"दहशतवादी लादेनला इम्रान खान म्हणाले शहिद"

लादेनला 'शहीद' म्हणत असलेल्या वक्तव्याबद्दल इम्रान खान यांच्यावर जागतिक स्तरावरुन टिका होत आहे.
President of Pakistan
President of PakistanDainik Gomantak
Published on
Updated on

इस्लामाबाद: दहशतवाद्यांशी पाकिस्तानची (Pakistan) मैत्री सर्वश्रुत आहे. अगदी वरच्या सत्ताधारी आस्थापनांकडून सुद्धा दहशतवाद्यांना (Terrorist) पाठिंबा आहे. त्यातच पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान (imran khan) यांनी ओसामा बिन लादेन या अल कायदाच्या कुख्यात दहशतवाद्याला, शहीद म्हटले आहे. यावर स्पष्टीकरण देताना पाकिस्तानचे दुरसंचार मंत्री फवाद चौधरी म्हणाले की, असोमा बद्दल बोलत असताना पंतप्रधान इम्रान खान यांची जीभ घसरली. (Pakistan's Prime Minister Imran Khan has called terrorist bin Laden a martyr)

माध्यमांशी बोलताना फवाद चौधरी म्हणाले की, पाकिस्तान ओसामा बिन लादेनला अतिरेकी आणि अल कायदाला दहशतवादी संघटना असल्याचे मानतो. गेल्या वर्षी जूनमध्ये नॅशनल असेंब्लीला संबोधित करताना पंतप्रधानांनी एबटाबादमध्ये अमेरिकेने ऑपरेशन कसे केले आणि ओसामा बिन लादेनला ठार मारले याची आठवण केली. व्हायरल व्हिडिओ क्लिपमध्ये एबटाबादमध्ये लादेन कसा मारला गेला याबद्दल इमरान खानने अमेरिकेत हल्ला केल्याचे दाखवले गेले होते आणि यादरम्यान इमरान खान म्हणाले की ओसामा शहीद झाला.

President of Pakistan
अफगाणिस्तानातील नेत्यांच्या पाठिशी अमेरिका- बायडेन

लादेनला 'शहीद' म्हटल्याच्या मुद्दयावरुन इम्रान खान यांच्यावर जागतिक स्तरावरुन टिका होत आहे. ओसामा बिन लादेन हा कुख्यात दहशतवादी गट अल कायदाचा प्रमुख होता. 2001 मध्ये अमेरिकेवर 9/11 च्या दहशतवादी हल्ल्यामागील तो मास्टर माइंड होता. तसेच ओसामा अमेरिकेसह जगभरातील दहशतवादी हल्ल्यांमध्ये सहभागी होता. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या नेतृत्वात ओसामा बिन लादेनला अमेरिकेच्या जवानांनी २०११ मध्ये लष्करी कारवाईत ठार केले होते. जगभरातील अनेक दहशतवादी हल्ल्यांमध्ये त्याचा हात असल्याचा आरोप त्याच्यावर होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com