South Korea: हवाई दलाच्या विमानांची हवेतच टक्कर, तीन जणांचा मृत्यू

दक्षिण कोरियामध्ये (South Korea) एक मोठी दुर्घटना घडली आहे.
KT-1 Trainer Jets Crash
KT-1 Trainer Jets CrashDainik Gomantak

दक्षिण कोरियामध्ये (South Korea) एक मोठी दुर्घटना घडली आहे. हवाई दलाची (Air Force) दोन KT-1 ट्रेनर विमाने (KT-1 Trainer Jets Crash) पाळत ठेवत असताना हवेतच एकमेकांवर आदळल्यानंतर अपघात झाला. शुक्रवारी देशातील दक्षिण भागात ही घटना घडली. या घटनेची माहिती देताना एका अधिकाऱ्याने सांगितले की, ''या अपघातात तीन पायलट ठार झाले असून अन्य एकजण जखमी झाला आहे. सोलच्या (Seoul) दक्षिणेस सुमारे 300 किमी अंतरावर असलेल्या साचिओनमधील भाताच्या शेतात दुपारी 1:36 वाजता ही विमाने कोसळली.''

अधिकाऱ्यांनी पुढे सांगितले की, ''विमाने हवेत एकमेकांवर आदळल्यानंतर अपघात झाला. दरम्यान 30 हून अधिक अग्निशमन दले (Fire brigade) आणि आपत्कालीन प्रतिसाद दले अपघातस्थळी रवाना करण्यात आली आहेत. यापूर्वी असाच प्रकार नॉर्वेमध्ये घडला होता. इथे नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन (NATO) च्या युद्धाभ्यास दरम्यान हे विमान कोसळले होते. यामध्ये चार अमेरिकन सैनिकांचा मृत्यू झाला होता.'' यासंबंधीची ही माहिती देताना नॉर्वेचे पंतप्रधान जोनास गाहर स्टोअर आणि संरक्षण अधिकाऱ्यांनी सांगितले की, 'या सरावाचा युक्रेन युद्धाशी काहीही संबंध नाही.''

KT-1 Trainer Jets Crash
Russia-Ukraine War: रशियन सैनिक धुडकावताहेत आदेश

यात चार अमेरिकन सैनिक मारले गेले

शुक्रवारी रात्री झालेल्या अपघातात चार अमेरिकन सैनिकांचा मृत्यू झाल्याचे जोनास स्टोअर यांनी ट्विट करुन माहिती दिली होती. अपघाताचे कारण तपासले जात आहे, परंतु नॉर्वेजियन पोलिसांनी परिसरात खराब हवामानाची नोंद केली आहे. यापूर्वी ट्विट करत त्यांनी म्हटले होते की, 'हे अमेरिकन सैनिक नाटोच्या संयुक्त सरावात भाग घेत होते. शहीद जवानांचे कुटुंबीय, नातेवाईकांच्या प्रती आम्ही मनापासून संवेदना व्यक्त करतो.'

KT-1 Trainer Jets Crash
Russia-Ukraine War : युद्धात आतापर्यंत 16,600 रशियन सैनिक मारले गेले

V-22B ऑस्प्रे विमानाचा बळी ठरला

नॉर्वेजियन सैन्याने दिलेल्या माहितीनुसार, ज्या विमानाला अपघात झाला ते यूएस नेव्हीचे V-22B ऑस्प्रे विमान होते. नॉर्वेजियन सैन्याने जारी केलेल्या निवेदनानुसार, विमानात एकूण चार क्रू मेंबर्स होते आणि ते उत्तर नॉर्वेच्या (Norway) नॉर्डलँड काउंटीमध्ये प्रशिक्षण ऑपरेशनमध्ये भाग घेत होते. नॉर्वेने सांगितले की, हे विमान 'कोल्ड रिस्पॉन्स' लष्करी सरावात सहभागी झाले होते. या सरावांतर्गत नाटो सदस्य देशांचे सैनिक कडाक्याच्या थंडीत नॉर्वेजियन सैन्यासोबत 'ट्रेनिंग आणि ऑपरेशन' करत होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com