Research Dainik Gomantak
ग्लोबल

International Research: उष्णतेमुळे पुरुषांच्या जीवाला धोका

सामान्य तापमानापेक्षा फक्त एक अंश सेल्सिअसने उष्णता वाढली तरी हा धोका सुमारे चार टक्क्यांनी वाढतो.

दैनिक गोमन्तक

लंडन: उन्हाळ्याl रात्रीच्या तापमानातही वाढ होत असल्याने पुरुषांना हृदयविकाराचा झटका किंवा पक्षाघाताने मृत्यू होण्याचा धोका अधिक असतो. सामान्य तापमानापेक्षा फक्त एक अंश सेल्सिअसने री उष्णता वाढली तरी हा धोका सुमारे चार टक्क्यांनी वाढतो.

बीएमजे ओपन मॅगझिनमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार, हा धोका फक्त 60 ते 65 वर्षे वयोगटातील पुरुषांनाच होतो. याचा महिलांवर कोणताही परिणाम होत नाही. यूकेमध्ये गेल्या 15 वर्षांत हृदयविकाराशी संबंधित 40 हजार मृत्यूंवर केलेल्या अभ्यासातून हा निष्कर्ष समोर आला आहे.

हवामान बदलामुळे चिंता वाढली आहे

शास्त्रज्ञ म्हणाले, 'हवामानातील बदलामुळे उन्हाळ्याच्या रात्री उष्ण होत आहेत. अशा स्थितीत अभ्यासाचे निष्कर्ष चिंताजनक आहेत. कालांतराने, यामुळे मृत्यू वाढू शकतात. उष्ण हवामान हृदयासाठी धोकादायक मानले जाते. आधीच हृदयविकाराने (Heart) ग्रस्त असलेल्या लोकांसाठी हे तापमान धोकादायक आणि वेदनादायक आहे.

10 वर्षांत समस्या वाढली

ब्रिटीश तज्ञांनी सांगितले की, 'गेल्या 10 वर्षांत उन्हाळ्यात रात्रीच्या तापमानात अधिक वाढ नोंदवली गेली आहे. अशा परिस्थितीत या अभ्यासाच्या माध्यमातून भविष्यात ते टाळण्यासाठी उपाययोजना करत आहे.

वृद्ध लोकांवर परिणाम होत नाही

हा धोका 65 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या पुरुषांमध्ये (Men) आढळला नाही. याचे कारण सध्या शास्त्रज्ञांना समजू शकलेले नाही. त्याच वेळी, ही समस्या 60 ते 65 वयोगटातील महिलांमध्ये दिसून आली नाही. अशा स्थितीत शास्त्रज्ञ महिलांवरील या धोक्याचा स्वतंत्रपणे अभ्यास करण्याचा विचार करत आहेत. शास्त्रज्ञांनी सांगितले की, 'रात्री झोपताना एअर कंडिशनरचा वापर, खोल्या गरम होण्यापासून वाचवण्यासाठी पडद्यांचा वापर आणि योग्य प्रमाणात पाणी पिऊन हा धोका टाळता येऊ शकतो .

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT