Israel-Iran Tensions: सीरियातील इराणी दूतावासावर इस्रायलचा हवाई हल्ला; इराणच्या सर्वोच्च लष्करी कमांडरसह 6 जण ठार

Israel Attack In Iran Consulate: इस्रायल आणि हमास यांच्यात सुरु असलेल्या युद्धाने आता संपूर्ण पश्चिम आशिया व्यापला आहे.
Israel Attack In Iran Consulate
Israel Attack In Iran ConsulateDainik Gomantak
Published on
Updated on

Israel Attack In Iran Consulate: इस्रायल आणि हमास यांच्यात सुरु असलेल्या युद्धाने आता संपूर्ण पश्चिम आशिया व्यापला आहे. सोमवारी इस्रायलने सीरियातील दमास्कस येथील इराणी वाणिज्य दूतावासावर हवाई हल्ला केला. या हल्ल्यात 7 जण ठार झाले असून त्यापैकी एक इराणचा सर्वोच्च लष्करी कमांडर आहे. या हल्ल्यात इराणच्या लष्कराशी संबंधित कुड्स फोर्सचे जनरल मोहम्मद रेदा जाहेदी ठार झाले आहेत. 65 वर्षीय जाहिदी यांनी कुड्स फोर्ससाठी काम केले. सीरिया आणि लेबनॉनमध्ये ते गुप्त ऑपरेशन्सचे निरीक्षक होते. इराणच्या सैन्याचे नाव रिव्होल्युशनरी गार्ड्स आहे, परंतु त्याची विदेशी विंग 'कुड्स फोर्स' म्हणून ओळखली जाते. अशाप्रकारे इस्रायलच्या हल्ल्यामुळे इराणचे गेल्या वर्षभरातील सर्वात मोठे नुकसान झाले आहे.

दरम्यान, याआधीही इराणी शास्त्रज्ञ आणि लष्करी नेते इस्रायलच्या हल्ल्यात मारले गेले आहेत. या प्रकरणी इस्रायली लष्कराकडून कोणतेही वक्तव्य आलेले नाही. मात्र नाव न सांगण्याच्या अटीवर चार अधिकाऱ्यांनी हा हल्ला इस्रायलने केल्याचे मान्य केले. या हल्ल्याला दुजोरा देताना इराणचे परराष्ट्र मंत्री हुसेन आमिर अब्दुल्लाहियान यांनी सांगितले की, मी सीरियाशी बोललो आहे. इतर देशांमध्येही ज्यू राजवट कशी हल्ले करत आहे, याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली आहे. इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांनी पुढे सांगितले की, गाझामध्ये इस्रायलला पराभवाचा सामना करावा लागत आहे. अनेक महिन्यांच्या युद्धानंतरही इस्रायलच्या हाती काहीही लागलेले नाही. आतापर्यंत बेंजामिन नेतन्याहू अपयशी ठरले आहेत. अशा स्थितीत त्यांचे मानसिक संतुलन ढासळले आहे.

Israel Attack In Iran Consulate
Israel-Iran Tensions: इस्त्रायल सीरियात करतोय इराणच्या ठिकाणांना लक्ष्य; हल्ल्यात रिव्होल्युशनरी गार्ड्सचा अधिकारी ठार

दुसरीकडे, एका गुप्त बैठकीला लक्ष्य करुन हा हल्ला करण्यात आल्याचे इराणच्या लष्कराच्या अधिकाऱ्याने सांगितले. या बैठकीत इराणच्या लष्करी अधिकाऱ्यांसह हमासचे नेते उपस्थित होते. गाझामध्ये इस्रायली सैन्याचा मुकाबला कसा करायचा यावर या बैठकीत चर्चा सुरु होती. यादरम्यान हा हल्ला झाला, ज्यामध्ये 7 लोक मारले गेले आणि त्यापैकी एक वरिष्ठ इराणी जनरल होता. या बैठकीत पॅलेस्टाईनमध्ये सक्रिय असलेल्या इस्लामिक जिहाद या संघटनेचे लोक उपस्थित होते. असे मानले जाते की, या गटाला इराणकडून आश्रय मिळत आहे आणि तो त्याला रसद देखील पुरवतो. इस्लामिक जिहादचा प्रमुख झियाद नखलेहनेही गेल्या आठवड्यात इराणला भेट दिली होती.

Israel Attack In Iran Consulate
Israel Iran Tension: इस्रायल-इराण युद्धाच्या उंबरठ्यावर! इस्त्रायचा सीरियाच्या दोन एअरपोर्टवर हल्ला

दरम्यान, या शक्तिशाली हल्ल्यानंतर इराण चवताळला आहे. इराणचे सीरियातील राजदूत हुसेन अकबरी म्हणाले की, आम्ही या प्रकरणी निर्णायक प्रतिक्रिया देऊ. ते पुढे म्हणाले की, हे आंतरराष्ट्रीय नियमांचे उल्लंघन आहे, जे इस्रायलने केले आहे. याचे परिणाम त्याला भोगावे लागतील. इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते नासेर कनानी यांनी सांगितले की, आम्हाला प्रतिक्रिया देण्याचा अधिकार आहे. आता हल्लेखोराला शिक्षा कशी करायची आणि कधी हल्ला करायचा हे आम्ही ठरवू.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com