राच्या वृत्तानुसार, इस्रायल इराणकडून थेट हल्ला करण्याच्या तयारीत आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, इराणनेही इस्रायलकडून बदला घेण्यासाठी संपूर्ण योजना आखली आहे. पण 48 तासांत इराण कोणत्या वेळी हल्ला करु शकतो हे सांगण्यात आलेले नाही, एवढेच सांगण्यात आले आहे की, पुढील 2 दिवसांत इराण इस्रायलवर हल्ला करु शकतो.

नुकताच, इस्रायलने सीरियातील इराणी दूतावासावर हल्ला केला होता, ज्यात त्यांचे 7 कर्मचारी ठार झाले होते. त्यानंतर इराणने इस्रायलवर हल्ला करण्याची धमकी दिली असून पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्याकडून बदला घेण्याची शपथ घेतली आहे. सीरिया आणि इराणने इस्रायलवर दमास्कसमधील इराणी राजनैतिक इमारतीवर क्षेपणास्त्र हल्ला केल्याचा आरोप केला, ज्यामुळे इराण आणि इस्रायलमध्ये युद्धाची शक्यता वाढली.

पहिला हल्ला उत्तर इस्रायलवर होऊ शकतो

इराण-इस्रायल संघर्षाशी परिचित असलेल्या तेल अवीव स्त्रोताच्या मते, इराण शुक्रवार किंवा शनिवारी लगेचच दक्षिण किंवा उत्तर इस्रायलवर थेट हल्ला करण्याच्या तयारीत आहे. तथापि, एका व्यक्तीने इराणी नेतृत्वाला माहिती दिली की, हल्ल्याच्या प्लॅनवर चर्चा केली जात आहे, परंतु अंतिम निर्णय घेतलेला नाही. सीरियातील दमास्कस येथे गेल्या आठवड्यात झालेल्या हल्ल्याचा बदला घेण्याची धमकी इराणने जाहीरपणे दिली आहे. तेहरानने राजनयिक इमारतीवर इस्रायलने केलेला हवाई हल्ला असल्याचे म्हटले होते. या हल्ल्यात इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सच्या एलिट कुड्स फोर्सच्या वरिष्ठ सदस्यासह इराणी लष्करी अधिकारी ठार झाले.

कोण किती शक्तिशाली आहे?

शस्त्रास्त्रांच्या बाबतीत इस्रायलला इराणपेक्षा अधिक शक्तिशाली मानले जाते. इस्रायलकडे 600 हून अधिक विमाने आहेत. इराणकडे 541 विमाने आहेत. लढाऊ विमानांबद्दल बोलायचे झाल्यास, इस्रायल इराणच्या पुढे आहे. इस्रायलकडे 341 तर इराणकडे 200 फायटर प्लेन आहेत. इस्रायलकडे 48 अटॅक हेलिकॉप्टर आहेत तर इराणकडे फक्त 12 लढाऊ हेलिकॉप्टर आहेत. रणगाड्यांबाबत बोलायचे झाल्यास इराण इस्रायलपेक्षा वीस पटीने पुढे आहे. इस्रायलकडे सुमारे 2200 रणगाडे आहेत तर इराणकडे 4071 रणगाडे आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Acid Attack Goa: 'त्याच्या' आईनेच आत्महत्येस प्रवृत्त केलं... अ‍ॅसिड हल्ल्याप्रकरणी मृत मुलीच्या आईचा खळबळजनक आरोप

E-Sakal: ई-सकाळची गरुडझेप! पुन्हा ठरले देशातील नंबर 1 मराठी न्यूज पोर्टल

Vijai Sardesai: 'आत्ताच्या हुकूमशाहीपेक्षा पोर्तुगीज परवडले'; विजय सरदेसाईंचा भाजप सरकारला टोला

Shubman Gill Double Century: कर्णधार शुभमन गिलचा डबल धमाका, इंग्लंडविरुद्ध झळकावले 'द्विशतक'

IND Vs ENG: गिल दा मामला...! शुभमननं मोडला किंग कोहलीचा रेकॉर्ड; पहिल्यांदाच भारतीय कर्णधाराने केली अशी कामगिरी

SCROLL FOR NEXT