India's military Dainik Gomantak
ग्लोबल

भारताचा चीनविरुध्द आक्रमक पवित्रा; सीमेवर 50 हजार सैन्य तैनात

मात्र पंतप्रधान कार्यालय (Prime Minister's Office) आणि भारतीय लष्कराच्या प्रवक्त्यांनी अद्याप माहिती दिलेली नाही.

दैनिक गोमन्तक

मागील वर्षापासून लडाख सीमेजवळील (Ladakh border) सुरु असलेल्या चीनी रेड आर्मीच्या (Chinese Red Army) कारवायांना प्रत्युत्तर देण्यासाठी आक्रमक पवित्रा घेत भारताने (India) जवळपास 50,000 अतिरिक्त सैन्य (India's military) तैनात केले आहे. मागील काही महिन्यामध्ये चीनच्या सीमेजवळील तीन वेगवेगळ्या भागात भारताने सैन्य आणि फायटर विमाने (Fighter planes) तैनात केली आहेत. सध्या चीनी आर्मीच्या कारवायांवर बारीक लक्ष ठेवण्यासाठी दोन लाखांच्या वर सैन्य लडाख सीमेवर तैनात करण्यात आले आहे.

ब्लूमबर्गच्या वृत्तानुसार, आता चीनच्या सीमेवर अधिक लक्ष केंद्रीत करत जवळपास दोन लाख सैनिक भारताने तैनात केले आहेत. जे गेल्या वर्षाच्या तुलनेमध्ये 40 टक्के जास्त आहे. मात्र पंतप्रधान कार्यालय (Prime Minister's Office) आणि भारतीय लष्कराच्या प्रवक्त्यांनी अद्याप माहिती दिलेली नाही. तसेच भारतीय हवाई दलाचे विमानेही चीन सीमेवर तैनात करण्यात आली आहेत. ही लढाऊ विमाने चीन सीमेला लागून असलेल्या तीन भागात तैनात करण्यात आली आहेत.

गलवान खोऱ्यातील संघर्षानंतर भारताच्या धोरणात बदल

भारत आणि चीन यांच्यात 1962 मध्ये युध्द झालं होतं. भारत (Inida) आणि पाकिस्तान (Pakistan) यांच्यात काश्मीर (Kashmir) हा संवेदनशील मुद्दा असल्याने चीन सातत्याने पाकिस्तानला मदत करत आला आहे. मागील वर्षी 15 जून रोजी पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यात (Galvan Valley) चीनी रेड आर्मीने भारतीय सैनिकांवर हल्ला केला होता, तेव्हा पंतप्रधान मोदी (Prime Minister Modi) यांनी पाकिस्तानसोबतचे प्रकरण शांत ठेवत चीनच्या सीमेवर अधिक लक्ष केंद्रीय करण्याचे धोरण अवलंबिले आहे.

भारताचे चीनविरुध्द आक्रमक धोरण

याआगोदर सीमेवर चीनी आर्मीचे आक्रमण रोखण्यासाठी भारताने सैन्य तैनात केले आहे, पंरतु आता सीमेवरील भारतीय सैन्यामध्ये वाढ करण्यात आली आहे. चीनविरुध्द भारत यापुढे आक्रमक संरक्षण धोरण अवलंबण्यास मागेपुढे पाहणार नाही असे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rashi Bhavishya 09 November 2024: नवीन काम हाती घेण्याच्या विचारात असाल तर आजचं भविष्य नक्कीच जाणून घ्या !!

Cash For Job Scam: मंत्री, आमदारांचे कॉल रेकॉर्ड तपासा; सरकारी नोकरी घोटाळ्याप्रकरणी 'आप'ने सत्ताधाऱ्यांनाच घेरले

Cash For Job Scam: नोकऱ्यांचा लिलाव

Cash For Job Scam: वकिलांनाही पूजानं घातला लाखोंचा गंडा; मामलेदाराच्या नोकरीचं दिलं आमिष

Goa News Updates: कळंगुटमध्ये एफडीएची धडक कारवाई, निकृष्ट काजू जप्त; वाचा दिवसभरातील घडामोडी

SCROLL FOR NEXT