Indian youth recruited in Russian army dies in Ukraine missile attack:
रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे. युक्रेन आता रशियावर सातत्याने हल्ले करत आहे. दरम्यान, युक्रेनच्या क्षेपणास्त्र हल्ल्याचा फटका बसल्याने रशियातील एका 23 वर्षीय भारतीय तरुणाचा मृत्यू झाला आहे.
हा २३ वर्षीय तरुण गुजरातचा रहिवासी होता. तो रशियामध्ये सुरक्षा मदतनीस म्हणून रशियन सैन्यात सामील झाला होता.
क्षेपणास्त्र हल्ल्यात मृत्युमुखी पडलेला भारतीय तरुण रशिया-युक्रेन सीमेवरील डोनेस्तक भागात तैनात होता. त्याला गोळीबाराचे प्रशिक्षण दिले जात होते. त्याचवेळी क्षेपणास्त्र हल्ला झाला. या हल्ल्यात तरुणाला आपला जीव गमवावा लागला.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, सुरत जिल्ह्यातील रहिवासी हेमिल अश्विनभाई मांगुकिया डिसेंबर 2023 मध्ये रशियाला गेला आणि नंतर तो रशियन सैन्यात सामील झाला.
या महिन्याच्या सुरुवातीला हेमिलच्या वडिलांनी भारतीय वाणिज्य दूतावासाला पत्र लिहून त्याला घरी आणण्यासाठी मदत मागितली होती.
रशियन लष्कराशी करारावर असलेल्या इतर अनेक भारतीयांनीही दूतावासाशी संपर्क साधला आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, या घटनेबाबत अद्यापपर्यंत त्यांना माहिती देण्यात आलेली नाही.
हेमिलच्या वडिलांनी प्रसार माध्यमांना सांगितले की, 20 फेब्रुवारीला हेमिलशी बोललो होतो. त्यानंतर अवघ्या एका दिवसात त्यांचा मृत्यू झाला.
कर्नाटकातील समीर अहमद यांनी घटनेबाबत सांगितले की, त्याच्यापासून 150 मीटर अंतरावर हॅमिल गोळीबार आणि क्षेपणास्त्रांचा सराव करत होता. जेव्हा अचानक स्फोट झाला. तेव्हा आम्ही खंदकात लपलो. काही वेळाने आम्ही बाहेर आलो तेव्हा हेमिलचा मृत्यू झाल्याचे दिसले.
अलिकडच्या काळात असे अनेक अहवाल समोर आले आहेत ज्यात नेपाळ आणि भारतातील काही लोक रशियन सैन्यात सामील झाल्याचे सांगण्यात आले आहे.
भारतीय परराष्ट्र मंत्रालयानेही गेल्या आठवड्यात सांगितले होते की, रशियन सैन्याला मदत करणाऱ्या भारतीय नागरिकांना तातडीने बाहेर काढण्यासाठी चर्चा सुरू आहे.
एका अहवालानुसार, 100 हून अधिक भारतीय तरुण रशियन सैन्यात दाखल झाले आहेत. यापैकी बहुतेकांना सुरक्षा मदतनीस म्हणून नियुक्त करण्यात आले आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.