Israel Iran Tensions: इराणच्या धमकीने महासत्तेला धास्ती! अमिरेकन नागरिकांसाठी ॲडव्हायजरी जारी; इस्त्रायलाही अलर्ट

Israel Iran Tensions: अलीकडेच इस्रायलने सीरियातील इराणच्या राजनैतिक कार्यालयावर मोठा हवाई हल्ला केला होता. या हल्ल्यात इराणच्या सर्वोच्च जनरलसह 12 जणांचा मृत्यू झाला होता.
Israel Iran Tensions
Israel Iran TensionsDainik Gomantak
Published on
Updated on

Israel Iran Tensions: इस्त्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध थांबण्याचं नाव घेत नाहीये. मागील काही दिवसांपासून युद्धाने अधिक आक्रमक रुप धारण केले आहे. यातच, इस्त्रायल सीरियातील इराणच्या ठिकाणांना लक्ष्य करत आहे. अलीकडेच इस्रायलने सीरियातील इराणच्या राजनैतिक कार्यालयावर मोठा हवाई हल्ला केला होता. या हल्ल्यात इराणच्या सर्वोच्च जनरलसह 12 जणांचा मृत्यू झाला होता. यानंतर इराणने बदला घेण्याची धमकी देत ​​इस्रायलवर हल्ला केला जाईल, असे म्हटले आहे. इराणच्या या धमकीमुळे महासत्ता म्हणवल्या जाणाऱ्या अमेरिकेचीही झोप उडाली आहे. अमेरिकेने आता आपल्या नागरिकांनाही ॲडव्हायजरी जारी केली असून त्यांना इस्रायलला जाणे टाळण्यास सांगितले आहे. कारण इराण तिथे कधीही हल्ला करु शकतो.

दरम्यान, अमेरिकेने आपल्या दूतावासातील कर्मचाऱ्यांना ग्रेटर जेरुसलेम आणि तेल अवीवच्या बाहेर प्रवास न करण्यास सांगितले आहे. याचे कारण इस्त्रायलच्या दोन्ही प्रमुख शहरांमध्ये कडक सुरक्षा व्यवस्था आहे, मात्र दुर्गम भागात इराणच्या हल्ल्यामुळे नुकसान होऊ शकते. इतकेच नाही तर ब्रिटननेही या प्रकरणी हस्तक्षेप केला असून त्यांचे परराष्ट्र मंत्री लॉर्ड कॅमेरुन यांनी इराणला हल्ले करण्यापासून परावृत्त करण्यास सांगितले आहे. इस्रायलने आतापर्यंत सीरियातील हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही किंवा नाकारलेली नाही. अशा स्थितीत इस्त्रायलनेच हल्ला केल्याचा इराणचा दावा बळकट होत आहे.

Israel Iran Tensions
Iran-Israel Tensions: GPS ब्लॉक, सैनिकांच्या सुट्ट्या रद्द; इस्त्रायलने घेतली इराणी हल्याची धास्ती

दुसरीकडे, इस्रायल आणि इराणमधील तणावामुळे इतर देशांमध्येही युद्ध पसरण्याची भीती वाढली आहे. आतापर्यंत युद्ध फक्त इस्रायल आणि हमास यांच्यात होते. आता इराणने यात थेट प्रवेश केला तर इतर काही शक्ती इस्रायलला पाठिंबा देऊ शकतात. अशा परिस्थितीमुळे मध्य आशियात गंभीर स्थिती निर्माण होऊ शकते. एवढेच नाही तर संघर्ष असाच सुरु राहिला तर महायुद्धही होऊ शकते, असे काही विश्लेषकांचे मत आहे. या युद्धात इराण आणि इस्रायल यांच्यातील संघर्षाची भीती वाढण्याची काही कारणे आहेत. एकीकडे, इराण हमास आणि हिजबुल्लाला समर्थन देतो आणि त्यांना शस्त्रे देखील पुरवतो असे मानले जाते.

Israel Iran Tensions
Israel-Iran Tensions: सीरियातील इराणी दूतावासावर इस्रायलचा हवाई हल्ला; इराणच्या सर्वोच्च लष्करी कमांडरसह 6 जण ठार

तसेच, सीरिया आणि इराकसारख्या देशांमध्ये इराणचा प्रभाव कमी करण्याचा इस्रायलचा प्रयत्न आहे. इस्त्रायलच्या हल्ल्यामागे हेही कारण असल्याचे मानले जात आहे. या हल्ल्यात लेबनॉन आणि सीरियातील कारवायांची जबाबदारी सांभाळणाऱ्या इराणच्या कुड्स फोर्सचा एक वरिष्ठ कमांडर मारला गेला. गाझामधील युद्धामुळे संपूर्ण जग चिंतेत असताना हा हल्ला झाला आहे. विशेषत: मुस्लिम देशांमध्येही ईदच्या निमित्ताने पॅलेस्टाईनसाठी प्रार्थना करण्यात आली. त्याचबरोबर इस्रायलविरोधी निदर्शने करण्यात आली. गाझामध्ये इस्त्रायली हल्ल्यांमुळे आतापर्यंत सुमारे 34 हजार लोकांचा मृत्यू झाला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com