Iran Israel War Dainik Gomantak
ग्लोबल

Iran Israel War: क्षेपणास्त्रवर्षाव सुरूच! इराण-इस्राईलचे तिसऱ्या दिवशी एकमेकांवर हल्ले; तीव्रता वाढण्याची शक्यता

Iran Israel Attack: इस्राईलने शुक्रवारी इराणच्या युरेनियम समृद्धीकरण केंद्र आणि लष्करी ठिकाणांसह विविध ठिकाणी ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचा मारा केला होता. यामध्ये इराणचे काही वरिष्ठ अधिकारी मारले गेले.

Sameer Panditrao

जेरूसलेम: इराण आणि इस्राईलने सलग तिसऱ्या दिवशी एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले केले. इस्राईलने इराणच्या संरक्षण विभागाच्या मुख्यालयावर आणि अणु कार्यक्रमाशी संबंधित ठिकाणांवर हल्ले केले तर, इराणच्या क्षेपणास्त्रांनीही इस्राईलची हवाई संरक्षण यंत्रणा भेदत अनेक इमारतींवर मारा केला.

इराण अणुबाँब तयार करून आपल्यावर हल्ला करेल, ही शक्यता गृहित धरून इस्राईलने हल्ले सुरू केले. इराणने मात्र युरेनियमचे समृद्धीकरण हे बाँबनिर्मितीसाठी नसल्याचे स्पष्ट करतानाच अणुऊर्जा हा आपला हक्क असल्याचे म्हटले आहे.

इस्राईलने शुक्रवारी इराणच्या युरेनियम समृद्धीकरण केंद्र आणि लष्करी ठिकाणांसह विविध ठिकाणी ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचा मारा केला होता. यामध्ये इराणचे काही वरिष्ठ लष्करी अधिकारी मारले गेले.

या हल्ल्याला प्रत्युत्तर देताना इराणनेही इस्राईलवर क्षेपणास्त्रांचा वर्षाव केला. आज दोन्ही देशांनी एकमेकांवर हल्ले सुरूच ठेवले. इराणने इस्राईलची हवाई संरक्षण यंत्रणा भेदली. त्यांनी केलेल्या क्षेपणास्त्रांच्या माऱ्यात हैफा शहरातील तेल शुद्धीकरण कारखान्याचे नुकसान झाले.

या हल्ल्यात कोणीही जखमी झाले नसले तरी इस्राईलमध्ये खोलवर मारा करण्याची इराणची क्षमता सिद्ध झाली आहे. इस्राईलनेही इराणची राजधानी तेहरावर क्षेपणास्त्रांचा वर्षाव केला. त्यांनी इराणच्या संरक्षण विभागाचे मुख्यालय व अणुकार्यक्रमाशी संबंधित ठिकाणांना लक्ष्य केले. दरम्यान, इस्राईलमधील सर्व भारतीय सुरक्षित असल्याचे भारतीय दूतावासाने म्हटले आहे.

आणखी हल्ले शक्य

इराणमधील शस्त्रनिर्मिती कारखान्यांमधील नागरिकांनी तातडीने काम बंद करून निघून जावे, असा इशारा इस्राईलने दिला आहे. त्यामुळे इस्राईलकडून अधिक तीव्र हल्ले होण्याची शक्यता आहे. गाझा पट्टी, लेबनॉन आणि येमेनमध्येही हल्ले करण्याचा इस्राईलने दिला आहे.

ट्रम्प यांचा इशारा

इस्राईलला मदत करणाऱ्या अमेरिकेवरही हल्ले करण्याचा इशारा इराणने दिल्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही इराणला धमकी दिली आहे. ‘इराणने आमच्यावर हल्ले करण्याचा प्रयत्न केल्यास अमेरिकेच्या लष्करी सामर्थ्याची ताकद त्यांना अनुभवायला मिळेल,’ असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. ‘‘इराणवरील हल्ल्यांशी आमचा काहीही संबंध नाही. त्यामुळे त्यांनीही आमच्यावर हल्ला करू नये. ’’ असे ट्रम्प म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lucky Zodiac Signs 2026: व्यापाऱ्यांसाठी जॅकपॉट अन् नोकरदारांना पगारवाढ! ऑगस्ट महिन्यात 'या' राशीची चांदीच चांदी; पैशांची चिंता कायमची मिटणार

Government Jobs: कर्मचारी भरती आयोगाकडून 3 हजार नोकऱ्या; आता आणखी 2 हजार पदांसाठी सरकार सज्ज, CM प्रमोद सावंतांची मोठी घोषणा

Bori Road Safety Issue: बोरीतील धोकादायक साकवाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष? कठडा तुटल्याने वाहनचालकांच्या जीवाला धोका, तातडीने दुरुस्तीची गरज

Garuda Lenka: राजासाठी जीव देण्याची शपथ, मृत्यूची बातमी मिळताच आत्मबलिदान; होयसळ साम्राज्याच्या ‘गरुड लेंका’ योद्ध्यांची रोमांचकारी गाथा

Viral News: आश्चर्य..! दोन तोंड अन् आठ पायांच्या वासराचा जन्म; तब्बल 5 तास चालली प्रसूतीची शस्त्रक्रिया Watch Video

SCROLL FOR NEXT